पुरणाची  वांगी(भरली वांगी) (bharli vangi recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

पुरणाची वांगी किंवा ह्याला भरली वांगी ही म्हणतात.
ही भाजी सर्वांनाच आवडते म्हणून वारंवार केली जाते.ह्या ॠतूत वांगीही छान मिळतात बाजारात.
आज मैत्रीणी येणार आहेत म्हणून हा प्रपंच. बघा तर कशी करायची पुरणाची वांगी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनीटे
5/6 सर्व्हिंग्ज
  1. 15-20छोटी वांगी
  2. 3मध्यम बटाटे
  3. 1 कपकांदा
  4. 1 कपखवलेला नारळ
  5. 1/2शेंगदाणे कुट
  6. 1/2कोथिंबीर
  7. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 2 टेबलस्पूनगोडा मसाला
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1 टेबलस्पूनमीठ
  11. 2 टेबलस्पूनगुळ
  12. 1/4 कपतेल

कुकिंग सूचना

40 मिनीटे
  1. 1

    बटाटे,वांगी धुवून मधून चिरून घ्यावी नि पाण्यात ठेवावी.कांदा, कोथिंबीर चिरून घ्यावी.

  2. 2

    नारळ खऊन घेणे,दाण्याचे कूट नसेल तर करणे.खालीलप्रमाणे तयारी करावी.

  3. 3

    सर्व मसाले,कांदा,कोथिंबीर,खोबरे,दाण्याचे कूट एकत्र करून मिसळून घेणे.हा मसाला वांग्यामधे खालील प्रमाणे भरून घेणे.

  4. 4

    आता कढईत 1/4 कप तेल तापत ठेवावे तापले कि त्यात हिंग घाला नि नंतर त्यात वांगी टाका, बटाटे टाका नि वाफेवर शिजवून घ्या. शेवटी थोडे गरम पाणी घाला.

  5. 5

    मस्त चमचमीत भरली वांगी तयार आहेत भाकरी बरोबर एकदम मस्त लागतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes