शेजवान फ्राइड राइस रेसिपी (schezwan fried rice recipe in marathi)

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
Navi Mumbai
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

1/2 तास
3/4 जणांसाठी
  1. 2 +1/2 कपबासमती राइस
  2. 1/2 वाटीकोबी
  3. 1/4 वाटीशिमला मिरची बारीक चिरलेली
  4. 1/4 वाटीगाजर
  5. 1/4 वाटीबिन्स
  6. 2-3पातीचा कांदा बारीक चिरलेला
  7. 1/4 वाटीकादयांची पात बारीक चिरलेली
  8. 1टेबलस्पूनलसूण बारीक चिरलेला
  9. 1हिरवी मिरची
  10. 1 टीस्पूनसोया साॅस
  11. 1 टीस्पूनरेड चिली सॉस
  12. 1 टीस्पूनविनेगेर
  13. 1 टीस्पूनसेजवान साॅस
  14. 1 टेबलस्पूनशेजवान मसाला
  15. मीठ चवीनुसार
  16. 3 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    बासमती तांदुळाचा भात शिजवून घ्या भात शिजवताना आपण भातासाठी पाणी बाॅइल करायला ठेवणार आहे त्यात थोडे मीठ व तेल 1टीस्पून घाला म्हणजे भात छान मोकळा होतो आपण बिर्याणीला राइस करतो तसाच करून घ्या राइस त्यानंतर भाज्या बारीक चिरून घ्या.(भात 1 तास आधी शिजवून घ्यावा म्हणजे थंड होईल)

  2. 2

    त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करत ठेवावे त्यामधे लसूण घालावे, मिरची घालून 1-2 मिनिटे परतून घ्यावे मग गाजर आणि बिन्स घालून 2-3 मिनिटे परतून घ्या मग त्यामधे इतर सर्व भाज्या घाला आणि मीठ घालावे म्हणजे ते भाज्याना लागले जाइल कांदा पात घालू नका ती आपल्याला नंतर घालणार आहोत.

  3. 3

    आता त्यामधे सर्व साॅस विनेगेर घातल्यावर 1-2मिनिटे परतून घ्यावे त्यानंतर शिजवलेल्या भात घालून परतून घ्या मीठ हव असेल तर घालावे वरुन बारीक चिरलेली कांदयाची पात घाला आणि गरमा गरम सर्व्ह करावे.

  4. 4

    शेजवान राइस रेडी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

nilam jadhav
nilam jadhav @Nilamjadhav2021
रोजी
Navi Mumbai

Similar Recipes