पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)

Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397

#GA4 week 2 (Spinach)
पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते.

पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)

#GA4 week 2 (Spinach)
पालक डाळ भाजी हा नागपूर विदर्भातील पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणा समारंभात करतात.अतिशय चविष्ट आणि सात्त्विक अशी आहे.भाकरी, पोळी,भात कशा सोबत ही उत्तम च लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
४-५ जणांसाठी
  1. ५० ग्रॅम तुर डाळ
  2. २५ ग्रॅमसालीची मुग डाळ
  3. 1जुडी पालक
  4. २५ ग्रॅमभिजवलेले शेंगदाणे
  5. २५ ग्रॅमभिजवलेली चणाडाळ
  6. 2 टेबलस्पूनतेल
  7. ८-१० पाने कढिपत्ता
  8. 1 टिस्पून तिखट
  9. 1/2 टिस्पून गरम मसाला
  10. 1/2 टिस्पून धणे पावडर
  11. 1/2 टिस्पून किसलेले आले
  12. 1 टिस्पून मोहरी फोडणीसाठी
  13. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    भिजवलेल्या दोन्ही डाळी धुवून घ्या. डाळ व दाणे एकत्र करून कुकरमध्ये छान शिजवून घ्या. शिजल्यावर हाटून घ्या.

  2. 2

    पालक स्वच्छ धुवून बारीक चिरा.

  3. 3

    कढईत २ टेबलस्पून तेल तापवून त्यात मोहरी, हळद, तिखट, धणेपूड, गरम मसाला, आले किस, कढिपत्ता आणि चिरलेला पालक घालून शिजवा. त्यात मीठ आणि डाळीचे मिश्रण घालून उकळी काढा.

  4. 4

    गरम गरम भाजी घडीच्या पोळी सोबत वाढा. वाटल्यास, वरुन तेलाची खमंग फोडणी किंवा कच्चे तेल घाला.

  5. 5

    टीप- हि भाजी सात्त्विक अशी असल्यामुळे शक्यतो कांदा-लसूण वापरत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim (English)
Pragati Hakim (English) @cook_21693397
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes