गोडा मसाला (goda masala recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

महाराष्ट्र नि गोडा मसाला यांचे एकदम गुळपीट आहे बर का ? महाराष्ट्रात खुप जाती जमाती मधे जेवणात हा मसाला आवर्जून वापरला जातो उसळी,आंबटगोड वरण(आमटी),भरली वांगी ,मसालेभात नि बर्याच भाज्या मधे घातला जातो .गोडा मसाल्याचा स्वाद फारच रूचकर लागतो .तर बघुया पारंपरिक गोडा मसाला कसा तयार करतात.

गोडा मसाला (goda masala recipe in marathi)

महाराष्ट्र नि गोडा मसाला यांचे एकदम गुळपीट आहे बर का ? महाराष्ट्रात खुप जाती जमाती मधे जेवणात हा मसाला आवर्जून वापरला जातो उसळी,आंबटगोड वरण(आमटी),भरली वांगी ,मसालेभात नि बर्याच भाज्या मधे घातला जातो .गोडा मसाल्याचा स्वाद फारच रूचकर लागतो .तर बघुया पारंपरिक गोडा मसाला कसा तयार करतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमधणे
  2. 50 ग्रॅमजीरे
  3. 20 ग्रॅमशहाजीरे
  4. 10 ग्रॅमलवंग
  5. 10 ग्रॅमडालचीनी
  6. 10 ग्रॅमकाळीमीरी
  7. 10 ग्रॅमनागकेसर
  8. 10 ग्रॅमदगडफुल
  9. 10 ग्रॅमजायपत्री
  10. 10 ग्रॅमबादीयान
  11. 15 ग्रॅमतमालपत्र
  12. 10 ग्रॅमहिंग
  13. 60 ग्रॅमतीळ
  14. 60 ग्रॅमसुके खोबरे
  15. 4/5 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    खालील प्रमाणे तयारी करावी.

  2. 2

    प्रथम धणे भाजावे एकदम भाजले तर 15 मिनिटे लागतात,नंतर,जीरे व शहाजीरे भाजावे.हे एकत्र ठेवावे. हे भाजत असताना दुसरीकडे कढईत 3 टेबलस्पून तेल घालणे व त्यामधे एक एक मसाले भाजणे साधारण 2/3 मिनीटे एकाला लागतात, सर्वात शेवटी तमालपत्रचे तुकडे करावेत व भाजावेत.हे तेलात भाजलेले मसाले वेगळे ठेवावेत.नंतर परत 1 टीस्पून तेल टाकून गरम झाले कि हिंग भाजावा म्हणजे लगेच गॅस बंद करणे.तीळ व किसलेले खोबरे भाजावे वेगवेगळे ठेवणे.हिंग ही वेगळा ठेवावा.मसाले साधारण 40 मिनिटात भाजून होतात.मसाले भाजल्यानंतर थंड करून मग वाटावे

  3. 3

    आता धणे,जीरे,शहाजीरे मिक्सरमधे वाटून वेगळे ठेवणे.नंतर तेलात भाजलेले मसाले वाटणे,खोबरे,तिळ वाटून घेणे.शेवटी मोठी परात घ्यावी व त्यामधे सर्व वाटलेले मसाले घालून चांगले मिक्स करावे.मसाला बरणीत दाबून भरावा म्हणजे वर्षभर राहतो.छान मसाल्याचा सुगंध घरात पसरला आहे.छान गोडा मसाला तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes