जवसाची चटणी (jawas chutney recipe in marathi)

Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
यवतमाळ

#GA4 #week4
#चटणी जवसाची चटणी मैत्रिणींनो सांगायचं झालं असं की या गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड चटणी आहे.
. माहेरची आठवण पंधरा वर्षापासून माझ्या घरी साठवून ठेवलेली ही शिदोरी जवस आहे. ही शिदोरी मी वर्षातून एकदाच उघडते आणि ते पण श्रावण महिन्यामध्ये महादेवाला शिवमूठ वाहण्याकरिता. नंतर हा डब्बा बंद होतो तो दुसऱ्या वर्षीच उघडण्या करिता. मैत्रिणींनो सांगायचं झालं असं की माझ्या माहेरी शेतीचा व्यवसाय आहे. आणि सगळेच कडधान्य शेतामध्येच उगवल्या जातात पंधरा वर्षे अगोदर जवळच राहत होते आता नाही राहात आता कापूस असतो. मी तेव्हापासून जपून ठेवलेले जवस ते माझ्या आता कामाला आले ते पण माझ्या घरचे शेतातून उगवलेले त्याची चटणी तर मला गोड लागेल आणि त्याचा खाण्याचा आनंद आहे की तो मी सांगू शकत नाही माझ्या माहेरच्या शेतातून त्या मातीतून निघालेला जे माझ्या वडलोपार्जित कष्टांनी कमवलेली शेती जे सांगता नाही माझ्या डोळ्यात पाणी येते माझ्या आजोबा ची आठवण.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१० मिनिट
  1. 1 वाटीजवस
  2. 1 टेबलस्पूनतिखट
  3. 7-8लसूण पाकळ्या
  4. 1 टिस्पून जिरे
  5. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१० मिनिट
  1. 1

    जवस चाळुन माती खळे सगळे काढून छान स्वच्छ करून घ्या आणि कमी गॅसवर एका पातेल्यामध्ये सात ते आठ मिनीट भाजून घ्यायचं तळेतळे पर्यंत.

  2. 2

    जवस थंड झाल्यानंतर मिक्सर च्या पॉट मध्ये तिखट, जवस, लसून पाकळ्या, जिरे, मीठ घालून बारीक करून घ्या.

  3. 3

    झटपट जवसाची चटणी तयार दहा मिनिटांमध्ये तुम्ही ती पोळीसोबत भाकरीसोबत तेल घालून होऊ शकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Jaishri hate
Jaishri hate @cook_22865448
रोजी
यवतमाळ

टिप्पण्या

Similar Recipes