मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तांदूळ स्वच्छ धुऊन घेतले. कांदा, टमाटा, कोथिंबीर या चिरून घेतले. मिरचीची पेस्ट करून घेतली. मसाले भाताचा मसाला तयार करून घेतला.
- 2
एक गॅसवऱ मसालेभात तयार करण्यासाठी पाणी गरम करून ठेवले व दुसऱ्या साईडला गॅस वर कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, आलं मिरची पेस्ट, कांदा परतून घेतले. मग त्यात तिखट व हळद घालून परतले..
- 3
आता त्यात तांदूळ परतून मग टमाटा मीठ, मसाले भाताचा मसाला सर्व मिक्स करुन तांदूळाच्या दुप्पट पाणी घालून मंद आचेवर शिजत ठेवले.
- 4
भात थोडा शिजत आल्यावर त्यात वाफवलेले मटार घातले.थोडे साजूक तूप घालून झाकण ठेवून छान वाफवून घेतले.
- 5
तयार मसाले भात डीशमधे काढून त्यावर कोथिंबीर व खोबरे घालून कोशिंबीरी बरोबर सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक प्लॅनर#शुक्रवार मसालेभात महाराष्ट्रीयन घरांमध्ये केली जाणारी रेसिपी आहे R.s. Ashwini -
महाराष्ट्रीयन मसाले भात. (maharastrian masale bhaat recipe in marathi)
#लंच साप्ताहिक लंच प्लॅनर ची पाचवी रेसिपी.. महाराष्ट्रातले लग्न म्हंटले की मसाले भात हमखास पाहायला मिळतो...असा हा स्वादिष्ट मसाले भात रेसिपी पाहा.. Megha Jamadade -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंचसाप्ताहिक रेसिपी लंच मध्ये मसाले भात बनवला आहे. पूर्वी लग्नात मसाले भात, मठ्ठा आणि जिलेबी हा बेत असायचाच.. आता लग्न समारंभात वेगळे पदार्थ तयार करतात.. Shama Mangale -
महाराष्ट्रीयन चमचमीत मसालेभात (masale bhaat recipe in marathi)
#लंच# शुक्रवार - मसालेभातसाप्ताहिक लंच प्लॅनर मधील पाचवी रेसिपी.मसाले भाताशिवाय पंगतीचे जेवण अपूर्णच असतं. गोडा मसाला, साजूक तूप , ओलं खोबरं ,मठ्ठा,जिलबी याचं अप्रतिम आणि चमचमीत combination म्हणजे मसाले भात...😋😋त्यातही भर म्हणून तूपात तळलेले काजूगर म्हणजे नखशिखांत नटलेलया सौंदर्यवंतीच्या भाळावरील चंद्रकोरच जणू!!😊चला तर,पाहूयात चमचमीत मसालेभाताची रेसिपी. Deepti Padiyar -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#स्नॅक्स# साप्ताहिक_ लंच# शुक्रवार _मसालेभात नंदिनी अभ्यंकर -
-
-
मसाले भात (masale baht recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमतमहाराष्ट्रातील जेवणा मधला पदार्थ मसाले भात.नैवैद्य म्हंटल की मसाले भात आलाच. वरण भाता बरोबर त्याला ही खूप महत्त्व असते. मग तो कांदा लसूण घालून असतो किंवा बिना कांदा लसणाचा. लागतो छानच. लग्नाच्या पंगतीत ताटा मध्ये वरण भात खाऊन झाल्यावर आवर्जून वाढतात.त्यात त्यावर खोबरं - कोथिंबीर आणि साजूक तूप म्हंटल की सोने पे सुहागा. त्यात वाफाळलेला मसाले भात, तो खाण्याचे एक वेगळाच स्वर्ग सुख!! Sampada Shrungarpure -
मसाले भात.. (masale bhaat recipe in marathi)
#लंच #साप्ताहिक लंच प्लॅनर #शुक्रवार मसाले भात-एक खमंग महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती.. फार पूर्वीपासूनच लग्नकार्यातील जेवणावळी घरातील सर्व सण ,समारंभ, यामध्ये मसाले भाताचे नाव मोठ आग्रहाने घेतले जायचे.. म्हणजे जेवणात पहिल्या वरण-भातानंतर मसाले भात हा हवाच.. शास्त्र होते ते.. परंतु आता लग्नाच्या जेवणावळीत मसालेभात हरवत चालला आहे. घरामध्ये सणांना केला जातो.. तो पण कधीतरी.. विविध मसाले, आवडीच्या भाज्या ,भरपूर साजूक तूप ,लिंबू ,खोबरं ,कोथिंबीर असा सगळा जामानिमा करून मसालेभाताला राजबिंड रूप दिलं जातं.. मसालेभातात मुक्त काजूची उधळण त्याला आणखीनच राजेशाही बनवते. दोन वर्षापूर्वी एका रेसिपी ग्रुपच्या अंगत-पंगत साठी माझ्या घरी आम्ही दहा जणी एकमेकांना आधी कधीही न बघितलेल्या यासाठी जमलो होतो. प्रत्येकीने चवदार चविष्ट पदार्थ करून आणले होते मी मसालेभात मठ्ठा व इतर पदार्थ केले होतेखूप मजा आली होती त्या दिवशी हसत-खेळत आमची अंगतपंगत पार पडली. पण हे तिथे थांबले नाही .आमच्या दहा जणींची मैत्री मात्र मसालेभात सारखीच स्वादिष्ट व रुचकर झाली .मसालेभातातील वेगवेगळ्या मसाल्यांचा प्रमाणेच आम्ही वेगवेगळ्या स्वभाव गुणधर्माचे आहोत. म्हणूनच आमचा "मैत्रीचा मसालेभात" दिवसेंदिवस खमंग होतोय.चला तर . Bhagyashree Lele -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#KS6जत्रा फूड... इंद्रायणी थडी जत्रा भोसरी-पुणे इथे भरते. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण इथल्या पदार्थांची रेलचेल असते. मावळातील इंद्रायणी तांदळाचा 'मसाले भात'ह्या जत्रेत पहायला मिळतो. म्हणून जत्रेत बनवला जाणारा मसालेभात केला आहे. Manisha Shete - Vispute -
मसालेभात रेसिपी (masale bhaat recipe in marathi)
#लंच#सप्ताहिक प्लॅनर#मसाले भात रेसिपी Rupali Atre - deshpande -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#लंच-मसाले भात-मटारचा सिझन आहे, बाजारात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, म्हणून मी आज हा भात केला आहे. Shital Patil -
डाळ खिचडी आणि कढी (dal khichdi and kadhi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#डाळ खिचडी आणि कढी Rupali Atre - deshpande -
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnap#Varsha Deshpandeतुमची रेसिपी करून बघितली, थोडासा बदल केला त्यात, सगळ्यांना आवडली :)आणि त्यात शिजल्यावर वास इतका छान येत होता आणि कधी एकदा वाढते सगळ्यांना असे झाले होते, आणि त्यात ओल खोबरं आणि कोथिंबीर समोर होती तरी वाढायला विसरून गेले.तोंडली थोडे प्रमाण कमी झाले कारण बाहेरून चांगल असून आत पिकले होते. Sampada Shrungarpure -
मसाले भात (masala bhaat recipe in marathi)
#लंच #शुक्रवार #महाराष्ट्रातील पारंपरिक मसाले भात पुर्वी नेहमी लग्नसमारंभात केला जायचा हल्ली विसरलेत सर्व. Hema Wane -
महाराष्ट्रीयन मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#cooksnapमहाराष्ट्रीयन मसाले भात आज मी गुढीपाडव्याच्या निमित्त बनवला आहे मेघा जमदाडे ताई यांची मी रेसिपी कूकस्नॅप केली आहे थोडासा बदल करून मसालेभात बनवला आहे, खूपच मस्त लागत आहे घरच्यांनाही खूप आवडला. चला तर मग बघुया सणासुदीला बनवला जाणारा महाराष्ट्रीयन मसाले भात कसा बनवायचा😘🙏 Vandana Shelar -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#GRमसाले भात हा आपल्या महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहे. पूर्वी लग्नाच्या पंगती मसाले भात आणि मठ्ठा याशिवाय उठतच नव्हत्या. आता पंगत भोजन राहिले नाही. आणि पारंपरिक पदार्थ ही दिसेनासे झाले.जग जवळ येत चालले आणि आपल्या पदार्थांची जागा जगातील इतर पदार्थानी घ्यायला सुरवात केली.मसाले भाताची जागा वेगवेगळ्या राईसने तर कोशिंबीर चटण्याची सलाड ने घेतली. असो जागा बरोबर आपल्याला चालावच लागणार. पण आपल्या कूकपॅडने आपल्याला वेगळे कॉन्सेप्ट देऊन आपली संस्कृतीआणि आपली परंपरा जपलेय. Shama Mangale -
-
-
मसाला भात रेसिपी (masala bhaat recipe in marathi)
#लंच-4- आज मी इथे साप्ताहिक लंच प्लॅनर मधील मसालेभात ची रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
महाराष्ट्रात सणावाराला आणि लग्न समारंभात आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे मसाले भात. Arya Paradkar -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#रेसिपीबुकWeek 4महाराष्ट्रीयन मसाले भात हा एक प्रकारचा पुलाव असून याचे महाराष्ट्रीयन थाळीत अढळ स्थान आहे. याच्याइतका रंगीबेरंगी पुलाव क्वचितच पाहण्यात येतो. आमच्या कोकणात आंबेमोहोर तांदूळ हा मानाचा, विविध भाज्या ज्या शिजल्यानंतरही आपला रंग आणि आकार शाबूत ठेवू शकतात अशा भाज्या जशा कि तोंडली, फरसबी, फ्लॉवर , मटार ,गाजर ,बटाटे आणि याउप्पर मसालेभाताचा खरा नायक असतो तो यात पडणारा मसाला. लग्नाच्या पंक्तीत मिळतो तसा मसाले भात मला खूप आवडतो. तसाच मसाले भात बनवण्याचा प्रयत्न केला आहे मी. ज्यांना कांदा लसूण वर्ज्य आहे त्यांनी हा भात जरुर खावा. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. स्मिता जाधव -
-
तोंडली मसाले भात (tondli masale bhaat recipe in marathi)
#cooksnapरुपालीची तोंडली भात रेसिपी कुकस्नॅप केली आहे. चवीला खूप छान बनला आहे.धन्यवाद रुपाली. Manisha Shete - Vispute -
-
मसाले भात (masale bhaat recipe in marathi)
#Gr#मसालेभातमसाले भात बघता ,आणि विचार करता फक्त लग्नाच्या पंक्ती ,समारंभ आठवतात मला आठवते लहानपणी फक्त लग्नसमारंभात मसाले भात खाण्यासाठीच आम्ही आवर्जून जायचो. मसालेभात बरोबर माझी आठवण हि माहेरची आहे मी ज्या कॉलनीत/ गल्लीत वाढली 50 घरांची माझी कॉलनी आहे त्या कॉलनित सगळ्या प्रकारची लोकं राहतात प्रत्येक सणवार, सुख-दुःख तिथे एकमेकांत बरोबर वाटून करतात मसालेभात हा माझ्या सर्वात जास्त आवडीचा माझ्या कॉलनीतले राहुडे काका ते हा मसाले भात खूप जबरदस्त आणि छान बनवतात त्यांना खाऊ घालण्याची खूप आवड आहे आत्ताच मी माहेरी जाऊन आली तेव्हा ही त्यांनी गल्लीत चूल मांडून मोठ्या पातेल्यात मसाले भात तयार केला आणि सगळ्यांना बोलून खाऊ घातला मी ही भरपूर खाल्लात्यांच्या घरी लग्नसमारंभात आवर्जून फक्त मसाले भात साठी जायचं सुख दुःखातही त्यांच्याकडचा मसाले भात खाऊ नही यायचो आणि घरी पण घेऊन यायचो. प्रत्येक पदार्थाचा हा आपला पहिला एक अनुभव खाण्याचा पहिल्यांदा कुठे खाल्ला त्याची आठवण प्रत्येकाला असतेच तशी मसाले भात माझी पहिली आठवण म्हणून मला राहुडे काका समोर येतात आजही माहेरी जाते त्यांना सांगावे लागते कामी आली आहे मसालेभात पाठवा आणि ते आवर्जून पाठवतात.आजही त्यांना आठवण करून मसालेभात तयार करत होती प्रयत्न करत होती तो टेस्ट आणण्याचा तिच सगळे घटक टाकण्याचा प्रयत्नही केला. आता तो भात कसा तयार झाला त्याची पावती तर काकांकडून मिळणार पण ते शक्य नाही. अजून एक मसालेभात आमच्या कॉलनीत अश्विन नवरात्र मध्ये भंडारा भरतो पायी जाणाऱ्या यात्रांकरू साठी तिथे मसाले भात ,मठठा ,पुरी भाजी जेवण देतात माहेरी होती तेव्हा रोज खायची.माझ्यामसालेभाताच्यागोड आठवणी आज शब्दात रेसिपी बघूया प्रयत्न केला पारंपारिक पद्धतीने तयार करण्याचा Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14335572
टिप्पण्या