ओम्लेट डोनट (omelette donut recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#डोनट #सप्टेंबर

मी हे डोनट बनवून ते अंड्यामध्ये घोळवून तळले आणि ऑमलेट बरोबर ते सर्व्ह केले.. डोनट वर एक मस्त अंड्याचा लेयर तयार झाला. खाताना डोनट चा softness आणि अंड्याचा स्वाद यांचे एक छान कॉम्बिनेशन बनले... सकाळचा हा असा something different नाश्ता सर्वांनाच फ्रेश करून गेला..

ओम्लेट डोनट (omelette donut recipe in marathi)

#डोनट #सप्टेंबर

मी हे डोनट बनवून ते अंड्यामध्ये घोळवून तळले आणि ऑमलेट बरोबर ते सर्व्ह केले.. डोनट वर एक मस्त अंड्याचा लेयर तयार झाला. खाताना डोनट चा softness आणि अंड्याचा स्वाद यांचे एक छान कॉम्बिनेशन बनले... सकाळचा हा असा something different नाश्ता सर्वांनाच फ्रेश करून गेला..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1/4 किलोमैदा
  2. 1अंड
  3. 6 टेबलस्पूनपिठी साखर
  4. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 4 थेंबव्हॅनिला इसेन्स
  7. 4 टेबलस्पूनबटर किंवा तेल
  8. चिमूटभर मीठ
  9. तळण्यासाठी तेल किंवा तूप
  10. 4 टेबलस्पूनदही
  11. 1सजावटीसाठी कांदा
  12. 4 टेबलस्पूनसजावटीसाठी सॉस

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात मैदा घेऊन त्यात पिठीसाखर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, मीठ, व्हॅनिला इसेन्स, बटर घालून मिक्स करावे मग यात गरजेनुसार दही घालून हे मिश्रण मळून त्याचा एक गोळा तयार करून घ्यावा. या गोळा अर्धा तास झाकून ठेवावा.

  2. 2

    अर्ध्या तासाने या गोळ्याची एक पोळी लाटून घ्यावी. त्या पोळीवर एका ग्लासच्या साहाय्याने डोनट साठी गोलाकार आकार देऊन घ्यावा. त्याच्या मधोमध अजुन एक छोटा गोल आकार करून घ्यावा. जास्तीचे पीठ काढून डोनट बनवून घ्यावे.

  3. 3

    हे डोनट तळण्यासाठी एका कढईत तेल गरम करून मंद आचेवर पूर्ण पणे फ्राय न करता ८०% फ्राय करावे.

  4. 4

    एका बाउल मध्ये अंड घेऊन त्यात मीठ टाकून ते चांगले फेटून घ्यावे. आता हे तळलेले डोनट त्या अंड्यामध्ये घोळवून घ्यावे.

  5. 5

    हे घोळवून घेतलेले डोनट परत तेलात सोडून दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यावे.

  6. 6

    एका प्लेट मध्ये अंड्याचे ऑमलेट करून ते ठेवावे व त्यावर हे डोनट एकावर एक रचून त्यावर सॉस ने झिगझ्याग करावे. बाजूला कांद्याने गर्निश करून हे ऑमलेट डोनट सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes