मसाला घावन (masala ghavan recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#ब्रेकफास्ट
#घावन-शुक्रवार
घावन म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पांढरे लुसलुशीत तांदळाचे घावन.घावन हा कोकणातला पदार्थ. ह्यात मुख्यतः तांदुळाचं पीठ असतं.याच रेसिपी मध्ये थोडा बदल करून मी आज मसाला घावनची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करत आहे.मस्त चव लागते. दिसायला ही छान होतात आणि एक वेगळा प्रकार म्हणुन घरच्यांनाही आवडतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
8-9 सर्व्हिंग्ज
  1. 2कप- तांदळाचे पीठ
  2. 2 टीस्पून- रवा
  3. 1/4 टीस्पून- हळद
  4. 1/4 टीस्पूनटीस्पून- लाल तिखट
  5. 1/4 टीस्पूनटीस्पून- जीरे
  6. 1/4 कप- खोबऱ्याचे पातळ काप
  7. 2 टीस्पूनटेस्पून- कोथिंबीर
  8. मीठ चवीनुसार
  9. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    तांदुळाचे पीठ घेऊन त्यात दोन चमचे रवा घाला.

  2. 2

    आता यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ, जिरं,कोथिंबीर आणि पाणी घाला. पीठ अगदी पातळ भिजवून घ्या.

  3. 3

    सर्व एकत्र हलवून घावनाचे पीठ अगदी पातळ भिजवायचं रवा डोश्यासारखं.भिजवलेले पीठ 10-15 मिनिटं झाकून ठेवा.

  4. 4

    सपाट तवा खूप गरम करून काठ असलेल्या भांड्याने जरा उंचावरून हे पीठ गरम तव्यावर ओतायचे. पीठ ओतताना भांडे गोल फिरवायचं म्हणजे छान पातळ आणि जाळीदार घावन बनतात.

  5. 5

    तव्यावर घातल्यावर गॅस मध्यम करा. झाकण ठेवून घावन भाजा. २ मिनिटांनी झाकण काढून चेक करा. जर घावनावर ओलं पीठ दिसत असेल तर अजून थोडा वेळ झाकण ठेवून भाजा.घावनावर २ थेंब तेल/तूप पसरवा आणि घावन परता. आता झाकण न ठेवता भाजा.

  6. 6

    जाळीदार मसाला घावन चटणी, लोणचे, टोमॅटो सॉस, दही कशाबरोबरही सर्व्ह करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes