पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week15
आजची रेसिपी माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण आज कूकपॅड वर माझ्या रेसिपी चे शतक पूर्ण होत आहे. आजची रेसिपी बुक ची शेवटची रेसिपी आणि तीही शंभरावे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे. जिलबी हा आमच्या घरात सगळ्यांचा फेवरेट गोड पदार्थ. आयुष्यात कधीही न केलेली जिलबी मी या लॉकडाउनच्या मार्च महिन्यात सर्वात प्रथम केली होती. तेव्हा खूपच धडपड करत मी जिलब्या केल्या होत्या पण यावेळी मात्र आधीच्या अनुभवामुळे जिलब्या करणं खूपच सोपं गेलं.युट्युब वरून घेतलेली आजची ही पनीर जिलेबी रेसिपी इतकी सोपी आहे की पंधरा मिनिटात 14 ते 15 जिलब्या तयार झाल्या सुद्धा आणि त्याही मस्त पाकात मुरलेल्या कुरकुरीत आणि खास पनीरची चव असलेल्या. चला तर मग आपण बघूया माझी ही शंभरावी रेसिपी....माझ्याकडून कूकपॅड टीमला खास धन्यवाद.
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात एक वाटी साखर आणि ती बुडेल एवढे पाणी घालून साधारण एक तारी पाक तयार करून घ्या पाक उकळताना त्यात केशराच्या काड्या आणि वेलची पावडर टाका.
- 2
मिक्सरच्या भांड्यामध्ये पनीर कुस्करून घ्या आणि त्यात तीन टेबलस्पून मैदा व एक चतुर्थांश कप दूध, लाल रंगाचे दोन थेंब घालून फिरवून घ्या. नंतर त्यात चिमूटभर सोडा घालून परत एकदा मिश्रण मिक्सर मधून फिरवून घ्या.
- 3
एक प्लास्टिकची पिशवी किंवा पायपिंग बॅग घेऊन त्यामध्ये छोटे स्टार नोझल घालून बनवलेले हे मिक्सर मधील मिश्रण भरा. कढईमध्ये तूप तापायला ठेवा आणि पायपिंग बॅग च्या साह्याने तुम्हाला हव्या त्या आकाराच्या जिलब्या त्या मध्यम तापलेल्या तुपात पाडा. गॅसची आच मंद ते मध्यम ठेवा.
- 4
तळून झालेल्या जिलब्या तयार केलेल्या गरम पाकामध्ये दोन ते तीन मिनिटे बुडवून ठेवा. पाकातून निथळून या छान पनीर जिलब्या खायला एकदम रेडी.
प्रतिक्रिया
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
पनीर जिलेबी (paneer jalebi recipe in marathi)
#कुक स्नॅप आज मी आपल्या ऑर्थर प्रज्ञा पुरंदरे ह्यांची पनीर जिलेबी रेसिपी करून बघितली खुपच छानधन्यवाद प्रज्ञा🙏 Chhaya Paradhi -
पनीर जिलेबी (Paneer Jalebi Recipe In Marathi)
#'KS #किड्स स्पेशल रेसिपीस #जिलेबी मुलांचा आवडता पदार्थ म्हणुन आज बालदिना निमित्त मी खास माझ्या मुलाची आवडती पनीर जिलेबी बनवली आहे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15#जिलेबीजिलेबी म्हटले की सर्वांना च आवडते आणि गरम गरम समोर आली की जिभेवर च ताबाच सुटतो , आज रेसिपी बुक चा शेवट चा आठवडा आणि शेवटची रेसिपी ..आज रेसिपी बुक कंप्लीट झाली Maya Bawane Damai -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#cooksnap#re-createमी ही रेसिपी सौ.प्रीती साळवे यांच्या रेसिपी वरुन बनावयाचे प्रयत्न केला आहे Bharti R Sonawane -
जिलबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकलीआणिजिलबी रेसिपीpost2रेसिपी बुक ची सुरुवात जशी गोडाच्या पदार्थ ने झाली तसेच रेसिपी बुक चा शेवटचा पदार्थ देखील गोड पदार्थ ने करुया म्हणूनच गरम गरम साजूक तूपातील जिलबी म्हणजे बहुतेक सर्वांच्या आवडीची.आता ह्याच जिलबी वर मस्त रबडी घालून खाण्याचा ट्रेंड सध्या आहे.जिलबी पण अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते पनीर जिलबी,रव्याची जिलबी वगेरेआज आपण पटकन झटपट तयार होणारी रेसिपी बघणार आहोत.एकदा तुम्ही घरी जिलबी तयार केली की बघता बघता कधी फस्त होईल कळणार पण नाही. Nilan Raje -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक#week15जिलेबी हा काही केवळ एक गोड पदार्थ नाही. तो संस्कृतींना जोडणारा आणि संबंधातला गोडवा टिकणारा दुवा आहे. लग्नाच्या पंगतीत जिलेब्यांची किती ताटे उठली, या वरुन पंगतीत पाहुणे किती आणि कसे जेवले याचा अंदाज लावला जातो. पैजा लावून जिलेब्या खाणे, हा खाणाऱ्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा आणि पाहणाऱ्यांसाठी मनोरंजनाचा एक जुना खेळ आहे. या जिलेबी बाईची चव ज्याने चाखली तो तिच्या प्रेमात पडलाच म्हणून समजा. म्हणून तर अनेक राजे-महाराजे, आमिर-उमराव, राजकीय नेते-त्यांचे पक्ष आले गेले, पंचतारांकित हॉटेलांपासून नाक्या-नाक्यावरच्या हलवायाच्या दुकानापर्यंत जिलेब्यांच्या थाळ्या रोज तयार होत असतात.जिलेबीचा मुळ उगम नेमका सांगणे कठिण असले तरी प्राचिन पर्शिया पासून ऊत्तर पश्चिमी भारतापर्यंत त्याची पाळेमुळे सापडतात. जिलेबीची खासियत हिच की तीला कुणीही परके मानले नाही. ती जिथे गेली ती तिथली झाली. कुणी तिला रबडीत बुडवून खाल्ले तरुणी मठ्ठा सोबत. कुणी केशर टाकून तर कुणी ड्राय फ्रूट टाकून मटकावले. आमच्या घरी स्वातंत्र्यदिनाला न चुकता जिलेबी खाण्याची प्रथा आहे. नवरात्रीच्या गरब्याच्या जागरणाने उसळू पाहणाऱ्या पित्ताला शमवण्यासाठी जिलेबीच हमखास इलाज असते!साखरेच्या पाकात ओथंबून भिजलेली दाताखाली टच् कन फुटते आणि मधुर पाक जिभेवर पसरण्याचा जो एक क्षण असतो... आहाहा! त्यालाच स्वर्ग सुख म्हणतात!!! Ashwini Vaibhav Raut -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलब्या गरमागरम असताना किंवा निवल्यानंतर, अश्या दोन्ही अवस्थांमध्ये खाल्ल्या जातात. काहीसा चिवटसर, परंतु काही अंशी कुरकुरीत असा संमिश्र पोत असलेल्या या पदार्थास हाताच्या पंजाएवढ्या विस्ताराच्या अनेक वळ्या किंवा वेटोळी असतात. तेलात तळल्यावर पिठाचा रंग तांबूस-केशरी होतो. या वेटोळ्यांच्या बाह्यावरणावर साखरपाकाचा थर असतो. पदार्थाचा वास व स्वाद खुलवायला या साखरपाकात काही वेळा गुलाबपाणी, केवड्याचा सुगंध, तसेच लिंबाचा रस यांसारखे अन्य घटकपदार्थ मिसळले जाऊ शकतात. Purva Prasad Thosar -
कुरकुरीत जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबी आणि चकली रेसिपीजिलेबी न आवडणारी व्यक्ती फार कमी सापडेल आपल्याला. जिलेबी अनेक प्रकारची बनवली जातात खवा जिलेबी, सफरचंद जिलेबी, तुपातली जिलबी,रवा जिलेबी इ.आज आपण झटपट बननारी जिलेबी बघणार आहोत. Supriya Devkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15# जिलेबी रेसिपी बुक चँलेज साठी सुरवात जशी गोड पदार्थापासून झाली तसा शेवट देखील गोड पदार्थ नेच झाला खुप छान वाटले या मध्ये सहभागी होऊन व नवीन नवीन प्रकार प्रयोग कला आणि प्रेझेंटेशन बघून खुप छान वाटले व या माध्यमातून नवीन नवीन मैत्रीण भेटल्या थँक्स कल्पना मँम आणि अंकिता मँम हा सुंदर प्लाटफामँ मिळवून दिल्या बद्दल धन्यवाद हा तर पहिला प्रयत्न होता अजून खुप काही नवीन गोष्ट शिकणार आहोत Nisha Pawar -
पनीरसंत्रा् जिलबी (paneer santra jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week15 #चकलीआणि जिलेबीजिलेबी म्हणजे फेमस महाराष्ट्रीयन मिठाई सगळ्या लग्नकार्यात जिलबी हि असतेच म्हणूनच मी पनीर संत्रा जिलबी केली खूप छान झाली. Deepali dake Kulkarni -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week 15जिलेबी घरी बनवायची ही आयडिया मस्त झाली त्यामुळे ती घरी बनवायचा योग आला. लग्नात, अथवा बारशाच्या कार्यक्रमात तोंड गोड करणारी जिलेबी मला फार आवडते . म्हणूनच मी हे चॅलेंज घेतले व घरी जिलेबी बनवली Shubhangi Ghalsasi -
पोहे पीठ - जिलेबी (pohe jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15चकली आणि जिलेबी रेसिपीजआज पहिल्यांदा मी जिलेबी घरी केली. पण बऱ्यापैकी जमली करायला. सुरवातीला पीठ पातळ झाल्यामुळे त्या जिलेबीचा वडा झाला. म त्यात थोडे पीठ घातले आणि नंतर केल्या, तेव्हा जिलेबी चा फिल आला.....सुरुवातीला जेव्हा जमली नाही तेव्हा मला हादग्याचे गाणे आठवले ... हरिच्या नैवेद्याला केली, पानात जिलेबी बिघडली... प्रभूच्या नैवेद्याला केली जिलेबी बिघडली ...नंतर म्हंटल की एक लास्ट ट्राय करू... आणि जर नाही जमली तर त्या पिठाची भजी करून पाकात घालू आणि खाऊ ...पण शेवटी जमली बर, जिलेबी .... म अस झाले जीभ खाते आणि पडजीभ वाट पाहते... खूपच मस्त झाली होती ... Sampada Shrungarpure -
रताळ्याची स्वादिष्ट जिलबी (ratalyachi jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15जिलबी हे खूप लोकप्रिय पक्वान्न आहे. पारंपरिक जिलबी मैद्याची करतात. पण आणखी बऱ्याच प्रकारे जिलबी केली जाते. माव्याची बुऱ्हाणपुरी जिलबी अतिशय स्वादिष्ट लागते. पण ती जिलबी करायला जरा कठीण आहे. त्या चवीच्या जवळपास जाणारी ही रताळ्याची जिलबी करायला सोपी आहे आणि पटकन होते. शिजवलेल्या रताळ्यात कॉर्न फ्लोअर आणि दुधाची पावडर घालून मी ही जिलबी केली. खूप स्वादिष्ट झाली जिलबी. Sudha Kunkalienkar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #जिलेबीजिलेबी ही रेसिपीबुक साठी "शेवट गोड करी" रेसिपी आहे.जिलेबी हा पदार्थ नैवेद्यासाठी ठेवतात तसेच शुभेच्छा देताना प्रामुख्याने तोंड गोड करताना असतोच. काही ठिकाणी लग्नामधील जेवणात जिलेबी हा गोड पदार्थ असतो. जेवणाच्या पंगतीमधे नवरा-नवरी एकमेकांना जिलेबीचा घास भरवून उखाणा घेतात, हा एक छानसा विधी असतो. थोडीशी आंबटगोड आणि कुरकुरीत चविची जिलेबी खायला खूप छान लागते. आमच्या कडे सगळ्यांनाच जिलेबी खूप आवडते. माझी लेक तर फक्त घरी केलेल्या जिलब्याच आवडीने खाते. आज Daughter's Day आहे म्हणून मी लेकीच्या आवडीची जिलेबी बनवली. याची रेसिपी देत आहे Ujwala Rangnekar -
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 जिलेबी व चकली रेसिपी यातील रेसिपी-2ही जिलेबी झटपट होणारी आहे.जिलेबी पण मस्त कुरकुरीत होते. Sujata Gengaje -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#post 2#गोड चकलीआज रेसिपीबुक चा शेवटचा आठवडा. खुप छान होता हा प्रवास. वेगवेगळ्या थीम & त्यावर आधारित रेसिपी ...खुप मज्जा आली. भरपूर शिकायला मिळाले. जिलेबी थीम घेऊन या चॅलेंज जी सांगता गोडा ने झाली. Thanks cookpad & अंकिता मॅम Shubhangee Kumbhar -
जलेबी कुरकुरीत होममेड (jalebi recipe in marathi)
#cooksnap#jalebi#jilbiजिलबी अर्थात मराठीत जिलबी म्हणुन ओळखला जाणारा हा पदार्थ खुप प्रसिध्द आहे तो त्याच्या चवीमुळे आणि त्याच्या दिसण्यामुळे देखील. खरं तर हा असा पदार्थ आहे जो बनवण तसं फार सोप आहे आणि सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा असा हा पदार्थ आहे. गोड पदार्थांमध्ये ब-यापैकी स्वस्त आणि खायला मस्त असं या पदार्थांचं वर्णन आपल्याला करता येईल. Payal Nichat -
रसमलाई केक (rasmalai cake recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9फ्युजन रेसिपी ...सॉलिड थीम ...मधली माझी दुसरी रेसिपी पण केक चीच आहे.केक आणि बंगाली मिठाई ह्यांचे फ्युजन करून मस्त रसमलाई केक केला.माझ्या बहिणीच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि केक तर करणारच होते शिवाय एक मिठाईचा पदार्थ म्हणून रसमलाई केली.आणि फ्युजन करून रस मलाई केक केला.सुपर्ब झालेला.दिसायलाही आणि चवीलाही Preeti V. Salvi -
-
-
इन्स्टंट जलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 Theme जलेबी रेसिपी स्वीट आणि टेस्टी जिलेबी सर्वांना आवडते मी पहिल्यांदाच जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ते छान मस्तपैकी झाले. Najnin Khan -
पनीर बटण
#पनीरमी घरीच पावून लिटर दुधापासून बनवलेले पनीर वापरले आहे. पनीर पासून मी आज स्पेशल पनीर बटण ही रेसिपी बनवली आहे, बघा, तुम्हाला आवडते का ते....... Deepa Gad -
इन्स्टंट जिलेबी (instant jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#जिलेबीजिलेबी हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. पारंपरिक पद्धतीत जिलेबीचे पीठ अंबून मग जिलेबी केली जाते,पण आपण आजकल इन्स्टंट जिलेबी बनवतो, त्यातलाच हा एक प्रकार मी केला आहेअशी ही झटपट होणारी जिलेबी एकदा नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
-
रवा जिलेबी (rava jalebi recipe in marathi)
इफेक्ट नाहीतर गरज ही शोधाची जननी आहे असे म्हणतात ते काही खोटे नाही बरं!! Monali Garud-Bhoite -
-
जिलेबी (jalebi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15#चकली आणि जिलेबीआनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी गोडा मध्ये जिलेबी असेल तर मग त्या क्षणाचे महत्व काहीतरी वेगळे होते आणि तो क्षण जर रेसिपी बुक ची सांगता असेल तर मग सोने पे सुहागा. माझी शेवटची रेसिपी.हलवा इकडे भेटते तशी जिलेबी नाही पण आपण घरातच अशाप्रकारे जिलेबी करू शकतो आणि आपल्या आनंदाचा क्षण द्विगुणीत करू शकतो. Jyoti Gawankar -
-
जत्रेतील जिलेबी (jalebi recipe in marathi)
#KS6#जत्रेतील जिलेबीहा गोडाचा पदार्थ प्राचीन इतिहासापासून आजतागायत लोकप्रिय आहे. कुठल्याही शुभ प्रसंगी जिलेबी ही आवर्जून केल्या जाते. जत्रेमध्ये हमखास गरम-गरम जिलेबीचे स्टॉल हा असतोच. आता जिलेबी सोबत रबडी दही असा खाण्याचा प्रघात आहे. आमच्या घरी जिलेबी मुलांना फार आवडते. कुरकुरीत जिलेबी आणि रबडी हे लाजवाब कॉम्बिनेशन आहे. Rohini Deshkar
टिप्पण्या