मसालेभात (masala bhat recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

मसालेभात (masala bhat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मिनीटे
४-५
  1. 2 कपतांदूळ
  2. 1/4 कपफ्लॉवर
  3. 1/4 कपगाजर
  4. 3 टेबलस्पूनमटार
  5. 1कांदा
  6. 2टोमॅटो
  7. 1बटाटा
  8. 2-3हिरव्या मिरच्या
  9. 1/2 इंचआलं
  10. १०-१२ काजू
  11. ३ टेबलस्पून तेल
  12. 1 टेबलस्पूनसाजुक तूप
  13. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  14. 7-8कडीपत्ता पाने
  15. 1/4 टीस्पूनहिंग
  16. 1/2 टीस्पूनहळद
  17. 1/2 टीस्पूनतिखट
  18. १ १/२ टेबलस्पून गोडा मसाला
  19. 1 टीस्पूनधने पावडर
  20. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  21. 1 टीस्पूनमीठ...चवीनुसार
  22. 1 टीस्पूनसाखर/ गुळ....आवडीनुसार
  23. 1/4 कपतोंडली
  24. 4 कपगरम पाणी
  25. 1/4 कपखवलेल खोबरं
  26. 1/4 कपचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५-२० मिनीटे
  1. 1

    साहित्य घेतले.भाज्या धुवून,चिरून घेतल्या.तांदूळ स्वच्छ धुवून घेतले.

  2. 2

    कढईत तेल घालून त्यात जीरे,मोहरी,कडीपत्ता,मिरच्या,हिंग, घालून फोडणी केली त्यात कांदा घालून लालसर होईपर्यंत परतले.

  3. 3

    फ्लॉवर,गाजर,तोंडली घालून परतून घेतले.त्यात हळद,तिखट,१ टेबलस्पून गोडा मसाला घालून परतले.नंतर त्यात तांदूळ घालून नीट मिक्स केले.

  4. 4

    त्यात गरम पाणी,मीठ,साखर घालून मिक्स केले.वर झाकण ठेवले.

  5. 5

    भातातले पाणी आटल्यावर त्यात टोमॅटो,वाटाणे,काजू,जीरे पूड,धणेपूड,१/२ टेबलस्पून गोडा मसाला घालून मिक्स केले.वरून साजुक तूप घातले.आणि मंद आचेवर झाकण ठेऊन शिजू दिले.

  6. 6

    मसालेभात छान शिजल्यावर त्यात वरून खोबरं आणि कोथिंबीर घालून सजवले.मसालेभात खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes