भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर ३

भेंडी मसाला (bhendi masala recipe in marathi)

#लंच
#साप्ताहिक लंच प्लॅनर ३

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मीनीट
  1. १५-२० भेंडी
  2. 1कांदा
  3. 1टमाटाा
  4. 1 टेबलस्पूनखोबऱ्याचा कीस
  5. 1/2 टेबलस्पूनबेसन
  6. ८-१० कढीपत्ता पाने
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर बारीक चीरलेली
  8. 5-6काजू
  9. 1/2 टेबलस्पूनतीळ
  10. 1 टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट
  11. 1 टीस्पूनतिखट
  12. १-१/२ टीस्पून धणे जीरे पावडर
  13. 3 टेबलस्पूनतेल
  14. 1/2 टीस्पूनमोहरी
  15. 1/2 टीस्पूनहळद
  16. 1/4 टीस्पूनहिंग
  17. 1 टीस्पूनगरम मसाला
  18. 1/2 टीस्पूनसाखर
  19. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

३५ मीनीट
  1. 1

    प्रथम भेंडी स्वच्छ धुऊन कोरडी करून एका भेंडीचे २-३ तुकडे याप्रमाणे चिरून घेतली. कांदा, टमाटा, कोथिंबीर, कढीपत्ता हे पण चिरून घेतले.

  2. 2

    खोबऱ्याचा कीस भाजून घेतला. बेसन भाजून घेतले. तीळ भाजून घेतली. आणि आलं लसूण यांची पेस्ट करून घेतली.

  3. 3

    आता कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला. व डीशमधे काढून मग त्यातच भेंडी फ्राय करून घेतली. कांदा थंड झाल्यावर कांदा, खोबरं, भाजलेली तीळ व काजू यांची पेस्ट करून घेतली.

  4. 4

    कढईतील तेलात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता यांची फोडणी करून त्यात टमाटा परतून घेतला. मग त्यात तिखट, धने-जिरेपूड, गरम मसाला घालुन परतले.

  5. 5

    मग वरील वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घेतले. भेंडी घालून परतले. नंतर त्यात मीठ, कोथिंबीर व गरम पाणी घालून पाच मिनिट चांगले शिजू दिले. पाणी आपल्याला घट्ट कींवा सैलसर हवे त्या प्रमाणात घालावे.

  6. 6

    तयार भेंडी मसाला वाटी मध्ये काढून पोळी, कांदा व लिंबू यांच्या बरोबर सर्व्ह केला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या

Similar Recipes