व्होल व्हीट डोनट्स (whole wheat donuts recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

#डोनट #सप्टेंबर

आज डोनट म्हणताच डोळ्यासमोर येतो त्याचा मेदूवड्यासारखा रिंग शेप. पण सुरुवातीचे डोनटस् असे दिसत नव्हते. सन १८४७ चा गोष्ट आहे, चुनखडकाची वाहतूक करणाऱ्या एका बोटीवरील खलाशी 'हॅनसन ग्रेगरी' हा बोटीच्या स्वयंपाक घरात पिठाची वेगवेगळ्या आकाराची पिळलेली तळणे तळून कंटाळला होता. त्याने बेटीवरच्या एका टिनच्या डब्याच्या मदतीने पिठाच्या गोळ्याला मधोमध गोलाकार भोक पाडले. अशा पद्धतीने आज अमेरिकेसह जगभरात सर्वाधिक प्रचलीत असलेल्या रिंग शेप डोनटचा शोध लागला.

या रिंग शेप डोनट चा शोध लावण्याच्या फार पुर्वी डच वसाहतवादी प्रवासी डोनटची रेसिपी अमेरिकेत घेऊन आले होते. १८०९ च्या एका पुस्तकात वॉशिंग्टन आयर्विंग यांनी एका पुस्तकात या रेसिपी बद्दल 'गोड पिठाचे तळलेले गोळे, ज्यांना डोनट किंवा ओली कोएक (ऑइली केक) म्हणतात' असे लिहून ठेवले आहे. सिनॅमन अर्थात दालचीनीचा स्वाद डोनटस् सोबत अगदी सुरवातीपासून जोडला गेला आहे. तद्नंतर हे डोनटस्, डेझर्ट किंवा स्नॅक्स म्हणून दिवसेंदिवस प्रसिद्धच होत गेले आणि त्यावरील आवरण आणि सजावटीचे असंख्य प्रयोग आजवर केले गेले आहेत. आज गव्हाच्या पिठाचे डोनटस् पारंपारिक पद्धतीने तळून बनविलेले. चॉकलेट ग्लेझिंग आणि स्प्रिंकलर्स ने त्यांना सजवले. आणि अर्थातच काहींना खास सिनॅमन-शुगर कोट केला, एकदम ऑथेंटिक!!!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1तास
४ जणांसाठी
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 1/4 कपसाखर
  3. 1 कपकोमट दूध
  4. 3 टेबलस्पूनबटर
  5. 3 /४ टीस्पून ड्राय यीस्ट
  6. 1 पिंचजायफळ पावडर
  7. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  8. तळण्यासाठी तेल
  9. ग्लेझिंग साठी
  10. 1/2 टीस्पूनदालचिनी पूड
  11. 2 टेबलस्पूनआईसिंग शुगर
  12. 50 ग्रॅमव्हाईट चॉकलेट
  13. 50 ग्रॅमडार्क चॉकलेट
  14. डेकोरेशन साठी
  15. 2 टेबलस्पूनकलर स्प्रिंकलर्स
  16. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

1तास
  1. 1

    प्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता एका बाऊलमध्ये १/२ कप कोमट दूध घ्यावे. त्यात कप साखर व यीस्ट घालून चांगले मिक्स करावे. त्यात १ कप गव्हाचे पीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे आणि २० मिनिटे बाजूला ठेवावे. २० मिनिटानंतर शिल्लक १ कप गव्हाचे पीठ, बटर, vanilla इसेन्स, जायफळ पूड, चिमुटभर मीठ व १/२ कप दूध घालून ५-१० मिनिटे मऊसूत पीठ मळून घ्यावे. पीठ एक ते सव्वा तास झाकून ठेवावे. पीठ चांगले फुलून येते.

  2. 2

    आता थोड्या हलक्या हाताने गोळा मळून थोडा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यावी. (अंदाजे अर्धा इंच). नंतर डोनट कटरने कापून घ्यावे. १० मिनिटे झाकून ठेवावे. आता कढईत तेल घेऊन मंद आचेवर डोनट तळून घ्यावेत. तळताना डोनट छान फुलतात.

  3. 3

    दुसरीकडे डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट वेगवेगळे मेल्ट करून घ्यावे. आणि एका प्लेट मध्ये दालचिनी पूड व आईसिंग शुगर व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता तळलेले डोनट्स मेल्टेड डार्क चॉकलेट, व्हाईट चॉकलेट मध्ये डीप करून कलरफुल स्प्रिंकलर्सने वरून सजवून घ्यावे.

  4. 4

    काही डोनट्स दालचिनी-साखरेच्या मिश्रणात घोळवून सर्व्ह करावे. कलरफुल डोनट्स तय्यार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

टिप्पण्या

Similar Recipes