डलगोना डोनट (dalgona donut recipe in marathi)

डोनट हे खरच आपण घरी बनवू शकतो यावर माझा विश्वास नव्हता.. ते पण इतके स्पाँजी आणि अगदी बाहेर मिळतात तसेच...यीस्ट वैगरे च्या फंदात न पडता.. घरी बनवून मनसोक्त खाता आले... या cookpad मुळे ते आज शक्य झाले.... (नो यीस्ट, नो एग)
तर मी आज थोडेसे वेगळे असे डलगोना डोनट बनविले आहेत.. डोनट हे जनरली आपण चोकलेट गनाश मध्ये डीप करून खातो... पण मी ते डलगोना कॉफी च्या फोम मध्ये डीप करून सर्व्ह केले.. चवीला खूप यम्मी आणि सोबत डलगोना कॉफी च पीत आहोत असेच वाटते....
तर माझ्या सखिंनो जमल्यास तुम्ही देखील असा एक वेगळा प्रयत्न करून हे डलगोना डोनट बनवून नक्कीच ट्राय करा....

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्यात पिठीसाखर, व्हॅनिला इसेन्स बेकिंग सोडा, पावडर, बटर मीठ घालून हे मिश्रण दही घालून मळून घ्यावे. मळलेला हा गोळा अर्धा तास झाकून ठेवावा.
- 2
त्या दरम्यान दलगोना कॉफी चा फोम बनवून घ्यावा. त्यासाठी एका वाटीत कॉफी पावडर, साखर आणि पाणी घालून ते चांगले फेटून घ्यावे. त्याचा रंग बदलेपर्यंत व जाड होईपर्यत ते फेटत राहावे... शेवटी आपल्याला एक जाडसर फोम तयार झालेला दिसेल...
- 3
अर्ध्या तासाने वरील मळलेल्या गोळ्याची एक पोळी लाटून त्याचे डोनट च्या आकाराचे गोल करून घ्यावेत.
- 4
एका कढईत तेल गरम करून त्यात हे डोनट दोन्ही बाजूने चांगले तळून घ्यावेत.
- 5
हे तळलेले डोनट आता कॉफी च्या फोम मध्ये डीप करून घ्यावे. त्यावर चॉकलेट सॉस टाकावा तो पसरवून घ्यावा.
- 6
असे हे दलगोना डोनट एका डिश मध्ये काढून त्यावर कोको पावडर घालून सर्व्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes
- कोकोनट काजू वॉटरमिलन बर्फी (Coconut kaju watermelon barfi recipe in marathi)
- सुके बोंबील आणि बटाटा रस्सा (sukha bombil batata rassa recipe in marathi)
- चपतीचे नुडल्स (chapati noodle recipe in marathi)
- टोमॅटो आँम्लेट पिझ्झा (tomato omelette pizza recipe in marathi)
- क्रिस्पी चकली (crispy chakali recipe in marathi)

टिप्पण्या