मेथी फुल कोबी भाजी (methi fulgobi recipe in marathi)

#GA4#week2 आपण नेहमी फुल कोबीची भाजी टोमॅटो, बटाटे टाकून किंवा वाटाणा टाकून करतो. पण आज मी मेथी टाकून कोरडी भाजी केली आहे. ही भाजी खूप छान लागते.
मेथी फुल कोबी भाजी (methi fulgobi recipe in marathi)
#GA4#week2 आपण नेहमी फुल कोबीची भाजी टोमॅटो, बटाटे टाकून किंवा वाटाणा टाकून करतो. पण आज मी मेथी टाकून कोरडी भाजी केली आहे. ही भाजी खूप छान लागते.
कुकिंग सूचना
- 1
फुलकोबी दहा-पंधरा मिनिटे पाण्यात ठेवून स्वच्छ करून घ्यावी.बारीक चिरून घ्यावी व नंतर एका भांड्यात थोडेसे पाणी उकळून त्यात चिरलेली फुलकोबी टाकावी व एक उकळी आल्यावर पाण्यातून काढून घ्यावी.तसेच मेथी एक-दोन वेळा पाण्यातून काढून स्वच्छ धुऊन घ्यावी व बारीक चिरून घ्यावी.
- 2
गॅस सुरू करून गॅसवर कढई ठेवावी. तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर जिरे मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर कांदा आणि आले लसूण पेस्ट टाकावी. कांदा सोनेरी झाल्यावर, त्यात हळद, तिखट,गरम मसाला आणि चिरलेला टोमॅटो टाकावा. ते चांगले मिक्स करून घ्यावे व नंतर चिरलेला कोबी टाकावा.
- 3
आता ते एकत्र करून घेतल्यानंतर मीठ टाकावे व पुन्हां मिक्स करून घ्यावे. त्यावर झाकण ठेवून तीन ते चार मिनिट शिजवून घ्यावे. त्यानंतर झाकण उघडून चिरलेली मेथी आणि साखर टाकून पुन्हा एकत्रित करावे. व आता फक्त दोन मिनिट झाकून शिजवून घ्यावे.
- 4
अशाप्रकारे मेथी फुल कोबीची भाजी तयार झालेली आहे.आता त्यावर कोथिंबीर पेरावी. जेवायला वाढायला भाजी तयार.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फुलकोबी-हिरवी मेथी भाजी (fulgobi methi bhaji recipe in marathi)
#पौष्टिक भाजी#हिरवी मेथी व फुलकोबी एकञित केलेली भाजी जीभेला वेगळी चव देते.जेवणात रंगत येते .आपण सुध्दा ही भाजी करून जेवणाचा आनंद घ्यावा . Dilip Bele -
पानकोबी वाटाणा भाजी (pankobi vatana bhaji recipe in marathi)
#भाजी# या दिवसात मिळणारा ताजा ताजा हिरवा वाटाणा टाकून मस्त पान कोबीची भाजी केली आहे. छान वाटते खायला.... Varsha Ingole Bele -
मेथी दाल तडका (methi daal tadka recipe in marathi)
#GA4#week19 मेथी.... नेहमी नेहमी साधे वरण किंवा फोडणीचे वरण खाऊन कंटाळा आला असेल तर चवदार असे मेथीचे वरण, तिच्या वेगळ्या चवीमुळे छान लागते. म्हणून मी आज केली आहे, मेथी दाल तडका...... Varsha Ingole Bele -
कोबीची भाजी (kobichi bhaji recipe in marathi)
#cooksnap # Asha Ronghe # आज मी कोबीची भाजी ही रेसिपी cooksnap केली आहे. आपण नेहमी आपल्या पद्धतीने भाज्या करतो. पण कधी दुसऱ्या प्रकारे भाजी करून बघितली, तर नक्कीच फरक जाणवतो..मी ही आज असाच प्रयत्न केला आहे. आणि छान झाली आहे भाजी... thanks.. Varsha Ingole Bele -
मेथी भाजी😋 (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #Week19 पोष्टीक हिवाळ्यात भरपूर मेथी भाजी असते🤤 Madhuri Watekar -
वालाच्या दाण्यांची भाजी (valyachya danachya bhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्यात मिळणाऱ्या वालाच्या हिरव्या शेंगांची आपण भाजी करतो. पण त्याच शेंगा जरड झाल्या की त्याच्या दाण्यांची भाजीही खूप छान लागते. मग कधी ती रस्सा भाजी, किंवा थोडीशी , कमी रस्सा असलेली असते. मी आज , कमी रस्सा असलेली भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
गाजर भेळ (gajar bhel recipe in marathi)
#GA4Tamarind आपण नेहमी ओली भेळ करतो मी आज गाजर टाकून भेट केली आहे हे वेळ खूप छान लागतेRutuja Tushar Ghodke
-
टोमॅटो मेथी (Tomato Methi Recipe In Marathi)
