चटपटीत नमकिन शंकरपाळी (chatpatit namak sankarpale recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#cooksnap शुभांगी ची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. मी नेहमी मैदा वापरून करते.ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनवली असल्याने पौष्टिक आहे. खूप छान लागतात.

चटपटीत नमकिन शंकरपाळी (chatpatit namak sankarpale recipe in marathi)

#cooksnap शुभांगी ची ही रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. मी नेहमी मैदा वापरून करते.ही रेसिपी गव्हाच्या पिठापासून बनवली असल्याने पौष्टिक आहे. खूप छान लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
5-6 जणांसाठी
  1. 2 कपगव्हाचे पीठ
  2. 2 टेबलस्पूनरवा
  3. 2 टेबलस्पूनकडकडीत तेलाचे मोहन
  4. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टेबलस्पूनओवा
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 3/4 कपकोमट पाणी
  10. चवीप्रमाणे मीठ
  11. तळण्यासाठी तेल
  12. 1/4 टीस्पूनचाट मसाला

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    एका वाटी मध्ये गव्हाचे पीठ,रवा,मीठ एकत्र मिक्स करून घेणे.नंतर सर्व पदार्थ घालून मिक्स करून घेणे.

  2. 2

    मिक्स केलेल्या पिठात कडकडीत तेलाचे मोहन घालून चमच्याने मिक्स करून घेणे.मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताने चांगले मिक्स करून घेणे.

  3. 3

    थोड - थोड कोमट पाणी घालून घट्ट कणीक मळून घेणे व झाकून 1 तास ठेवावे.

  4. 4

    1 तासानंतर कणीक मळून घेणे व त्याचे एकसारखे गोळे करून घेणे.एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेणे. जास्तीच जास्त पातळ लाटून घेणे. म्हणजे कुरकुरीत शंकरपाळी होतात.पोळीची कडेची बाजू कटरने कापून घेणे.

  5. 5

    हव्या त्या आकाराच्या शंकरपाळया कापून घेणे.सर्व पिठाच्या शंकरपाळ्या करून घेणे.

  6. 6

    गॅसवर कढई तेल तापत ठेवावे. तेल तापले की गॅस मंद आचेवर ठेवून थोडया थोडया शंकरपाळ्या टाकून दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यावे.सर्व शंकरपाळ्या तळून झाल्यावर लगेच चाट मसाला वरून भुरभुरून घेऊन मिक्स करून घेणे.

  7. 7

    खाण्यासाठी तयार चटपटीत नमकिन शंकरपाळी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
सुजाता गेंजें ताई तुमची चटपटीत नमकिन शंकरपाळी रेसिपी मी आज बनवली( कुकस्नॅप ) खुप छान टेस्टी झाली👌😋
धन्यवाद सुजाता ताई🙏

Similar Recipes