शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#डिनर # संध्याकाळच्या वेळी हलके फुलके खाण्यासाठी शेजवान फ्राइड राइस...

शेजवान फ्राइड राइस (schezwan Fried Rice recipe in martahi)

#डिनर # संध्याकाळच्या वेळी हलके फुलके खाण्यासाठी शेजवान फ्राइड राइस...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1 कपपान कोबी चिरलेली
  3. 2गाजर चिरून
  4. 4श्रावण घेवडा शेंगा चिरून
  5. 1 लहानसिमला मिरची चिरुन
  6. 1पातीचा कांदा
  7. 5-6लसूण पाकळ्या चिरून
  8. 2 टेबलस्पूनशेंगदाणे भाजलेले
  9. 2 टेबलस्पूनतेल
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टेबलस्पूनसोयासॉस
  12. 1 टेबलस्पूनशेजवान सॉस
  13. 1 टेबलस्पूनशेजवान फ्राइड राइस मसाला
  14. 1/2बीट किसून

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत आणि 10 मिनिट भिजत ठेवावे. पान कोबी, गाजर, श्रावण घेवडा, पातीचा कांदा, पांढरा आणि हिरवा भाग वेगवेगळा, असा, कोथिंबीर चिरून घ्यावी. सिमला मिरची ही घ्यावी.

  2. 2

    लसूण बारीक चिरून घ्यावा. बीट किसून घ्यावे. दुसरीकडे गॅसवर एका भांड्यात पाणी टाकून त्यात बीट तुकडा टाकावा. म्हणजे पाण्याला लाल रंग येतो. वेगळा रंग टाकण्याची गरज नाही.

  3. 3

    पाणी उकळल्यावर, त्यात तांदुळ टाकावे व शिजवून घ्यावे पाणि जास्त टाकावे. म्हणजे शिजलेल्या तांदळाला मधून पाणी गाळून घेता येईल व तांदूळ मोकळा होईल. टाकलेला बीटचा तुकडा काढून घ्यावा व तांदूळ चाळणीतून गाळून घेऊन मोकळे करावे.

  4. 4

    आता एका पॅन मध्ये दोन टेबलस्पून तेल टाकून गरम करावे. चिरलेले लसूण टाकावे. किंचित परतल्यावर गाजर आणि श्रावण घेवड्याचे तुकडे टाकावे. एक मिनिट परतल्यावर. पा तीच्या कांद्याचा हिरवा भाग सोडून, इतर सर्व भाज्या टाकावे. व गॅस मोठा करून गॅसवर फ्राय करून घ्यावे.

  5. 5

    हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे. आता त्यात सोया सॉ स, शेजवान सॉस, शेजवान फ्राईड राईस मसाला आणि चवीपुरते मीठ टाकावे.

  6. 6

    भाजलेले शेंगदाणे टाकावे. चांगले परतून घेतल्यानंतर आता त्यात शिजलेला भात टाकावा व चमचा वापर कमी करून टॉस करून घ्यावा. चांगले एकत्र झाल्यावर त्यात पातीच्या कांद्याचा हिरवा चिरलेला भाग टाकावा.

  7. 7

    एक ते दोन मिनिट गरम झाल्यावर गॅस बंद करा.. शेजवान फ्राईड राईस तयार आहे. गरम-गरम सर्व्ह करताना वरून पातीचा कांदा टाकून सर्व करावा. या भाताकरिता शिळा भात असेल तर अजून चांगले...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes