हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात : (kandyachya paticha fodnicha bhaat recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात :
#हिरव्याकांद्याच्यापातीचाफोडणीचाभात
#हिरव्याकांद्याचीपात
#GA4
#week11
मधे ग्रीन ओनीयोन (हिरव्या कांद्याची पात) हे key word वापरुन हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात बनवीला आहे.

हिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.

भात हे एक महत्त्वाचे पीक असून जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे ते मुख्य अन्न आहे.तांदळाला आपल्याकडे पूर्वीपासूनच महत्त्व आहे. घरात तांदूळ असणे हे भरभराटीचे मानले जाते. सर्व धार्मिक कार्यात तांदळाचीच गरज असते. आपल्याकडे तांदळाच्या पिठाची भाकर, घावणे, आंबोळी, डोसा, इडली, लाडू असे अनेक प्रकार केले जातात,.

रोजच्या जेवणात भाताचे स्थान कायम असते. हा भात आजकाल विविध पद्धतीने बनविला जातो. साधा भात, स्टीम राईस, मसाले भात, साखर भात, फोडणीचा भात, दही भात, गोळा भात, बिर्याणी, पुलाव, व्हेज फ्राईड राईस, सेझवान राईस .

आपल्याकडे भात उरला कि आपण त्याचा फोडणीचा भात बनवतो खाली दिलेली कृती फोडणीच्या भाताची आहे पण हिरव्या कांद्याच्या पातीचा फोडणीचा भात आहे .थोडी वेगळी आणि सर्वांनाच आवडेल अशी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. साहित्य:
  2. ३ कप शिजवलेला भात
  3. 1पाव कांद्याची पात कांद्यासाहित बारीक चिरलेली
  4. 7 ते ८ लसूण पाकळ्या बारीक चिरलेल्या
  5. 1 टीस्पून हळद
  6. १/२ कप कोथिंबीर चिरलेली
  7. हिंग
  8. मीठ गरजेनुसार
  9. फोडणीसाठी:
  10. 7-8कढीपत्त्याची पाने
  11. 1 छोटा चमचाजीरे
  12. 1 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    कृती:

    साधा मोकळा भात बनवून घ्यावा किंवा रात्रीचा उरलेला भात सुद्धा वापरू शकता.

  2. 2

    एका कढईत तेल गरम करायाला ठेवा, तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जीरे आणि मोहरी टाकून तडतडू द्या.नंतर लसूण, हिरवी मिरची,हिंग आणि कढीपत्ता,पातीचा चिरलेला कांदा टाकून परतून घ्या. (कांद्याची पात चिरलेली बाजूला ठेवा.) आता हळद घालून मिक्स करा.

  3. 3

    स्टेप २:आता शिजवलेला भात व मीठ आणि बाजूला ठेवलेली बारीक चिरलेली कांद्याची पात घालून परतावे झाकण ठेवून ५ ते ७मिनिटे मंद गॅसवर भात शिजू दयावा.

  4. 4

    स्टेप ३: सर्विंग बाउल मध्ये भात काढून घ्या त्यावर कोथिंबीर घालून गरमच सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes