चटपटीत नमकीन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)

Shubhangi Dudhal-Pharande
Shubhangi Dudhal-Pharande @cook_26200113

#अन्नपूर्णा
#फराळ क्र:- ६
#शंकरपाळी

चटपटीत नमकीन शंकरपाळी (namkeen shankarpali recipe in marathi)

#अन्नपूर्णा
#फराळ क्र:- ६
#शंकरपाळी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
२ लोक
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनबारीक रवा
  3. 2 टेबल स्पूनकडकडीत तेलाचे मोहन
  4. 1 टीस्पूनलाल तिखट
  5. 2 टी स्पूनओवा
  6. 1 टेबलस्पूनकसूरी मेथी
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनजीरे
  9. चवीनुसार मीठ
  10. 1 टेबलस्पूनचाट-मसाला
  11. 3/4 कपकोमट पाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका परातीत गव्हाचे पीठ,बारीक रवा व मीठ मिसळून घ्यावे त्यामध्ये लाल तिखट, हळद, जीरे,ओवा कसुरी मेथी टाकून एकजीव करावे

  2. 2

    तेलाचे कडकडीत मोहन करून पिठामध्ये घालावे व ते तेल पिठाला चाेळून घ्यावे

  3. 3

    पाणी टाकून पिठाची घट्टसर कणिक मळून घ्यावी एक तासभर झाकून ठेवावे तासाभरानंतर समान आकाराचे गोळे करून पातळ अशी लाटून घ्यावी जेवढे जमेल तेवढी पोळी पातळ लाटावी त्यामुळे शंकरपाळी एकदम कुरकुरीत होईल व नरम पडणार नाही. लाटलेल्या पोळीच्या कडा कापून घ्याव्यात व आपल्याला हव्या असल्या आकारात शंकरपाळ्या कापाव्यात

  4. 4

    कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे तेल चांगले गरम झाले त्यामध्ये शंकरपाळ्या सोडाव्यात आणि गॅस कमी करावा मध्यम गॅसवर शंकरपाळ्या खरपूस भाजून घ्यावेत तांबूस रंग आला की शंकरपाळ्या बाहेर काढाव्यात थोड्या गरम असतानाच शंकरपाळ्या वर अावडत असल्यास चाट मसाला भुरभुरावा. त्यामुळे शंकरपाळ्या एकदम स्वादिष्ट लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shubhangi Dudhal-Pharande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes