रवा मेथी लाडू (rava methi ladoo recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#GA4 #week2
#puzzle word fenugreek
आज मी सोनल बेलोसे- कायंदेकर यांची मेथीचे लाडूची रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या सामानातून बनविली. खूप छान झाले. धन्यवाद सोनल...

रवा मेथी लाडू (rava methi ladoo recipe in marathi)

#GA4 #week2
#puzzle word fenugreek
आज मी सोनल बेलोसे- कायंदेकर यांची मेथीचे लाडूची रेसिपी घरात उपलब्ध असलेल्या सामानातून बनविली. खूप छान झाले. धन्यवाद सोनल...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
१५ जण
  1. ५०० ग्रॅम बारीक रवा
  2. २०० ग्रॅम गव्हाचे पीठ
  3. ५० ग्रॅम मेथी
  4. २५० ग्रॅम साखर
  5. 1 टेबलस्पून वेलचीपूड
  6. 1 टीस्पूनसुंठपुड
  7. २०० ग्रॅम तूप
  8. 2 टेबलस्पून ड्रायफ्रूटस(ऐच्छिक)

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम रवा तुप घालून चांगला भाजून घ्या. मी microwave मध्ये १५ मिनिटे भाजला (microwave मध्ये ३ मिनिटे, २ मिनिटे पुढे प्रत्येक 2 मिनिटाला बाहेर काढून ढवळायचे म्हणजे खाली लागणार नाही असा थोडा लालसर दिसेपर्यंत भाजून घ्या) नंतर गव्हाचे पिठही अश्याच प्रकारे लालसर होईपर्यंत २० मिनिटे भाजुन घ्या.

  2. 2

    रवा व गव्हाचे भाजलेले पीठ थंड झाले की त्यात पिठीसाखर, मेथी भाजून केलेली पावडर, वेलचीपूड, सुंठपुड घाला. चांगलं मिक्स करा.

  3. 3

    आता मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

टिप्पण्या

Similar Recipes