ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

#GA4#week4#chutenyचटणी इडली डोसा उत्तप्पा केला की आमच्याकडे नेहमी होते खूप छान लागते तुम्हीही करून बघा

ओल्या खोबऱ्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)

#GA4#week4#chutenyचटणी इडली डोसा उत्तप्पा केला की आमच्याकडे नेहमी होते खूप छान लागते तुम्हीही करून बघा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
सहा
  1. 1नारळ
  2. 1 कपकोथिंबीर
  3. 2हिरव्या मिरच्या
  4. 2छोटे चिंचेचे तुकडे
  5. 1 टीस्पूनजिरे
  6. 2 टेबलस्पूनसाखर
  7. चवीनुसारमीठ
  8. 1 टेबलस्पूनफुटाण्याची डाळ
  9. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  10. 7-8कडीपत्त्याची पाने
  11. 5-6लसूण पाकळ्या
  12. 1/2 टीस्पूनआल्याची पेस्ट
  13. 1 टेबलस्पूनतेल
  14. 1 टीस्पूनमोहरी
  15. 1/2 टीस्पूनहिंग
  16. 2लाल मिरच्या

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    प्रथम नारळ फोडून घ्यावा. त्यातील खोबरे काढून बारीक चिरून घ्यावे.

  2. 2

    एका मिक्सरच्या भांड्यात आधी खोबरे बारीक करून घ्यावे. नंतर त्यात कोथिंबीर, शेंगदाणे, हिरवी मिरची, चिंच घालून वाटून घ्यावे.

  3. 3

    नंतर त्यात साखर, मीठ, जिरे, लसुन घालून परत वाटून घ्यावे. आता त्यात पाणी घालावे आणि एकदम बारीक वाटून घ्यावे.

  4. 4

    आता एका छोट्या कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी घालून तडतडू द्यावी. आता त्यात हिंग घालून गॅस बंद करावा आणि लाल मिरच्या घालाव्यात. चांगले हलवून हा तडका चटणीवर घालावा. आपली चटणी तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes