मिक्स व्हेज इटालियन चीज सँडविच (mix veg cheese sandwich recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिटे
6,7 पोटली
  1. 4ब्रेड स्लाइस
  2. 1/4 टीस्पूनमिरी पावडरपावडर
  3. 1/4 टीस्पूनमिक्स herbs
  4. 1चीज क्यूब
  5. 1शिमला मिरची मध्यम आकारा
  6. 1कांदा मध्यम आकाराचा
  7. 1गाजर मध्यम आकाराचं
  8. 3,4बटन मशरूम
  9. 2 टेबलस्पूनस्वीटकॉर्न
  10. 1 टेबलस्पूनफ्रोजन वाटाणे
  11. 2 टेबलस्पूनमेयोनेज
  12. 1 टीस्पूनमीठ
  13. 2चीज क्यूब किंवा चीज स्लाईस
  14. बटर सँडविच तयार करण्याकरीता

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून पुसून बारीक चिरून घ्याव्यात.

  2. 2

    आता एका पॅनमध्ये बटर टाकून त्यामध्ये सर्व भाज्या क्रमाक्रमाने टाकून छान मिक्स करून परतून घ्याव्यात.

  3. 3

    नंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स,मिक्स herbs,मिरे पावडर, मीठ टाकून परत मिक्स करून दोन-तीन मिनिटे होऊ द्याव्यात.जास्त शिजू देऊ नये

  4. 4

    भाज्या शिजवून झाल्या की त्यामध्ये मेयोनेज टाकून मिक्स करून घ्यावे.

  5. 5

    आता ब्रेडची एक स्लाइज त्याला बटर लावून घ्यावे. व त्यावर हे भाज्यांचे मिश्रण टाकावं. व चीज किसून घ्यावा.

  6. 6

    मग या ब्रेडवर दुसरी ब्रेड ठेवून वरून त्या ब्रेडला सुद्धा बटर लावून घ्याव. व सँडविच मेकर मध्ये ठेवून दोन-तीन मिनिटे होऊ द्यावे.

  7. 7

    सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा सँडविच तयार करू शकता.आता आपले सँडविच बनवून तयार आहेत तुम्ही याला सॉससोबत सुद्धा खाऊ शकता किंवा तसेच सुद्धा खाऊ शकता.

  8. 8

    करून बघा आणि सांगा मिक्स व्हेज इटालियन सँडविच कसे लागतात तर🤩

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes