चकली (Chakali Recipe In Marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#अन्नपूर्णा
चकली हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणून महाराष्ट्रात बनविला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक मराठी घराघरातून फराळाचे निरनिराळे सुवास येत असतात यातलाच एक खमंग सुवास असतो तो चकलीचा सुवास दिवाळीच्या फराळातील अतिशय आवडता पदार्थ अर्थात चकली पण खमंग आणि रुचकर चकली तेंव्हाच तयार होते जेंव्हा तिची भाजणी छान जमून येते, चकलीची भाजणी मी कूक पॅड वर पोस्ट केली आहे, चला मग आज चकली बनवूया ......

चकली (Chakali Recipe In Marathi)

#अन्नपूर्णा
चकली हा दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणून महाराष्ट्रात बनविला जातो. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रत्येक मराठी घराघरातून फराळाचे निरनिराळे सुवास येत असतात यातलाच एक खमंग सुवास असतो तो चकलीचा सुवास दिवाळीच्या फराळातील अतिशय आवडता पदार्थ अर्थात चकली पण खमंग आणि रुचकर चकली तेंव्हाच तयार होते जेंव्हा तिची भाजणी छान जमून येते, चकलीची भाजणी मी कूक पॅड वर पोस्ट केली आहे, चला मग आज चकली बनवूया ......

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. चकली बनवण्यासाठी
  2. 4 कप भाजणी पीठ
  3. 4 कप पाणी
  4. 4 टीस्पून मीठ
  5. 1 टीस्पून हळद पावडर
  6. 6 टीस्पून मिरची पावडर
  7. 2 टीस्पून तीळ
  8. 1 टीस्पून ओवा
  9. 4 टीस्पून तेल

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    सर्व प्रथम एका कढईत भाजणी साठी लागणारे सर्व साहित्य मध्यम गॅसवर न जळता खमंग असे भाजून घ्यावे. भाजून झाल्यानंतर सर्व साहित्य एका परातीत किंवा पसरट भांड्यात काढून हाताने मिक्स करून घ्यावे‌. मिक्स करून झाल्यानंतर चपाती किंवा भाकरीच्या पिठापेक्षा थोडेसे जाडसर दळून घ्यावे. एका कढईत किंवा खोलगट भांड्यात पाणी उकळून घ्यावे. इथे मी चार वाट्या पिठासाठी चार वाटी पाणी घेतले आहे (जी वाटी पिठासाठी घ्याल तीच वाटी पाणी मोजण्यासाठी घ्यावी)

  2. 2

    पाण्यात तेल, लाल मिरची पावडर, हळद, ओवा, सफेद तीळ आणि चवीनुसार मीठ घालून सर्व एकजीव करून पाणी चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर गॅस बंद करून या मसाल्याच्या पाण्यात तयार केलेले भाजणीचे पिठ घाला.सर्व मिक्स करून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे

  3. 3

    आत्ता ही तयार केलेली उकड एका परातीत किंवा पसरट भांड्यामध्ये काढून घ्यावे पीठ मळून घ्यावे. (जेवढे पीठ घेऊ तेवढेच पाणी घेतल्याने पीठ मळताना परत पाण्याची आवश्यकता पडत नाही तेवढ्या पाण्यातच चांगले पीठ मळले जाते) आणि पीठ मळ्या नंतर १०-१५ मिनिटे पिठाचा गोळा झाकून ठेवावा १५ मिनिटानंतर पिठाचा गोळा पुन्हा थोडासा मळून घ्यावा.

  4. 4

    त्यानंतर चकलीच्या साच्याला आतून तेलाचा हात फिरवून साच्यामध्ये मावेल इतका गोळा भरून घ्यावा. आता साच्याने जास्त मोठ्या व छोट्या न करता मध्यम आकाराच्या गोल गोल चकल्या पाडून घ्याव्यात.

  5. 5

    आणि गरम तेलात मध्यम गॅसवर चकल्या कुरकुरीत अशा तळून घ्याव्यात. या भाजणीच्या चकल्या एका हवाबंद डब्यात १ महिन्यापर्यंत ठेवू शकता. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या चकल्या तयार होतात

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes