भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#ब्रेकफास्ट
#भगरीचा_उपमा
भगर म्हणजे वरीचे तांदूळ. सहसा ऊपवास सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.
पण हि भगर एवढी पौष्टिक असते कि एरवी सुद्धा तिच्या वेगवेगळ्या रेसिपी करून खाऊ शकतो.
भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने थोडी खाल्ली तरी अंगात शक्ती येते. तसेच कॅलरी कमी असल्याने वजन आटोक्यात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
ग्लूटेन नसल्याने तसेच फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचायला हलकी आहे.
लो ग्लायसेमिक इंडेक्स मुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना भाता ऐवजी हा उत्तम असा पर्याय आहे.
आयर्न जास्त प्रमाणात असल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.
भगरीत व्हिटॅमिन सी, ए, इ जास्त प्रमाणात असतात तसेच खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
सोडियम नसल्याने बी पी नियंञणात ठेवण्यासाठी फायदा होतो.
अशी ही पौष्टिक भगर सर्वांसाठी खूप फायदेशीर असल्यामुळे नियमित आहारात खाल्ली पाहिजे.
चला तर मग रेसिपी बघुया भगरीचा उपमा 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
2 व्यक्तींसाठी
  1. 1/2 कपभगर/वरीचे तांदूळ,
  2. 2 टेबलस्पूनतेल,
  3. 1/2 टीस्पूनमोहरी,
  4. 1/2 टीस्पूनजीरे ,
  5. 7/8कढीपत्ता,
  6. 4/5हिरव्या मिरच्या,
  7. 1कांदा बारीक चिरून,
  8. 1टोमॅटो बारीक चिरून,
  9. 1/4 टीस्पूनहिंग,
  10. 1/2 कपमटार,
  11. 1 टीस्पूनलिंबाचा रस,
  12. चवीनुसारमीठ,
  13. कोथिंबीर,
  14. 3 कपपाणी
  15. 1 टीस्पूनसाजूक तूप

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    भगर निवडून कढईत गुलाबी रंगावर परतून घ्यावे. ताटात काढून ठेवावी.

  2. 2

    कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जीरे, कढीपत्ता घालून फोडणी करावी. मिरच्या घालाव्यात, कांदा घालून परतून घ्यावे.

  3. 3

    कांदा परतल्यानंतर हिंग घालून परतून घ्यावे, टोमॅटो घालून मऊसर शिजवून घ्यावे. मटार घालून परतून घ्यावे.

  4. 4

    मटार थोडा शिजला कि त्यात पाणी घालून चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालून मिक्स करावे. ऊकळी आल्यावर भगर घालून मिक्स करावे.

  5. 5

    झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावे. साधारण आठ ते दहा मिनिटात शिजते. वरून कोथिंबीर घालून मिक्स करावी.
    सर्व्ह करताना वरून तूप आणि लिंबू रस घालावा. खूप छान लागतो.

  6. 6

    टिप _माझ्याकडे कढीपत्ता नेमकी संपला त्यामुळे मी नाही घालू शकले.
    तुम्ही आवडीनुसार भाज्या घालून करू शकता.
    मला मऊसूत आवडतो म्हणून मी तीन कप पाणी घालून करते.
    कोरडा हवा असल्यास पाणी थोड कमी घालावे. तसेच हळद घालून मस्त पिवळसर उपमा सुद्धा छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes