भाजणीचे थालिपीठ (bhajaniche thalipeeth recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#पश्र्चिम #महाराष्ट्र
पश्र्चिम महाराष्ट्र भागात जवळपास घरोघरी केले जाणारे खमंग खुसखुशीत भाजणीचे थालिपीठ प्रसिद्ध आहे. हे खायला पौष्टिक आणि हलके असते. नाश्ता किंवा जेवणासाठी केला जाणारा आवडीचा पदार्थ आहे. यामधे वेगवेगळी धान्य भाजून त्यात थोडाच मसाला आणि कांदा मिरची, लसून घालून करतात. जर भाजणीचे पीठ नसेल तर घरी उपलब्ध असलेली दोन, तीन पिठं सुकीच भाजून पण त्याचे थालीपीठ बनवलं तर छानच खमंग लागतं. बाजारात पण तयार भाजणीचे थालीपीठाचे पीठ मिळतं.
महाराष्ट्रातील घरांमधे कधी जर कोणी घरी भुकेने आला तर त्याला पटकन थालीपीठ करुन देण्यासाठी आजी, आई, काकी, मामी अग्रेसर असतात. गरमागरम खमंग खुसखुशीत दोन थालीपीठं जरी खाल्ली तरी मस्त पोट आणि मन तृप्त होतं. थालीपीठा बरोबर लोण्याचा गोळा असेल तर पर्वणीच असते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम भाजणीचे पीठ
  2. 3मोठे कांदे
  3. २० लसून पाकळ्या
  4. 2हिरव्या मिरच्या
  5. 1 वाटीकोथिंबीर
  6. 2 टीस्पूनतिखट पूड
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 2 टीस्पूनमीठ
  9. 2 टीस्पूनधणे-जीरे पूड
  10. 2 टीस्पूनगोडा/काळा मसाला
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. 1 टीस्पूनओवा
  13. 2 टीस्पूनभाजलेले तीळ

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    भाजणीचे पीठ एका वाटी मधे काढून घ्यावे. कांदे, कोथिंबीर आणि मिरच्या बारीक चिरुन घ्या, लसून बारीक ठेचून घ्या.

  2. 2

    भाजणीच्या पिठात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरच्या आणि ठेचलेला लसूण घालून वरील सर्व तिखट, मीठ, मसाले आणि एक चमचा तेल घालून लागेल तसे पाणी घालून पीठ मळावे. पीठ जास्त सैल किंवा जास्त घट्ट मळू नये. मग पोलपाटावर ओला कपडा घालून त्यावर थालीपीठचा गोळा हाताला जरा पाणी लावून थापावा. मधून पण त्याला मधे बोटने भोकं करावी.

  3. 3

    तव्यावर थोडं तेल घालून त्यावर थालीपीठ घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावी.

  4. 4

    एका प्लेटमधे गरमागरम खमंग खुसखुशीत भाजणीची थालिपीठं ठेवून बरोबर लोणी आणि लसूण चटणी ठेवून थालीपीठं सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

टिप्पण्या (4)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @chhaya1962
उज्वलाताई मी आज तुमची थालिपिठ बघुन . च थालिपिठ बनवली भाजणी थोडी वेगळ्या पद्धतीची आहे.

Similar Recipes