गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

गरमागरम ड्रायफ्रूट मसाला दूध (garama garam dryfruit masala dhudh)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरदूध
  2. 8-10काजू
  3. 5बदाम
  4. 5-6पिस्ता
  5. 1 टेबलस्पूनचारोळी
  6. 2 टेबलस्पूनखारीक पावडर
  7. 2विलाईची
  8. थोडे केशर

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    दुधकरिता लागणारी सर्व सामग्री एकत्र ठेवावी. गॅस सुरू करून त्यावर एका भांड्यात दूध गरम करण्याकरिता ठेवावे.

  2. 2

    आता मिक्सर चे भांड्यात घेतलेले सर्व ड्राय फ्रूट टाकून चांगले बारीक करून घ्यावे.

  3. 3

    तोपर्यंत गॅसवर ठेवलेले दूध गरम झालेले असेल. ते सतत ढवळत राहावे. म्हणजे त्यावर साय जमा होणार नाही. आता त्यात तयार केलेली ड्राय फ्रूट पावडर व खारीक पावडर टाकून चांगले मिक्स करावे, जेणकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही. नंतर त्यात केशर टाकून चांगले उकळावे.

  4. 4

    या दरम्यान दूध सतत ढवळत राहावे. मी यात साखर घातली नाही. कारण खारकेचा. गोडवा दुधात उतरतो. परंतु गोड पाहिजे असल्यास साखर घालावी. थोडेसे, आपल्याला पाहिजे तेवढे घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. व कप किंवा पेल्यात दूध ओतून घ्यावे.

  5. 5

    त्यावर थोडेसे बदामाचे, पिस्त्याचे काप घालून, गरमागरम सर्व्ह करावे. चविष्ट आणि पौष्टिक असे दूध थंडीच्या दिवसात घरातील सर्व मंडळींनी घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes