केळफुलाचे पॅटिस (kelfulache pattice recipe in marathi)

Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252

केळफुल एक चविष्ट पारंपरिक भाजी..केळफूल निवडताना ताजे घ्यावे.केळफुलांची भाजी, वड्या, पॅटिस , कबाब, वडे, भाकरी, पोटेंडी, बापरे किती रेसिपी आहेत एका केळफुलाच्या!बहुतेकांना भाजी पेक्षा पॅटिस,वड्या करायला जास्त आवडतात कारण त्या जास्त चमचमीत लागतात.ठराविक केळफुलाची भाजी केली जाते.सर्वच केळफुल भाजीसाठी नसतात.
केळ्याइतकेच केळफूलाचे महत्त्व आहारात भरपूर आहे. अतिशय पौष्टिक गुणधर्म असलेली भाजी. केळफुलात जीवनसत्त्व ‘क’ ‘अ’, ‘ब,’ ‘के’, फॉस्फरस, कॅल्शिअम व आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. केळ्यांचा फणा ज्यातून निर्माण होतो ते केळफूल फुलासारखं दिसतच नाही. केळफुलाच्या वरची गुलाबी,majenta रंगाची जाड पानं उलगडत गेली की, आत पिवळसर फुलांचे केळ्याच्या घडासारखे घड दिसतात. केळफुलात कोलेस्टोरॉल नाही, साखर नाही, भरपूर चोथा आणि कॅल्शियम असतं. सोडियमने समृद्ध असलेल्या या केळफुलात चांगल्या प्रतीची प्रथिनं असतात, तसेच मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरही असतं.केळफुल निवडायला किचकट. कारण, त्यातल्या प्रत्येक फुलातला कडक दांडा आणि पातळ पापुद्रा काढावा लागतो. पण, ती अतिशय पौष्टिक असल्याने जरूर खावी. चिरल्यानंतर भाजी लिंबू घातलेल्या पाण्यात घालावी,नाही तर काळी पडते. केळफुल सोलायला घेतल्यावर केळीच्या फण्याच्या आकारासारखे छोटे छोटे फणे आत दिसतात ते न मोडता तिथुन हाताने अलगद काढून घ्यायचे आणि एकेक पाकळी ऊघडुन त्यात एक वरती काळा गोल असलेला दांडा चिमटीत धरून आपल्याकडे ओढायचा कि त्याबरोबर एक छोटी transparent पाकळी सारखी बाहेर येते ते दोनीही काढुन टाकायच कारण ते चिवट असत शिजत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 1केळफूल मध्यम आकाराचे
  2. 1बटाटा मध्यम आकाराचा उकडवलेला
  3. 2कांदे बारीक चिरलेले
  4. 1 वाटीकोथिंबीर
  5. 1 वाटीबासमती तांदूळ पिठ
  6. 1/2 वाटीबेसन
  7. 1 टेबलस्पूनआलेलसुण पेस्ट
  8. 1 टीस्पूनधणेपूड
  9. 1 टीस्पूनजिरेपूड
  10. 1 टीस्पूनघरघुती मसाला
  11. 1/2 टीस्पूनहळद
  12. 1 टीस्पूनआमचूूूर पावडर
  13. 1/4 चमचागरम मसाला
  14. 3 ते 4 मिरच्या बारीक चिरलेल्या
  15. चवीनुसार मीठ
  16. आवश्यकतेप्रमाणे तेल

कुकिंग सूचना

45मिनिट
  1. 1

    केळफूल सोलून घ्यावे. साफ करून बारीक चिरून घ्यावे. खोलगट पातेल्यात थोडासा लिंबाचा रस घालून पाणी तयार करावे. चिरलेले केळफुल त्या पाण्यात घालून ठेवून द्यावे म्हणजे केळफुलाचा चिक आणि काळपट राप निघून जाईल.

  2. 2

    केळफुलातील पाणी हाताने घट्ट पिळून घ्यावे.पूर्ण पाणी काढून टाकावे. त्यामध्ये कुस्करलेला बटाटा,कांदा, कोथिंबीर, मिरची, तांदळाचे पीठ, बेसन,मसाला, हळद, मीठ, गरममसाला,धणेपूड, जिरेपूड, आमचूर पावडर,आलेलसून पेस्ट, हे सर्वजिन्नस घालून हाताने एकजीव करावे.

  3. 3

    मिश्रणातील छोटा गोळा तळहातावर घेऊन पॅटिसचा चपटा आकार द्या. पॅनमध्ये तेल गरम करावे. गरम तेलात हे पॅटिस shallo फ्राय करून घ्या.सोनेरी रंगावर केळफूल छान शिजेपर्यंत दोन्ही बाजूनी तळून घ्या.

  4. 4

    तय्यार आहेत भन्नाट चवीचे केळफुलाचे गरमागरम पॅटिस. जेवणासोबत किंवा सॉस चटणी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prajakta Patil
Prajakta Patil @cook_19647252
रोजी

Similar Recipes