उपमा (upma recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपरवा
  2. 2 टेबलस्पूनतूप
  3. 1/3 कपकांदा बारीक चिरलेला
  4. 1/4 कपटोमॅटो बारीक चिरलेला
  5. 1/4 कपहिरवे वाटणे व गाजर बारीक चिरून
  6. 2-3हिरव्या मिरच्या
  7. 2 टेबलस्पूनकाजूचे तुकडे
  8. 2 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चिरलेली
  9. 1/2 टीस्पूनआ ल किसून
  10. 10-12कढीपत्त्याची पान
  11. 1/2लिंबू
  12. 1 आणि 1/4 कप पाणी
  13. फोडणीसाठी
  14. 2 टेबलस्पूनतेल/तूप
  15. 1/2 टीस्पूनराई
  16. 1/4 टीस्पूनजीरे
  17. 1/2 टीस्पूनउडीद डाळ
  18. चिमूटभर हिंग
  19. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

35 मिनिट
  1. 1

    कढईत तूप घालून त्यात रवा हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यावा. भाजलेला रवा बाजूला काढून ठेवावा.

  2. 2

    त्याच कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून त्यात,राई जीरे,उडीद डाळ व हिंग परतावा.त्यावर काजूचे तुकडे परतून घ्यावी. आच मध्यम असावी.नंतर कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. त्यावर टोमॅटो व कोथिंबीर परतावी.

  3. 3

    कढीपत्ता व हिरवे वाटणे,गाजर परतावे.थोड पाणी घालून शिजवून घ्यावे.नंतर त्यात एक कप पाणी व चवीनुसार मीठ घालून एक उकळी आणावी.

  4. 4

    आता त्यात भाजलेला रवा घालावा व चांगले ढवळावे (गुठळी राहू देऊ नये). झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ आणावी. उपम्यावर लिंबू पिळून,कोथिंबीर व खोबर घालून गरम गरम खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes