भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)

#cooksnap # Jyoti Chandratre # उपावसकरिता नेहमी वेगळ्या प्रकारची आणि पद्धतीची रेसिपी बघत असते. अशात मी अशाप्रकारे न केलेल्या पद्धतीने हा उपमा केला आहे. छान झाला आहे उपमा ...thanks
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#cooksnap # Jyoti Chandratre # उपावसकरिता नेहमी वेगळ्या प्रकारची आणि पद्धतीची रेसिपी बघत असते. अशात मी अशाप्रकारे न केलेल्या पद्धतीने हा उपमा केला आहे. छान झाला आहे उपमा ...thanks
कुकिंग सूचना
- 1
प्रथम भगर निवडून धुवून घ्यावा. बटाटा, मिरची चिरून घ्यावी. त्यानंतर कढई मध्ये थोडेसे तेल टाकून भगर 3-4 मिनिट भाजून घ्यावा. आणि बाजूला काढून घ्यावा.
- 2
आता गॅस सुरू करून त्यावर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे, मिरची, कढीपत्ता, बटाटे आणि शेंगदाणे टाकावे. थोडे परतून घेतल्यावर त्यात, 4 वाट्या पाणी, गरम केलेले टाकावे. आणि त्याला उकळी येऊ द्यावी.
- 3
उकळल्यावर त्यात भाजलेला भगर टाकावा. चवीनुसार मीठ टाकावे आणि झाकण ठेवून 5*7 मिनिट शिजवावे. त्यानंतर झाकण काढून बगर शिजल्यची खात्री करावी. आता भाग्रीचा उपमा तयार आहे.
- 4
गरमागरम सर्व्ह करताना वरून खोबरे किस, चालत असल्यास कोथिंबीर घालून सर्व्ह करावा. लोणचे किंवा फोडणीचे ताक सोबत द्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#भगरीचा उपमा अगदी झटपट होणारा नाष्ट्या साठी खूप छान आणि हेल्दी असा पदार्थ आहे. उपवासाला ही हा पदार्थ खाता येतो. Rupali Atre - deshpande -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#उपवास#नवरात्र#उपमा, आमचेकडे उपवासाला बहुधा साबुदाण्याची खिचडी किंवा भगर करतात. परंतु ईतर वेळीही गरमागरम भगरीचा उपमा खायला खूप छान लागतो. तेव्हा आपण त्यात आणखी काही पदार्थ टाकू शकतो. पण मी मात्र उपवासाला चालणारा उपमा केलाय. यात मी गाजर टाकले आहे. पण काही भागात उपवासाला गाजर खात नाही. तेव्हा ते न टाकताही हा उपमा आपण करु शकतो....चला तर मग... Varsha Ingole Bele -
भगरीचा उपमा (Bhagricha Upma Recipe In Marathi)
#SRशिवरात्रीच्या उपवासाच्या दिवशी जेवणाच्या वेळी भगरीचा उपमा हा खूप चांगला पर्याय आहे.भाताची कसर भरून काढणारा असा भगरीचा उपमा दह्याबरोबर खाल्ला की परिपूर्ण भोजनाचा आनंद मिळतो. Anushri Pai -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#भगरीचाउपमा#4 ब्रेकफास्टप्लॅनर मधली चौथी रेसिपी भगरीचा उपमा.... उपवासासाठी करायचा नसल्याने मस्त वेरीएशन करून केला,आणि खुपच टेस्टी झाला,तर तुम्ही ही करून बघा..... Supriya Thengadi -
भगरीचा उपमा.. (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट #शुक्रवार वरीचेतांदूळ, समा चावल,मोरधन अशी वेगवेगळी नावं आहेत या भगरीला.. साबुदाणा आणि उपवास यांचं घट्ट नातं आहे त्याचप्रमाणे खासकरून नवरात्रात भगर आणि उपवास यांचे नाते बघायला मिळते. वरीचे तांदूळ आणि दाण्याची आमटी हा आमच्या घरचा आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या दिवशी चा पेटंट मेनू ठरलेला... वरईचे तांदूळ अत्यंत झटपट होणारा आणि पचायला हलका विथ नो कॅलरीज , नो शुगर , फायबर आर्यन, कॅल्शियम अधिक प्रमाण असणारा असा पदार्थ.. याने वजनही वाढत नाही. त्यामुळे डायबीटीस आणि हृदय रोग रुग्णांना हे वरदानच आहे.. कोणत्याही रासायनिक खतांचा वापर करत नसल्यामुळे हे तर Organic food आहे.. आतापर्यंत दुर्लक्षिला गेलेला पदार्थ.. पण जसे याचे गुण समजून आले तेव्हापासून केवळ उपवासाच्या दिवशी खाण्यापुरता मर्यादित न राहता वर्षभर वऱ्याचे तांदूळ लोक खाताना आपल्याला दिसतात एवढेच नाही तर युरोप आणि अमेरिकेतूनही याची मागणी वाढली आहे.गेल्यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक आहारावर बोलताना ज्वारी बाजरी आणि भगर याचा उल्लेख केला होता तसेच ओरिसात भगवान जगन्नाथ पुरी चा उत्सव जगप्रसिद्ध असून तिकडे भाविकांना खीर प्रसाद म्हणून दिली जाते ही खीर भगर, ओल्या नारळाचे दूध, गूळ यापासून तयार केली जाते. भगरीमध्ये जास्त प्रोटीन असल्यामुळे उपवासाच्या दिवशी थोडी खाल्ली तरी पोट भरल्यासारखे वाटते. फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशन काही त्रास होत नाही .. लो ग्लायसेमिक इंडेक्स मुळे डायबिटीस मध्ये भाताच्या ऐवजी भगर खाल्ली तर फायदेशीर असते.. कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असल्यामुळे आणि पचायला सोपे असल्यामुळे वजन वाढीसाठी त्रास होत नाही. भगर हे पूर्णपणे ग्लूटन-फ्री आहे त्यामुळे अपचन हा सारखा त्रासही होतनाही.चलातरमगरेसिपी Bhagyashree Lele -
भगरीचा उपमा 😋 (bhagricha upma recipe in marathi)
#शुक्रवार# ब्रेकफास्ट प्लॅनर# भगरीचा उपमा🤤 Madhuri Watekar -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#भगरीचा_उपमाभगर म्हणजे वरीचे तांदूळ. सहसा ऊपवास सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.पण हि भगर एवढी पौष्टिक असते कि एरवी सुद्धा तिच्या वेगवेगळ्या रेसिपी करून खाऊ शकतो.भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने थोडी खाल्ली तरी अंगात शक्ती येते. तसेच कॅलरी कमी असल्याने वजन आटोक्यात ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.ग्लूटेन नसल्याने तसेच फायबर भरपूर प्रमाणात असल्याने पचायला हलकी आहे.लो ग्लायसेमिक इंडेक्स मुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांना भाता ऐवजी हा उत्तम असा पर्याय आहे.आयर्न जास्त प्रमाणात असल्याने हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.भगरीत व्हिटॅमिन सी, ए, इ जास्त प्रमाणात असतात तसेच खनिजे सुद्धा जास्त प्रमाणात असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.सोडियम नसल्याने बी पी नियंञणात ठेवण्यासाठी फायदा होतो.अशी ही पौष्टिक भगर सर्वांसाठी खूप फायदेशीर असल्यामुळे नियमित आहारात खाल्ली पाहिजे.चला तर मग रेसिपी बघुया भगरीचा उपमा 😊 जान्हवी आबनावे -
मिक्स व्हेजटेबल उपमा (mix vegetable upma recipe in marathi)
#cooksnap # दीप्ती पडीयार # आज मी दिप्तीचा रेसिपी प्रमाणे उपमा तयार केला आहे. छान झाला आहे उपमा...thank you दीप्ती.. Varsha Ingole Bele -
साबुदाणा उपमा (Sabudana upma recipe in marathi)
#Breakfast... साबुदाणा म्हटला की नेहमी उपवासाची आठवण येते. पण कधी कधी उपवास नसताना साबुदाण्याची खिचडी किंवा उसळ नाही म्हणणार मी त्याला मस्तपैकी चमचमीत उपमा केला की खाण्यास मजा येते... गरमागरम हा असा हा उपमा नक्की एखाद्यावेळेस करून पहा... Varsha Ingole Bele -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#Fridayउपवासाला अगदी उत्तम डीश पचायला हलकी स्टर्च फायबरने भरपूर झटपट होणारी.चलातर मग बघूया. Jyoti Chandratre -
उपवासाचा भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासाला आपण साबुदाणा बटाटे शेंगदाण्याचे वेगवेगळे प्रकार करतो व खातो त्यापेक्षा भगर ( वरीचे तांदुळ ) कधीही हेल्दी आहे भगर ही पचनाला हलकी नो कॅलरिज नो शुगर वजन वाढत नाही मधुमेही हृदयरोग रुग्णांनाही भगर खाण्याचा सल्ला दिला जातो भगरीत फायबर आयर्न कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी भगरीचा उपवासाचा उपमा चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
उपीट / उपमा (upit recipe in marathi)
#cooksnap # रंजना माळी # आज मी रंजनाच्या, रेसिपी प्रमाणे उपमा/ उपीट बनविले. मी कधी आधी पाणी टाकून उपमा बनवत नसते. छान झालाय उपमा किंवा उपिट.... Thanks रंजना.. Varsha Ingole Bele -
भगरीचा उपमा (bhagricha upma recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#breakfast#bhagar#bhagarichaupma#भगरकूकपॅड ने दिलेल्या ब्रेकफास्ट प्लॅन प्रमाणे भगरीचा उपमा बनवला . भगर म्हणजे उपवासाचे तांदुळ . भगर जाड बारीक पांढरा रंगांच्या दाण्याची असते. कोणी सामा कोणी वरीचे तांदूळ कोणी मोरयो अशी भगर ची वेगवेगळी नावे आहेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावे आहे. भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते. भगरीचे आरोग्यासाठी बरेच फायदे आहेउपवास करताना आपल्या शरीराला पोषक आहार मिळून ऊर्जा टिकून राहण्यासाठी भगरीचा वापर सर्वात जास्त करावा. भगर ही खूपच पौष्टिक असते पण आपल्याला नेहमीच वाटत असते ती फक्त उपवास असतो तेव्हा च खायला हवी. पण आता भगरातली गुणवत्ता आता बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहीत झाली आहे. आपल्या रोजच्या आहारात, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीच्या जेवणात आपण भगर खाऊ शकतो. त्यात बऱ्याच प्रकारच्या भाज्या टाकू शकतो जी लोकं तांदूळ खात नाही डाएट करतात त्यांच्या प्लॅनमध्ये भगर समाविष्ट असते तेव्हा ते लोक रात्रीच्या जेवणात तांदूळ खाण्याच्या इच्छेला भगर खाऊन पूर्ण करून घेतात. पचायला ही खूप हलकी असते, मला स्वतःला भगर खूप प्रिय आहे आज मी ज्या पद्धतीने दाखवत आहे ह्या पद्धतीची भगर मला खूप आवडते. ही भगर उपवासाला ही चालते. कोणाला घट्ट कोणाला पातळ कोणाला नरम अशाप्रकारे भगर बनवू शकतो. भगर ला आपल्या रोजच्या आहारात समाविष्ट करू या. Chetana Bhojak -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#cooksnap# दलिया उपमा # Vaishavi Dodke यांची दलिया उपमा ही रेसिपी cooksnap केली आहे. मी यात फुलकोबी ऐवजी गाजर आणि वाटाणा ऐवजी ओले हरबरे टाकले आहे. आणि थोडी साखर टाकलेली आहे. पण एकंदरीत खूप चविष्ट झाला आहे उपमा... Varsha Ingole Bele -
भगरीचा उपमा (UPAMA RECIPE IN MARATHI)
आज माझा उपवास... घरातील सर्वाना आपापल्या आवडीनुसार त्यांचे करून दिल्यावर आपल्या साठी काही करणे खरच खूप जिवावर येत.. अशा वेळेस लवकर काही तरी खायला करता आले तर... आणि मग विचार केला लवकरात लवकर भगरीचा उपमा बनविण्याचा... Vasudha Gudhe -
फोडणीची भगर (phodnichi bhagar recipe in marathi)
#nrrभगर ही पचायला अतिशय हलकी आहे तसेच ग्लूटेन फ्री आहे. यात प्रोटीन चे प्रमाण जास्त असते त्यामुळे भगरीचे सेवन केले की आपल्याला लवकर भूक लागत नाही. यात कॅल्शियम जास्त असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा अतिशय उपयोगी आहे त्यामुळे भगर ही फक्त उपवासाला न खाता तिचा आपल्या दैनंदिन जीवनात वापर केला पाहिजे तर आज मी उपवासाची फोडणीचे भगर बनवली आहे चला तर मग पाहूया त्याची रेसिपी Ashwini Anant Randive -
दलिया उपमा (daliya upma recipe in marathi)
#GA4 #Week5उपमा आणि काजू हा कीवर्ड ओळखून मी दलिया उपमा काजू घालून केला आहे. Rajashri Deodhar -
भगरीचा डोसा (bhagricha dosa recipe in marathi)
#nrr#नवरात्री स्पेशल रेसिपी#भगरभगर म्हणजेच ‘वरीचे तांदूळ’ हे आपल्या घरी उपासाच्या दिवशी केले जातात.सहसा उपासाचा दिवस सोडला तर इतर दिवशी आपण भगर खात नाही.पण या भगरीत काय काय घटक आहेत आणि ती किती पौष्टिक आहे हे वाचले तर असे लक्षात येईल की एरवी सुद्धा खायला हा पदार्थ किती चांगला आहे.आज आपण याच उपासाच्या पदार्थाबद्दल जाणून घेणार आहोत.भगरीमध्ये प्रथिने चे प्रमाण भरपूर असते.जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे थोडीशी भगर खाऊन सुद्धा शरीरात शक्ती येते.भगरीत फायबर खूप जास्त प्रमाणात आढळतात.भगरीत आयर्न जास्त प्रमाणात आढळते.म्हणूनच आपल्याला जर ऍनेमियाचा त्रास (शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे) तर शरीरातले हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी भगर उपयोगी आहे.भगर हे ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ आहे. ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड’ म्हणजे असे अन्न ज्यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते आणि असलेले कार्बोहायड्रेट पचायला अतिशय सोपे असते.तर अशा बहुगुणी भगरीचा मी हलकाफुलका डोसा बनवला खुप छान लागतो चव पण एकदम मस्त 👌😋 Sapna Sawaji -
भगरीचे कटलेट (bhagriche cutlets recipe in marathi)
#mfr वर्ल्ड फुड डे चॅलेंज च्या निमित्ताने केलेले हे भगरीचे कटलेट ... आजच्या चतुर्थी च्या उपवासाच्या निमित्ताने केलेले...मला आवडणारे.. फक्त थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेले ...छान क्रिस्पी... Varsha Ingole Bele -
दही उपमा (Dahi Upma Recipe In Marathi)
#BRR.. कधीतरी, नेहमीच्या पद्धतीने उपमा करायच्या ऐवजी, वेगळ्या चवीचा प्रकार करावासा वाटतो. म्हणून मग मी, दही टाकून उपमा केलाय.. मस्त टेस्टी लागतो. Varsha Ingole Bele -
वरी (उपमा) (vari upma recipe in marathi)
#nrr अंबे मातेचा उदो उदो! आज नवरात्रीचा चौथा दिवस आणि चौथा कलर ( केशरी ) Orange.... वरी चे खुप प्रकार आहे..... त्यातलाच एक ( उपमा ). आपण जसा जाड रव्याचा उपमा करतो.....अगदी तसाच. फक्त हा खास उपवासा साठी केला जातो. ( वरीचा उपमा )......Sheetal Talekar
-
-
-
उपमा रेसिपी (upma recipe in marathi)
#GA4 #week5मी आज येथे रव्याचा उपमा बनवला आहे. हा खाण्यासाठी हलका आणि पौष्टिक असा नाश्ता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हा वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. Deepali Surve -
नाचणीचा उपमा😋 (nachnicha upma recipe in marathi)
नेहमी आपण रव्याचा उपमा करतो पण हा नाचणीच्या उपमा खुप पोष्टीक आणि वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी रेसिपी आहे. Vaishnavi Dodke -
झटपट साबुदाणा वडे (इंन्स्टट) (sabudana vade recipe in marathi)
मी किंवा आपण सर्वजण साबुदाणा भिजवून वडे बनवतो.आज मी वेगळ्या पद्धतीने वडे केले आहे. साबुदाणा भिजवायला विसरला किंवा वडे खायची इच्छा झाली की या पद्धतीने नक्की करून बघा. चटणी पण दहयाची केली आहे. नेहमी पेक्षा वेगळी. Sujata Gengaje -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5#उपमाआज सकाळी मी नाश्त्याला उपमा बनवलेला होता आणि हा उपमा ची रेसिपी week 5 मध्ये शेअर करीत आहे... Monali Modak -
उपमा (upma recipe in marathi)
#GA4 #week5 पझल मधील उपमा पदार्थ. नाष्टयाला नेहमी बनणारा पदार्थ. Sujata Gengaje -
रताळे उपमा (ratale upma recipe in marathi)
#GA4 #week11#रताळ्याच्या उपमा केला आहे मी आज ! छान टेस्टी होतो उपमा! नेहमी गोड रताळी खाण्यापेक्षा, हा तिखट रताळ्याचा प्रकारही करुन पाहायला काही हरकत नाही... शिवाय झटपट होतो..... Varsha Ingole Bele -
ब्रेड चा उपमा (bread cha upma recipe in marathi)
ब्रेड रेसिपी कूकस्नॅप चॅलेंज.मी प्रिती साळवी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खूप छान झाला ब्रेडचा उपमा. मी साधा ब्रेडच वापरला आहे.मी नेहमी करते,त्यात टोमॅटो व सिमला मिरची घालत नाही. Sujata Gengaje
More Recipes
टिप्पण्या