मेथीची भाजी अनेक प्रकारे बनवली जाते. अगदी सात्विक पासून ते चमचमीत मेथी मटर मलाई पर्यंत आज आपण बनवणार आहोत टोमॅटो मेथी ही सुद्धा अगदी झटपट बनणारी भाजी आहे अगदी कमी साहित्यात बनते आणि रुचकर लागते Supriya Devkar -
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
सिमला मिरची टोमॅटो भाजी (shimla mirchi tomato bhaji recipe in marathi)
आज सकाळी मिक्स व्हेज पोहे बनवताना , त्यात सिमला मिरची आणि टोमॅटो टाकण्यासाठी सिमला मिरची आणि टोमॅटो चिरले . आणि मग सहजच विचार आला की आज आपण सिमला मिरची आणि टोमॅटोची भाजी करूया. म्हणून आज ही भाजी..... Varsha Ingole Bele -
मेथी मुठिया (methi muthiya recipe in marathi)
#संक्रांतीमेथी मुठिया ही खूप चविष्ट आणि पारंपरिक पाककृती आहे, हे मुठिया उंधियो मध्ये घातले जाते, पण हे मेथी मुठिया आपण असेही खाऊ शकतो किंवा चटणी, केचप बरोबर ही छान लागतात. संध्याकाळच्या स्नॅक साठी ही छान पाककृती आहे. Shilpa Wani -
मेथी (Methi recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Methiमेथी बटाटा भाजी झटपट होते आणि लागते ही छान.चला तर मग करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
आलू मेथी (aloo methi recipe in marathi)
#GA4 #week2#fenugreekमेथीची भाजी आपण वेगवेगळ्या प्रकारे करतो.आज मी नेहमी ची बटाटा भाजी कस्तुरी मेथी वापरून बनवली आहे.अशी ही झटपट व कमीत कमी साहित्य बनणारी अतिशय चविष्ट भाजी एकदा नक्की ट्रायकरा Bharti R Sonawane -
मेथी मसुर (methi masoor recipe in marathi)
#GA4 #week19 # Methi ह्या की वर्ड साठी मेथी मसुर भाजी केली आहे.बाजरीच्या भाकरी सोबत मस्त लागते.मला प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मेथी वाटाणा भाजी (methi vatana bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी सदा सर्वदा बाजारात मिळत असली, तरी हिवाळ्यातील मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते. झटपट होणारी आणि जास्त ताम झाम नसणारी, सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त अशी भाजी केली आहे मी आज.... Varsha Ingole Bele -
मेथी दाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 #Fenugreek मेथी विषयी सांगायचं झालं तर मी काय सांगणार तुम्हाला मेथी विषयी भरपूर माहिती आहे. भरपूर से गुन आहेत मेथी मध्ये कडू असते पण सगळ्यांवर रामबान उपाय हा मेथी आहे. हिरवी मेथीची भाजी सगळेच खातात पण वाळल्या मेथीचे दाणे नाही खायला पाहत त्यातच खूप विटामिन प्रोटीन आहे तुमचं फॅट पण त्यामुळेच कमी होऊ शकते पण कडू असल्यामुळे कोणी त्याकडे लक्ष देत नाही कोणी म्हणायचं तर काय माझ्या घरी शेतात मेथी होत ते पण मीच अजून भाजी बनवलेली नव्हती नेहमी विचार करायची भाजी बनवली भाजी बनविन पण भाजी कडू मागेल म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यावेळेस तर थीम पण होती मग ठरवले दुसरं काही बनवायचं नाही पण मेथीची भाजी तर या वेळेस नक्की बनवते काहीतरी वेगळं बनवेल मी पणभाजी इतकी छान झाली की काय सांगू मी तर प्लेटमध्ये घेऊन खाल्ली खरं सांगते मैत्रिणींना तुम्ही पण नक्की ट्राय करा मग मला सांगा की मेथीची भाजी कशी झाली कडूपणा त्याचा पूर्ण निघून जातो राहते फक्त गोडवा. Jaishri hate -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
#cpm5 #वांगे बटाटा भाजी # वांगी बटाट्याची भाजी म्हटले की त्याला रस्सा आलाच... पण आज मी , थोडी कोरडी, बिना रस्स्याची, वांगे बटाट्याची भाजी केली आहे. छान झाली आहे भाजी.. Varsha Ingole Bele -
गवारची भाजी (gavarachi bhaji recipe in marathi)
#Cooksnap # स्वरा चव्हाण # मी आज प्रथमच टोमॅटो टाकून भाजी केली आहे गवाराच्या शेंगांची.. पण खूप आवडली घरी... त्यामुळे या नंतर अशी भाजी होणारच... धन्यवाद या रेसिपी बद्दल... आणि हो, मी यात बटाटा घातला नाही.. Varsha Ingole Bele -
