कॅरॅमल डोनट (caramel donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम 1/4 कप दूध गरम करून, त्यात दोन चमचे साखर मिसळून एक चमचा यीस्ट घालावे आणि त्याला चांगले फेटून घ्यावे पाच मिनिटात त्याला बाजूला सेट होण्यासाठी ठेवावे
- 2
एका परातीत दीडशे ग्रॅम मैदा घेऊन त्यामध्ये चार चमचे साखर व दोन चमचे मिल्क पावडर घालावीआणि त्याचबरोबर तयार करून घेतलेले यीस्ट चे मिश्रण त्यात घालावे लागत लागत गरजेनुसार त्यात कोमट दूध घालून मऊसर गोळा तयार करून घ्यावा आणि त्यात तीन चमचे बटर घालून मऊसर रगडून घ्यावा
- 3
तयार करून घेतलेला गोळा पंधरा ते वीस मिनिटं रेस्ट करत ठेवावा त्यावर ओला कपडा झाकावा. त्यानंतर त्या पिठाचे गोळे करून डोनट करून घ्यावे
- 4
कट करून घेतलेले लोडर तेलामध्ये मंद आचेवर गोल्डन ब्राउन होईस्तोवर पर्यंत तळून घ्यावे
- 5
डोनट च्या आत सिलिंग करण्यासाठी कस्टर्ड बनवणे घेऊया त्यासाठी दोन टीस्पून कस्टर्ड पावडर एक कप दूध दोन चमचे साखर घालून मंद आचेवर अति कस्टर्ड शिजवून घ्यावे.
- 6
तयार केलेले कस्टर्ड एका इंजेक्शनच्या सीरिजमध्ये घेऊन तयार केलेल्या डोनट मध्ये फील करावे
- 7
अशाप्रकारे आपले डोनेट तयार आहेत सजावटीसाठी वेगवेगळे ड्रायफ्रूट, चॉकोचीप, व्हाइट चॉकलेट, डार्क चॉकलेटडार्क वापरून स्वादिष्ट डोनट तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरweek- 3 माझी ही डोनट ची 3 री रेसिपी आहे.पहिल्यावेळी घरगुती यीस्ट तयार करून केलेले. नंतर मी नेहमी करते ते ,अंड्याचे डोनट बनवलेले.आता तयार यीस्ट वापरून डोनट तयार केले. यावेळी छान नक्षी काढली. फुलांचे डोनेट तयार केले. Sujata Gengaje -
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3कुकपॅड मराठी कडून मिळालेल्या डोन्ट थीम मुळे आज बरेच दिवसांनी मुलांच्या आवडीचे डोन्ट पुन्हा तयार केले पण १० मिनिटात हे डोन्ट फस्तही झाले व पुन्हा करताना जास्त करण्याचे फर्मान निघाले. Nilan Raje -
-
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर#week3आज मी पहिल्यांदाच डोनट घरी केले.माझी 6.5 वर्षांची लेक म्हणाली "आई बाहेर दुकानात मिळतात न त्याहून खूप मस्त लागत आहेत, आता तू घरीच करत जा". यम्मी यम्मी आहेत...हे वाक्य होते तिचे पहिला घास खाल्ल्यावर.आणि बाकीचांना पण इतके आवडले की सगळे अवघ्या 10 मिनिटांत फस्त झाले पण.....चला तर डोनट ची रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
-
-
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबरएक सुंदर सजवलेला गोड पध्दार्थ ज्याला पाहूनच स्वत: ला थांबवणे अवघड होते..तसे हे डोनट्स डच खाद्य संस्कृतीतील,तो त्यांनी अमेरिकेला दिला नंतर त्यात आपापल्या आवडी ने चवीने आणखी सुधारणा झाली अणि आज त्याने सर्व जग व्यापून घेतले.चॉकलेट माझा सगळ्यात मोठ्ठा वीक पॉईंट अणि ते जर डोनट वर केलेले नक्षी काम असो किंवा शुगर स्प्रिंक्लर्स नी सजवलेले असो मी तर म्हणेन की डोनटस् पाहून कोणी ही स्वत: ला हे वाक्य म्हटल्या शिवाय थांबू नाही शकत.... "MAD OVER DONUTS" Devyani Pande -
डोनट/दाल माखनी डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #week3डोनट--*रिश्ता वही सोच नयी*... डोनट हा पाश्चिमात्य संस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारा खाद्यपदार्थ.. नेदरलँड्स मध्ये याचा जन्म होऊन याने पुढे अमेरिका खंडात पाय पसरले..आता तर याची पाळेमुळे जगभर खोलवर रुजली आहेत..सगळ्या पिढीतील लोकांचा आवडता पदार्थ..कारण हे sweet tooth प्रकरण..मी हा पदार्थ आतापर्यंत चाखलाच नाही..MOD shop वरुन कधी चक्कर मारली तर वाटायचे खरंच mad over donut वर का बरं एवढी फिदा ही आजची पिढी.. पाश्र्चात्यांचे अंधानुकरण असं यायचं मनात..माझ्या मुलांना देखील मी म्हणत असे..तर ते मला म्हणायचे..तू खाऊन बघ एकदा ..मग आम्ही या donut साठी का mad आहोत ते कळेल..जेव्हा थीम साठी हा पदार्थ दिला तेव्हां शोधाशोध सुरू केली..बिनअंड्याची रेसिपी हवी होती मला...एकेक रेसिपी बघता बघता लक्षात आले की यातील key ingredientमैदा,साखर,तेलकिंवातूप,तळणे,yeast ..आता 7-8तास आंबवून केलेलं पीठ आणि yeast घालून तयार झालेलं पीठ..साम्य आहेच की..मग लक्षात आले की अरेच्चा आपली #बालुशाही #ईमरती #जिलबी ताई आणि डोनट भाऊंची एकच की वंशावळ...अस्मादिकांना..आणि पहिल्यांदाच डोनट भाऊंना साकारायचा ,त्यांना रंगरंगोटी करुन सजवण्याचा मेकप करायचा घाट घातला..ह्या सगळ्या process मध्ये मी इतकी रंगून गेले होते की..आता कोण mad झालंय..असं डोनट भाऊ चिडवतात की काय असं क्षणभर वाटून गेलं मला..आणि जेव्हां डोनट भाऊंचे मेकप, फोटोसेशन पार पडले आणि त्यांना घेतलं पंगतीला माझ्याबरोबर..पहिल्या घासातच माझं दिल तो पागल है,हुआ असं झालं ना राव Bhagyashree Lele -
क्रीमी चॉकोलेट डोनट (creamy chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरआज मी दुसऱ्यांदा ही रेसिपी करतेय. आज व्हीप क्रीम आणि चॉकलेटने डोनट डेकोरेट केलं आहे. दिसायला छान आहेतच पण टेस्टला पण खूप चांगले लागतात. Sanskruti Gaonkar -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर #4 #Typesडोनट हा लहान मुलांसहित मोठ्यांनाही आवणारा पदार्थ... बरेच दिवस झाले बनवायचे होते पण नाही झाले आता या थीमच्या निमित्ताने करण्याचा योग आला... यात मी चार प्रकारचे डोनट्स बनवले आहेत यातील चौथा प्रकार व्हॅनीला कस्टर्ड स्टफ्ड डोनट्स खूप छान लागतात... माझ्या अपेक्षेपेक्षा पण चांगले... तेव्हा नक्की करून बघा. Ashwini Jadhav -
-
-
एगलेस डोनट (eggless donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरनमस्कार मैत्रिणिनो आज मी तुमच्याबरोबर एगलेस डोनट ची रेसिपी शेअर करत आहे. काल माझी डोनट कोन ही रेसिपी शेअर करून झाली.तसेच हे आपल्या सर्वांचे आवडते मॉलमध्ये मिळणारे कलरफुल डोनट घरामध्ये खूपच सुंदर बनतात आणि तेही कमीत कमी किमतीमध्ये या डोनट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही प्रकारे डेकोरेट करू शकता. या पद्धतीने बनवलेले डोनट खूपच सॉफ्ट आणि टेस्टी लागतात. हे तुम्ही नक्की घरी ट्राय करा व मला अभिप्राय कळवाDipali Kathare
-
चॉकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनेट #सप्टेंबरहा प्रकार मी पहिल्यांदाच करून पाहिला घरात तो सर्वांनाच आवडला.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट#सप्टेंबरआज माझे डोनट थोडे बिघडले पण तरी देखील प्रयत्न केली आणि असे झाले Supriya Gurav -
-
-
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरएगलेस आणि यीस्ट न वापरता डोनट बनवले आहेत. Ranjana Balaji mali -
-
डोनट (donut recipe in marathi)
# डोनट#सप्टेंबर :डोनट हा पदार्थ खाल्ला होता.पण केला कधी नाही. कुकपॅड थीमनुसार हा पदार्थ बनवायचा प्रयत्न करीत आहे गुगलवर सर्च करून हा पदार्थ बनवत आहे.बिना दह्याचा, यीस्ट,अंड्या पासून हा पदार्थ बनवीत आहे .लहान मुलांना हा पदार्थ खूप आवडतो. rucha dachewar -
डोनट (donut recipe in marathi)
# डोनट #सप्टेंबर मी कधी बनवले नाहीत पण आज या कूकपड थीम मुले म्हणलं चला नवीन काही शिकुयात मग काय केले डॉनट्स खुपच मस्त झाले. Shubhra Ghodke -
डोनट (donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबरलहान मुलांना आवडणारा पदार्थ म्हणजे डोनट. तर चला बघूया सोप्यात सोप्या पद्धतीने घरच्या घरी ईस्ट आणि अंड्याशिवाय मुलांचे आवडते डोनट्स कसे बनवायचे. Snehal Bhoyar Vihire -
चाॅकलेट डोनट (chocolate donut recipe in marathi)
#डोनट #सप्टेंबर डोनट हे लहान मुलांन पासुन मोठयांन परंत सगळयांना आवडतात मला कधी असे वाटले नवते की मला पण डोनट बनवता येतील पण कुकपॅड ने तर हळुहळू सगळेच बनवायला शिकवले आता डोनट बनवले खुप छान झाले आवडले सगळयांना Tina Vartak -
-
-
More Recipes
- मेथी दाण्यापासून बनवा कॉफी ती ही कॉफी पावडर न वापरता (methi dane pasun cofee recipe in marathi)
- तोंडली मसाले भात (tondali masala bhat recipe in marathi)
- सावजी पाटोडी (saoji patodi recipe in marathi)
- मेथीदाणे कॉफी (methidane coffee recipe in marathi)
- झणझणीत मसाले वांगी (masala vanga recipe in marathi)
टिप्पण्या (2)