शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#GA4 #week5 #काजू
आज मी एक स्पेशल रेसिपी सांगणार आहे, आता सणांचे दिवस आले आहेत तेंव्हा चांगल्या चांगल्या भाज्या करायच्या अनेक संधी येतील. ही भाजी नावाप्रमाणे शाही आहे कारण यात काजू, मलई, दही या सर्वांचा मुक्त हस्ते वापर आहे.. आणि चव तर अप्रतिम एकदम शाही... रेसिपी साठी यू ट्यूब चा आधार घेतला आहे.

शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

#GA4 #week5 #काजू
आज मी एक स्पेशल रेसिपी सांगणार आहे, आता सणांचे दिवस आले आहेत तेंव्हा चांगल्या चांगल्या भाज्या करायच्या अनेक संधी येतील. ही भाजी नावाप्रमाणे शाही आहे कारण यात काजू, मलई, दही या सर्वांचा मुक्त हस्ते वापर आहे.. आणि चव तर अप्रतिम एकदम शाही... रेसिपी साठी यू ट्यूब चा आधार घेतला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-50 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2मध्यम टोमॅटो
  2. 2मध्यम कांदे
  3. 5-6लसूण पाकळ्या
  4. 1/2 इंचआल्याचा तुकडा
  5. 2-3 काश्मिरी मिरच्या
  6. 1 टेबलस्पूनखडे मसाले (जिरे,लवंग, वेलची, तमालपत्र)
  7. 10-15काजू
  8. 1/2 वाटीमलई
  9. 1 वाटीदही
  10. 2 -3 टेबलस्पून तूप
  11. 1-2 टीस्पूनधणा पावडर
  12. 1/2 टीस्पूनहळद
  13. 1 टीस्पूनकाश्मिरी मिरची पावडर
  14. 1 टीस्पूनगरम मसाला
  15. 1 टीस्पूनकसूरी मेथी
  16. 150 ग्रॅम पनीर तुकडे
  17. 1/2 कप दूध

कुकिंग सूचना

40-50 मिनिटे
  1. 1

    प्रथम काजू पाच ते सात मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवा. दोन्ही कांदे तुकडे करून मिक्सरमधून त्याची बारीक पेस्ट तयार करा.टोमॅटो,लसूण, आलं आणि लाल सुक्या मिरच्या एकत्र करुन पेस्ट करून घ्या. अर्धी वाटी मलई मिक्‍सरमधून एकजीव करून घ्या.

  2. 2

    आता भांड्यामध्ये तूप घेऊन त्यावर सर्व खडे मसाले टाकून ते गरम होऊ द्या. मग त्यावर कच्चा कांद्याची पेस्ट टाकून गुलाबी रंगाची होईपर्यंत परतून घ्या. त्यानंतर काजूची पेस्ट घालून मधून मधून हलवून 3-4 मिनिटे शिजवून घ्या. मग त्यात हळद आणि मिरची पावडर घालून मिक्स करून घ्या.

  3. 3

    आता त्यामध्ये मिक्‍सरमधून फिरवलेल्या टोमॅटोची पेस्ट घाला आणि झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्या. दह्यामध्ये धणा पावडर घालून नीट मिक्स करून ते दही या भांड्यातल्या मिश्रणामध्ये घालून मधून मधून हलवून साईड ने तूप सुटायला लागेपर्यंत झाकण ठेवून शिजवा (नाहीतर अंगावर उडेल मिश्रण). मिश्रण दाणेदार होईल, आता त्यात मलई घाला आणि परत शिजवा.

  4. 4

    आता त्या मिश्रणामध्ये कसुरी मेथी, गरम मसाला घालून परत एक ते दोन मिनिटं शिजवून घ्या. सर्वात शेवटी त्यात पनीरचे तुकडे घाला व्यवस्थित मिक्स करून एक वाफ आणून गॅस बंद करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes