दडपे पोहे (dadpe pohe recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#wd
#cooksnap
Happy women's day to dear friends 🎉😘
आज मी भाग्यश्री ताईंची रेसिपी cook snap केली आहे. लहानपणी दडपे पोहे आई करायची पण लग्नानंतर आज मी प्रथमच हे करून पाहिले. भाग्यश्री ताई ची सोपी व पटकन होणारी रेसिपी घरात मुलांनी खूपच आवडीने खाल्ली.
भाग्यश्री ताईंचं उत्तम लिखाण व तितकेच नवनवीन सुंदर रेसिपीज मला खूप आवडतात. Thank you so much Tai🙏🥰😘

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. 2 वाटीपोहे
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 1काकडी
  5. 3-4हिरव्या मिरच्या
  6. कढीपत्ता
  7. शेंगदाणा
  8. ओलेखोबरे
  9. मोहरी
  10. हळद
  11. लिंबूरस
  12. साखर
  13. मीठ
  14. तेल
  15. सजावटीसाठी बारीक शेव व बुंदी
  16. कोथिंबीर

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    एका पसरट भांड्यामध्ये पोहे घ्यावे त्यामध्ये गरजेपुरते नारळ पाणी घालावे. मग त्यामध्ये साखर चवीपुरते मीठ व लिंबूरस घालून मिक्स करून घ्यावे. कांदा टोमॅटो व काकडी बारीक कट करून घ्यावे. हे सर्व कट केलेले मिश्रण पोह्या मध्ये घालून मिक्स करून दहा मिनिटे साईडला ठेवावे.

  2. 2

    आता आपण फोडणी ची तयारी करून घेऊया हिरवी मिरची कट करून घ्यावी कडीपत्ता कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.एका छोट्या भांड्यामध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये शेंगदाणे तळून घ्यावेत ते पोह्यावर काढून घ्यावेत त्यानंतर त्यास तेलामध्ये मोहरी हिरवी मिरची कडीपत्ता घालून फोडणी तयार करून घ्यावी व गॅस बंद करुन त्यामध्ये हळद घालावी.

  3. 3

    तळलेले शेंगदाणे व तयार फोडणी पोह्यावर घालावी. हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. मग त्यामध्ये ओले खोबरे व कोथिंबीर घालावे.

  4. 4

    हे दडपे पोहे सर्व करताना त्यावर बारीक शेव व मी बूंदी चा वापर केला आहे. असे हे दडपे पोहे तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes