फुलकोबीच्या पानांचे पकोडे (cauliflower panache pakode recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

कधीकधी बाजारातून आणलेल्या फुलकोबीतील फुलाचा भाजीसाठी वापर करून त्याची पाने आपण फेकून देतो. फुलकोबीच्या पानांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि फायबरचा मुबलक साठा असतो. यामुळे हाडं मजबूत होतात, रोगप्रतिकारशक्ती सुधारते, पचनमार्गाचे कार्य सुधारते. अश्या ह्या पौष्टिक पानांपासून गरमागरम पकोडे ची रेसिपी मी बनविली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 4 ते 5 फुलकोबीची पाने
  2. 1 कपबेसन
  3. 1बारीक चिरलेला कांदा
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 टेस्पूनआले-लसूणपेस्ट
  6. 1 टेस्पूनधणे-जिरेपूड
  7. 1/2 टेस्पूनहळद
  8. 2 टेस्पूनतिखट
  9. चवीनुसार मीठ
  10. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम फुलकोबीची पाने स्वच्छ धुवून पानातील देठ काढून घ्यावे आणि पाने बारीक चिरून घ्यावी.

  2. 2

    एका बाऊल मध्ये कांदा, फुलकोबीची पाने आणि आले-लसूण ची पेस्ट ऍड करावी.

  3. 3

    त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या, बेसन आणि हळद टाकावे.

  4. 4

    आता त्यात तिखट, धणे-जिरेपूड आणि चवीनुसार मीठ घालावे.

  5. 5

    थोडे पाणी टाकून पकोडे साठी बॅटर तयार करून घ्यावे.

  6. 6

    कढईमध्ये तेल गरम करायला ठेवून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हाताने पकोडेचे बॅटर टाकावे. मंदआचेवर पकोडे दोन्ही बाजूंनी गोल्डन-ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत.

  7. 7

    सर्विंग प्लेट मध्ये काढून सॉस सोबत गरमागरम पकोडे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

Similar Recipes