शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

Ashwini Anant Randive
Ashwini Anant Randive @Ashwini

#EB2 #W2
प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

#EB2 #W2
प्रोटीन रीच मुलांची फेवरेट असणारी ही भाजी तिचा क्रीमी टेक्चर मुळे सर्वांनाच आवडते चला तर मग पाहूया त्याची रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
4 जणांसाठी
  1. 200 ग्रॅमपनीर
  2. 2मिडीयम कांदे
  3. 4टोमॅटो
  4. 12काजू
  5. 1 चमचाअद्रक लसुन पेस्ट
  6. 1/2 चमचाधना पावडर
  7. 1 चमचाकाश्मिरी लाल तिखट
  8. 1 चमचाकिचन किंग मसाला
  9. 1 चमचातेल
  10. 2 चमचेबटर
  11. 2 चमचेदुधाची क्रीम
  12. 1 चमचाकसूरी मेथी
  13. 2 चमचेकोथिंबीर
  14. 1/4 चमचाहळद

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    सगळ्यात अगोदर कांदा उभा चिरून घेणे आणि टोमॅटो बारीक कापून घेणे. कढईमध्ये अगोदर कांदा मग टोमॅटो थोडा परतून घेणे त्यातच काजू टाकणे.अर्धा कप पाणी टाकून झाकण ठेवून दहा मिनिटे शिजवून घेणे. आता त्यात 2 क्युब पनीर टाकून छान बारीक पेस्ट करून घेणे.पाणी घालू नये.

  2. 2

    कढईमध्ये अगोदर तेल आणि बटर घालून ते तापले की त्यात वाटलेली प्युरी घालावी. आणि चार ते पाच मिनिट छान परतून घ्यावी आता त्यात आद्रक लसुण पेस्ट,लाल तिखट,किचन किंग मसाला, हळद धना पावडर घालून परत तेल सुटेपर्यंत छान परतून घेणे आता आता त्यात पाणी घालून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करणे.

  3. 3

    पनीरचे चौकोनी काप करून घेणे हे काप ग्रेव्ही मध्ये घालून तीन ते चार मिनिट शिजवणे व गॅस बंद करणे वरतून दुधाची क्रीम,कसुरी मेथी आणि कोथिंबीर ने डेकोरेट करणे व सर्व्ह करणे.

  4. 4

    हे शाही पनीर चपाती रोटी किंवा जिरा राईस बरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Anant Randive
रोजी

Similar Recipes