मेथीचे पराठे (methi che parathe recipe in marathi)

Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311

हे पराठे वेगळ्या पद्धतीने करून पाहिले तर खूप छान झाले आणि चवही छान आहे.

मेथीचे पराठे (methi che parathe recipe in marathi)

हे पराठे वेगळ्या पद्धतीने करून पाहिले तर खूप छान झाले आणि चवही छान आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 जणांसाठी
  1. 1मोठी जुडी (बारीक पानाची मेथी)
  2. 4 कपगव्हाचं पीठ
  3. 1/4 कपचण्याचे पीठ
  4. 8 ते 9 हिरवी मिरची
  5. 12 ते15 लसून पाकळ्या
  6. 12कढीपत्त्याची पाने
  7. 1 कपकोथिंबीर
  8. 2मोठे चमचे जिरेेेे
  9. 2 चमचेओवा
  10. 4 चमचेपांढरे तीळ
  11. 1/2 चमचाहळद
  12. 1 चमचालाल तिखट आवडीनुसार
  13. 2 चमचामीठ चवीप्रमाणे
  14. 1 कपतेल गरजेनुसार
  15. पाणी गरजेप्रमाणे

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    प्रथम मेथी स्वच्छ धुऊन पूर्ण पाणी काढून ती कोरडी करून त्याला बारीक चिरून घ्यावे. शक्यतो मेथीच्या काड्या घेऊ नये.

  2. 2

    नंतर हिरवी मिरची व लसूण एकत्र करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यावे.नंतर एका कढईमध्ये तेल टाकून जिरे व कढीपत्ता परतून व त्यामध्ये मेथी परतून घ्यावी. मेथीच्या भाजीचा कलर बदल्यावर मेथी कडे मधून बाजूला काढून घ्यावी.द

  3. 3

    नंतर त्याच कढईमध्ये तेल टाकून लसूण मिरचीची पेस्ट ही तेलात परतून घ्यावी व ती पेस्ट भाजीवर काढून घ्यावी.

  4. 4

    नंतर त्या मिश्रणामध्ये इतर साहित्य टाकून चांगले एकजीव करून घ्यावे व दोन्ही पीठ एकत्र करून भाजीत बसेल असं एकत्र मिक्स करून घ्यावे व गरज वाटली तर अगदी थोडे पाणी वापरावे. व पराठ्याचे कणिक मळून घ्यावे.

  5. 5

    नंतर आवडीच्या आकाराचे गोळे करून पराठे पातळ कसे लाटून घ्यावेत व तव्यावर खरपूस दोन्ही बाजूंनी तेल लावून भाजून घ्यावेत खाण्यासाठी गरमागरम मेथीपराठा तयार.हा पराठा तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा दह्यासोबत होऊ शकता अतिशय पौष्टिक असे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आवडणारा हा मेथीचा पराठा तयार👍🙏

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vaishnavi Dodke
Vaishnavi Dodke @cook_26499311
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes