गव्हाची भाकरी/ बिस्कीट भाकरी (ghavachi bhakari recipe in marathi)

GauriMinde Rajpura
GauriMinde Rajpura @cook_27044401

#पश्चिम #गुजरात Indian breads मध्ये प्रामुख्याने येतात पोळी/चपाती, रोटी, नान, कुलचा, पराठा आणि भाकरी.

भाकरी हि आपली रुचकर, पौष्टिक, पारंपरिक आणि जिव्हाळ्याची अशी रोजच्या जेवणातील पाककृती आहे.

देशात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळीे धान्यं वापरून भाकरी केली जाते. भाजी सोबत, नॉनव्हेज रस्या बरोबर, पिठल्या बरोबर आणि काहीं नाही तर दूध/तूप किंवा चटणी अगदी नुसत्या कांद्या बरोबरही चवीने खाल्ली जाते अशी ही भाकरी.

गुजरात प्रांतात गव्हाची भाकरी केली जाते (बाजरी ज्वारी च्या भाकरी ला तिथे रोटला म्हणतात) आणि वांग बटाटा, शेव टमाटा, ढोकळी शाक, शेव कंदांपात रस्सा अशा भाज्यांसोबत आणि उरलेली सकाळी चहा नाष्ट्या ला आथाण्या (लोणचं) बरोबर खाल्ली जाते.

या भाकरीला बिस्कीट भाकरी देखील म्हणतात..थोडी जाड पण मस्त खुसखुशीत आणि पोटभरीची ही गव्हाची भाकरी तुम्हाला नक्की आवडेल😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 mins
4 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाट्यागव्हाचं पीठ
  2. चवीपुरते मीठ
  3. 3 टेबलस्पूनतेल
  4. पाणी पीठ मळण्यासाठी

कुकिंग सूचना

35 mins
  1. 1

    पिठात मीठ आणि तेल घालून छान चुरून घ्या.

  2. 2

    हळुहळु पाणी घालत पीठ घट्टसर एकजीव करा

  3. 3

    अख्खा गोळा न मळून घेता एक एक गोळा घट्ट मळून घ्या. मळलेल्या गोळ्याला तळहातांमध्ये दाबून गोल बनवून घ्या

  4. 4

    गोल पेढा पोळपाटावर ठेवून अगठ्यांनी दाबून गोलाकार दाबून घ्या. पुढे लाटण्याने गोल भाकरी लाटून घ्या. पीठ घट्ट असल्याने कडा फाटतात लाटताना तसे झाल्यास हाताने कडा एकत्र कराव्यात. लाटलेल्या भाकरी वर लाटण्याने टोचे मारून घ्यावेत म्हणजे भाकरी छान शिजते.

  5. 5

    भाकरी मातीच्या तव्यावर (तावडी वर) छान भाजली जाते. भाकरी तव्यावर कपडा वापरून दाबून भाजून घ्यावी. दोन्ही बाजूने कमी ते मध्यम फ्लेम वर खरपूस भाजून घेतली की भाकरी तयार.

  6. 6

    तयार भाकरीला आवडत असल्यास तुप लावावे. गरम गरम भाजी बरोबर सर्व्ह करावी किंवा थंड सुद्धा छानच लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GauriMinde Rajpura
GauriMinde Rajpura @cook_27044401
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes