डोनट्स (donuts recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#डोनट #सप्टेंबर
डोनट ही रेसिपीची थीम मिळाल्यावर आपल्याला कितपत जमेल ही शंका मनात होती, पण खरं सांगू का मंडळी, केल्यावर (मेहनतीने) ते इतके ऊत्तम जमले की, सांगुनही खरे वाटणार नाही, की ते घरी केलेले आहेत.
वरुन खुसखुशीत आणि आतुन लोण्यासारखे मऊ, स्पंजी! माझा नातू तर एकदम खुश! ह्यापेक्षा अजून काय पावती हवी?

डोनट्स (donuts recipe in marathi)

#डोनट #सप्टेंबर
डोनट ही रेसिपीची थीम मिळाल्यावर आपल्याला कितपत जमेल ही शंका मनात होती, पण खरं सांगू का मंडळी, केल्यावर (मेहनतीने) ते इतके ऊत्तम जमले की, सांगुनही खरे वाटणार नाही, की ते घरी केलेले आहेत.
वरुन खुसखुशीत आणि आतुन लोण्यासारखे मऊ, स्पंजी! माझा नातू तर एकदम खुश! ह्यापेक्षा अजून काय पावती हवी?

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
५-६ सर्विंग
  1. ३०० ग्रॅममैदा
  2. 12 टिस्पून पिठीसाखर
  3. 2 टिस्पून इंस्टंट यिस्ट
  4. 1/4 कपबटर
  5. 1 चिमूटमीठ
  6. 1/4 कपमिल्क पावडर
  7. 1 कपदुध
  8. तळण्यासाठी तेल
  9. ८० ग्रॅम चाॅकलेट स्लॅब
  10. 3 टेबलस्पून सजावटीसाठी टूटीफ्रृटी, स्प्रिंकलर

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    मैदा चाळून घ्या. चाळतांना त्यात मिल्क पावडर, मीठ, १० चमचे पिठीसाखर घाला.

  2. 2

    नंतर दुध गरम करून त्यात २ चमचे पिठीसाखर आणि यीस्ट घालून अॅक्टीव्हेट करण्यासाठी १० मिनिटे बाजूला ठेवा. व वरील मैद्याच्या मिश्रणात घालून खुप मळा. मळतांना बटर घालत घालत मळा. खुप मळल्यावर तेलाचा हात लावून गोळा फुगण्यासाठी तासभर झाकून ठेवा.

  3. 3

    तासभराने पुन्हा मळून तेलाच्या हाताने जाडसर पोळी लाटा (१/२ इंच जाडीची). वाटीच्या सहाय्याने गोल कापा. छोट्या झाकणाने मधला भाग कापा. ट्रेमध्ये मैदा डस्ट करून त्यावर कापलेले डोनट ठेवा.

  4. 4

    १० मिनिटाने, मंद आचेवर तेलात तळून घ्या. अतिशय खमंग खुसखुशीत डोनट होतात.

  5. 5

    थंड झाल्यावर चाॅकलेट मेल्ट करून त्यात बुडवून सजावट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
रोजी

Similar Recipes