हिरवे मटर/वाटाना मेथी भाजी रेसिपी (watana methi bhaji recipe in marathi)
#GA4#week19 मेथीची भाजी रेसिपी या भाजीमध्ये हिरवे मटर म्हणजेच वाटाणा व इतर साहित्य मिक्स करून ही भाजी तयार करण्यात आली ही भाजी छान झाली व सगळ्यांनाच आवडली Prabha Shambharkar -
मेथी बटाटा भाजी (Methi Batata Bhaji Recipe In Marathi)
#NVR#मराठवाडी भाजी हिवाळ्यात बाजारात मेथीची भाजी भरपूर प्रमाणात उपलब्ध होतात मेथीचे विविध प्रकारचे पदार्थ बनवुन मुलांना खायला आवडतं असतात मेथी अतिशय पोष्टीक मेथी पराठा, मेथी घोळाना,मेथी आमटी, मेथी बटाटा घालून भाजी 🤤🤤🤪🤪 Madhuri Watekar -
दोडक्याची भाजी मूग डाळ टाकून (dodkyachi bhaji moong daal takun recipe in marathi)
#md #भाजी# दोडक्याची मुगाची डाळ टाकून केलेली भाजी... ही भाजी आई ने केली की, जेवण चांगले होणार हे नक्की... खूप छान चव असते आईच्या हातचे भाजीला, तशी तर माझ्या आईने केलेले , सर्वच पदार्थ मस्त असतात.. तिच्या हातच्या भाज्या, असो किंवा लोणचे, किंवा सणासुदीचे पदार्थ, एकदम बेस्ट... तर मी ही भाजी केली आहे आज, माझ्या मुलासाठी. Varsha Ingole Bele -
गवाराच्या शेंगांची भाजी (gawarchya shenganchi bhaji recipe in marathi)
#md # गवाराच्या शेंगांची भाजी ..ही भाजी मला माझ्या आईच्या हातची खूप आवडते .ती नेहमी गवारच्या शेंगा उकडून, मग त्याची भाजी करायचे आणि त्यांना शेंगदाण्याचा कूट लावायचे.. मीही तशीच भाजी करते. खूप छान लागते ही भाजी. मदर्स डे रेसिपी च्या निमित्ताने मुद्दाम ही भाजी केली आहे मी आज.. Varsha Ingole Bele -
मेथीची भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 पझल मधील मेथी पदार्थ. रेसिपी - 3 मेथीची भाजी मी अनेक प्रकारे करते. Sujata Gengaje -
मेथीचं आळण
#करी - हिवाळ्यात मेथी आहारात ठेवणे गरजेचे पण नेहमी नेहमी मोकळी भाजी खाऊन कंटाळा आल्यावर ही करी छान .झटपट ही बनते. Maya Ghuse -
आलु मेथी (aloo methi recipe in marathi)
#भाजी आलु मेथी भाजी खायला खुप चवीष्ट लागते आणि पराठा भाकरी पोळी सोबत मस्त चवदार आणि टिफिन साठी पण मस्त Sushma pedgaonkar -
तडकेवाली दाल मेथी (dal methi recipe in marathi)
माझे बाबा हि डाळ खूपच छान बनवायचे. नाशिककर आणि मेथी ह्यांचं अतूट नातं आहे. नाशिकचा असून मेथी न आवडणारा माणूस बहुतेक तरी सापडणार नाही. काल कितीतरी दिवसांनी लॉक डाऊन मध्ये बाजारात मला मेथी दिसली.अगदी छोटी जुडी होती.पण तिला पाहूनही लहान मुलाला खेळणं दिल्यावर जसा आनंद होतो तसाच मला झाला. मेथीची कांदा लसूण घालून भाजी , मसूर डाळ,मुगडाळ घालून भाजी, पातळभाजी हे करतेच ना नेहमी ..पण आज खूप दिवसांनी तडकेवाली दाल मेथी केली. जशी डाळ पालक करतो तशीच करायची.पण हीची चव तर सॉलिडच लागते.मला तर प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
मूगवड्या मेथीची भाजी (moongvada methi bhaji recipe in marathi)
घरात काही भाजीचे नसलं की विदर्भात हमखास केली जाणारी भाजी म्हणजे मूगवड्याची.भाजी.. उन्हाळ्याच्या सुरुवातीला वर्षभरासाठी या वड्या बनवून ठेवतात ...आणि गरज पडेल तेव्हा याची भाजी केल्या जाते... मी आज या मुगवड्यांची, मेथी टाकून भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
मेथी वांगा (methi wanga recipe in marathi)
#GA4# week 2 मेथी वांगा ही भाजी छान होते माझ्या मुलाला आवडते Prabha Shambharkar -
रेस्टॉरंट शैलीत तळलेले फुलकोबी बटाटे भाजी (Foolkobi Batata Bhaji Recipe In Marathi)
#MLRतळलेले फुलकोबी बटाट्याची भाजी चवीला खूप छान लागते. पराठ्यासोबत खायला खूप छान लागते. Sushma Sachin Sharma
More Recipes
टिप्पण्या (2)