मुखवास आयुर्वेदिक (mukhwas recipe in marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#मुखवास
#मुखशुद्धी

यात शरीराला उपयोगी असणारे सगळे जिन्नस यात वापरले आहेत, जे आरोग्यासाठी उत्तम आहेत. जसे तीळ, ओवा, बडीशोप, धना डाळ, जवस

मुखवास आयुर्वेदिक (mukhwas recipe in marathi)

#मुखवास
#मुखशुद्धी

यात शरीराला उपयोगी असणारे सगळे जिन्नस यात वापरले आहेत, जे आरोग्यासाठी उत्तम आहेत. जसे तीळ, ओवा, बडीशोप, धना डाळ, जवस

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
  1. 250 ग्रॅमबडीशोप
  2. 1/2 कपओवा
  3. 1/2 कपपांढरे तीळ
  4. 50 ग्रॅमधना डाळ
  5. 75 ग्रॅमजवस
  6. 2ते 3 लिंबू
  7. 2ते 3 टेबलस्पून मीठ
  8. 1.5 टेबलस्पूनहळद

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    बडीशोप सोडून सगळे जिन्नस मोजून घ्यावे मेजरिंग कपाने, जसे ओवा, जवस, धना डाळ, तीळ, इ..

  2. 2

    बडीशोपला लिंबू, मीठ आणि हळद घालून घ्यावे, व ती व्यवस्थित एकजीव करून घ्या, व 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा

  3. 3

    ओवा, तीळ, जवस ला पण मीठ, लिंबू, हळद लावून 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा

  4. 4

    15 मिनिटा नंतर कढई लोखंडी तापत ठेवा, व मंद आचेवर धना डाळ भाजुन घ्या, बदामी रंग आला की ताटात काढून घ्या.

  5. 5

    आता कढई मधे तीळ, ओवा, जवस घालून मंद आचेवर कोरडे होई पर्यंत भाजून घ्या, व नंतर ताटात काढून घ्या.

  6. 6

    बडीशोप कढई मधे घालून घ्यावी. व ती मंद आचेवर कोरडी होई पर्यंत भाजून घ्यावी.

  7. 7

    आता ताटात सगळे जिन्नस गार झाले की ते मिक्स करा, व नंतर एका कोरड्या बरणीत भरून ठेवा. बरणी शक्यतो हवा बंद हवी, म्हणजे मुखवास, मुखशुद्धी कुरकुरीत रहाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या (3)

Similar Recipes