शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपनीर
  2. 2कांदे
  3. 100 ग्रॅममगज बी
  4. 10 ग्रॅमखडा मसाला
  5. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  6. 2 टेबलस्पूनतेल किंवा बटर
  7. 8-10कढी कढीपत्त्याची पाने
  8. 1 टेबलस्पूनकसुरी मेथी
  9. 1 टीस्पूनतिखट
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टीस्पूनमीठ
  12. 1 टीस्पूनधणे पूड
  13. 1 टीस्पूनजीरे पूड
  14. 2 टीस्पूनगोडा मसाला
  15. 2 टेबलस्पूनटोमॅटो सॉस
  16. 1 टीस्पूनरेड फूड कलर
  17. 2 कपदूध
  18. 1 टेबलस्पूनफ्रेश क्रिम

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वप्रथम एक कढई गॅसवर ठेवावी.कढई तापल्यानंतर त्यात एक टेबलस्पून तेल ऍड करावे.तेल गरम झाल्यानंतर त्यात खडा मसाला, कढीपत्त्याचे पाने व कांदा ऍड करावे.कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट ऍड करावी. दोन मिनिटे सर्व मिश्रण परतत रहावे व त्यात मगज बी एड करावी.

  2. 2

    मगज बी ब्राऊन झाल्यानंतर गॅस बंद करावे व मिश्रण थंड होऊ द्यावे. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात थोडे पाणी घालून स्मूद पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    त्या कढईमध्ये परत एक टेबलस्पून तेल घ्यावे व तापल्यानंतर आवडीनुसार पनीर चिरून घ्यावे व या तेलात तळून घ्यावे.
    पनीर तळून काढल्यानंतर त्याच तेलात कसूरी मेथी घालावी व त्यावरून बनवलेली पेस्ट ऍड करावी व तेल सुटेपर्यंत पेस्ट हलवत राहावे.
    पेस्ट ला तेल सुटल्या नंतर त्यात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड व गोडा मसाला ॲड करावे.

  4. 4

    दोन मिनिटे मसाले शिजल्यानंतर त्यात टोमॅटो सॉस ॲड करावे. सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर रेड फुट कलर एड करावे व वरून दूध सोडावे. दूध सोडल्यानंतर मिश्रणाला उकळी येऊ द्यावे.

  5. 5

    ग्रेवी शिजल्यानंतर त्यात पनीर चे पिसेस ॲड करावे व ग्रेव्ही थोडी थिक होऊ द्यावी. तेल सुटलेले दिसल्यास गॅस बंद करावे.

  6. 6

    एका सर्विंग बोल मध्ये भाजी काढावी त्यावरून फ्रेश क्रीम सोडावे. भरून ताजे पनीर किसून घालावे. आपले शाही पनीर रेडी आहे.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes