तांदळाच्या उकडीची चकली (tandul ukad chakali recipe in marathi)

Shital shete
Shital shete @Shital_123
Pune

#रेसिपीबुक #week15 #चकली
रेसिपी कुरकुरीत खमंग चकली म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ . दिवाळीच्या फराळामध्ये ही सगळ्यात जास्त भाव खाऊन जाते ती ही चकली. पण चकली करण म्हणजे तस वेळखाऊ आणि मेहनतीच काम. पण ही तांदळाच्या पिठाची चकली खूप झटपट होते . छान कुरकुरीत बनते . आणि मेहनत ही कमी लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
4  सर्व्हिंग्स
  1. 1 कपतांदळाचे पीठ
  2. 1/4 कपबेसनपीठ
  3. 1 कपपाणी
  4. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  5. 1 टीस्पूनधने जिरे पावडर
  6. 1/2 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनओवा
  8. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  9. चवीनुसार मीठ
  10. तेल

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात तांदळाचे पीठ व बेसनपीठ एकत्र करून घ्या. त्यात हळद,मीठ,लाल मिरची पावडर, धने जिरे पावडर घाला.

  2. 2

    व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता त्यात ओवा आणि तीळ घाला. मिक्स करून घ्या.

  3. 3

    एका पातेल्यात पाणी गरम करून घ्या. पाण्याला उकळी आली कि हे मिक्स केलेले पीठ त्या पाण्यात टाका मिक्स ठेव घ्या. गॅस बंद करून दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवा. नंतर पाणी न घालता घट्ट पीठ मळून घ्या.

  4. 4

    चकलीच्या साचा ला आतून तेल लावून घ्या.त्यात हे मळलेलं पीठ घाला व चकली करून घ्या.

  5. 5

    कढईत तेल गरम करून चकली कुरकुरीत होईपर्यंत सोनेरी रंगावर तळून घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital shete
Shital shete @Shital_123
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes