उपमा (upma recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#GA4 #week5 उपमा रंगीबेरंगी खास मुलांसाठी

उपमा (upma recipe in marathi)

#GA4 #week5 उपमा रंगीबेरंगी खास मुलांसाठी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपरवा
  2. 3 टेबलस्पूनकांदा चिरलेला
  3. 2 टेबलस्पूनमटार
  4. 2 टेबलस्पूनगाजर किस
  5. 2 टेबलस्पूनटोमॅटो चिरलेले
  6. 1/2 टेबलस्पूनसाखर
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1 टीस्पूनमोहरी
  9. 1/2 टीस्पूनजीरे
  10. 3/4कढीपत्ता
  11. 1/2मिरच्या
  12. 1 टीस्पूनउडीद डाळ
  13. 1/2लिंबू
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1 टेबलस्पूनतूप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    खालील प्रमाणे तयारी करावी,रवा भाजून घ्यावा 5/6 मिनीटे

  2. 2

    1)फोडणीचे साहित्य 2)सजावटी साठी साहित्य

  3. 3

    एका बाजूला दिडकप पाणी गरम करत ठेवावे.(रवा असेल त्याच्या दुप्पट पाणी लागते.) दुसर्या बाजूला कढईत 2 टेबलस्पून तेल घालणे गरम झाले कि त्यात प्रथम मोहरी घालणे मोहरी तडतडली कि उडिदडाळ,जीरे,मिरची,कढीपत्ता घालणे नंतर कांदा,मटार घालावा व दोन तिन मिनिटे परतला कि थोड्यावेळा झाकण ठेऊन शिजवा मटार शिजला कि टोमॅटो,साखर मीठ घाला एक मिनिट परतावा व लगेच त्यात रवा घाला तोही परता गरम व्हायला हवा नंतर त्यात गरम पाणी घालावे.परत ढवळून,

  4. 4

    झाकण ठेवावे साधारण 5/7 मिनिटांनी उपमा तयार होईल त्यामधे शेवटी किसलेले गाजर घाला व तूप घाला एक मिनिट ढवळावे रंगीबेरंगी उपमा तयार.तूप घातल्याने उपमा चवीला फार छान होतो जास्त ही तूप तुम्ही घालू शकता

  5. 5

    खालील प्रमाणे लिंबू पिळून नंतर सजावट करणे मुले आवडीने खातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes