चाकवतची ताकभाजी (Chakvatchi takbhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#भाजी# हिवाळ्याच्या दिवसांत चाकवत ची भाजी मिळते. या भाजीची, डाळ भाजी किंवा ताक भाजी, अथवा गोळे करतात. मी आज ताक भाजी केली आहे. गरमागरम भाकरी सोबत मस्त लागते ही भाजी...शिवाय सोबत कांदा, आणि तळलेली हिरवी मिरची असली काही विचारूच नका...तर बघू या..

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20-25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमचाकवत ची भाजी
  2. 3/4 कपचणाडाळ पीठ
  3. 1/2 लिटरताक आंबट
  4. 2 टेबलस्पूनहिरवा वाटाणा
  5. 2-3हिरव्या मिरच्या
  6. 7-8कढीपत्ता पाने
  7. कोथिंबीर
  8. 1 टेबलस्पूनतेल
  9. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  10. 1 टीस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 1-1/2 टेबलस्पूनतिखट किंवा चवीप्रमाणे
  14. 1/2 टीस्पूनधने पूड
  15. चवीनुसारमीठ
  16. गरजेप्रमाणे पाणी
  17. 1 टेबलस्पूनतेल तडका देण्यासाठी
  18. 1 टीस्पूनमोहरी जीरे
  19. 4-5लसूण पाकळ्या चिरून

कुकिंग सूचना

20-25 मिनिट
  1. 1

    चाकवत निवडून 5 मिनिट पाण्यात ठेवून स्वच्छ धुवून घ्यावी.

  2. 2

    मिक्सर मधून फिरवून पेस्ट करून घ्यावी.

  3. 3

    ताकात डाळीचे पीठ टाकून चांगले एकत्र घुसळून घ्यावे. आता गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे मोहरी आणि हिंग टाकावा.

  4. 4

    यातच कढीपत्ता, मिरची आणि वाटाणा टाकावा.आले लसूण पेस्ट टाकावी. तसेच हळद, धणे पूड, आणि तिखट टाकून मिक्स करावे.

  5. 5

    त्यानंतर चाकवतची तयार केलेली पेस्ट टाकून मिक्स करून घ्यावे. थोडेसे पाणी टाकून 2 मिनिट शिजवावे.

  6. 6

    1-2 उकळ्या आल्यानंतर त्यात भिजविलेले डाळीचे पीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. गरजेप्रमाणे पाणी टाकावे.

  7. 7

    झाकण ठेवून 4-5 मिनिट शिजवून घ्यावे. पाहिजे त्या प्रमाणात घट्ट झाल्यावर त्यात कोथिंबीर टाकावी. ही भाजी, कढी पेक्षा घट्ट आणि पिठल्यापेक्षा पातळ असावी.

  8. 8

    आता तेलात जीरे, मोहरी आणि लसूण पाकळ्या चिरून टाकून तडका तयार करावा. आणि भाजीत टाकावा. की ताक भाजी, गरमागरम भाकरी, आणि सोबत तळलेली हिरवी मिरची आणि कांद्यासोबत वाढावी.

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes