भरली वांगी(पुणेरी) (bharli vangi recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB2 #W2
हिवाळा आणि वांगी यांचं अतूट नातं आहे.तसं पाहिलं तर हल्ली वर्षभर वांगी मिळतात.पण थंडीत वांग्याची भाजी म्हणजे मेजवानीच असते!
वांगी प्रकृतीने उष्ण ,त्यामुळे थंडीत उर्जा वाढवण्यासाठी वांगी भाजी,भरीत या स्वरूपात सेवन केली जातात.गरम बाजरीची भाकरी आणि भरल्या वांग्याची भाजी म्हणजे स्वर्गसुखच!...मग बाकी काही नसले तरी चालते.खरंतर चुलीवरचा या भाजी भाकरीचा स्वयंपाक अगदी खुमासदार असतो,पण आपल्या शहरात हे सुख कुठले?...मग विविध हॉटेल्स, रिसॉर्ट, पिकनिक स्पॉट्स इथे आवर्जून मिळतं हे खास गावरान चवीचं भोजन.कृष्णाकाठची वांगी अगदी जांभळी,काटेरी,पातळ सालीची.जळगावकडची खास भरितासाठी.प्रत्येक प्रांताची चव निराळी!काळी,लांब बंगाली वांगी मिळमिळीत चवीची...ती आपल्याकडे फारशी नाही खाल्ली जात.सांबारातही दक्षिणेकडे वांग्याचा वापर केला जातो.वांग्याचे काप म्हणजे खमंग साईड डीश...तर डाळवांगे म्हणजे मस्त आंबटगोड आमटी आणि त्याबरोबर आंबेमोहोर तांदळाचा भात....याची चव न्यारीच.वांगीबटाटा रस्सा अगदी वेळ भागवणारी भाजी,तर संक्रांतीच्या लेकुरवाळ्या भाजीत वांगी अग्रस्थानी. भरिताचेही अनेक प्रकार!वांगी व बटाटा उकडून त्याचं भरित करणं म्हणजे माझ्या आजीचा अगदी आवडता प्रकार!चातुर्मासात वातकारक म्हणून वर्ज्य असलेली वांगी चंपाषष्ठीला भरित रोडग्याचा नैवेद्य खंडोबाला दाखवून मग खायला सुरुवात होत असे.म्हणजे ही वांगी आषाढ ते कार्तिक पावसाळा वातदोष वाढवणारी म्हणून निषिद्ध तर मार्गशीर्षापासून थंडी पडायला लागत असल्याने पुन्हा आहारात समावेश!आपल्या पूर्वजांना आहाराचे किती ज्ञान होते ते यावरुन कळते.चला तर भाजीच्या तयारीकडे वळू!ही भाजी पुणेरी यासाठी की यात मी फक्त गोडा मसाला वापरला आहे,तरीही सुंदर चव आली आहे.😋😋🍆🍆

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मि.
5-6व्यक्ती
  1. 1/2 किलोकाटे वांगी-थोडीशी मोठी
  2. 1 कपनारळ चव
  3. 2मध्यम कांदे
  4. 8-10लसूणपाकळ्या
  5. 1 इंचआले
  6. 1/2 कपकोथिंबीर
  7. 2-3हिरव्या मिरच्या
  8. 2 टीस्पूनलिंबाचा रस
  9. 2-3 टेबलस्पूनगोडा मसाला
  10. 1 टीस्पूनलाल तिखट
  11. 2-3 टीस्पूनमीठ
  12. 2-3 टेबलस्पूनगूळ
  13. 4 टेबलस्पूनदाण्याचे कूट
  14. 1/2 कपतेल
  15. 2 कपपाणी

कुकिंग सूचना

30मि.
  1. 1

    वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत.थोडेसे देठ कापून घ्यावेत,थोडे ठेवावेत.वांगी चिरताना देठाच्या बाजूने उभा आणि खालच्या बाजूने आडवा असा छेद द्यावा.यामुळे दोन्ही बाजूंमध्ये मसाला व्यवस्थित भरता येतो.याप्रकारे वांगी चिरावीत.
    एका कुंड्यामध्ये दाण्याचे कूट,गूळ, तिखट,गोडा मसाला,मीठ,हिंग,हळद घ्यावे.ओले खोबरे,आले,मिरची,कोथिंबीर याचे मिक्सरमधून वाटण करावे.कांदे,लसूण चॉपरमधून बारीक करून घ्यावे.

  2. 2

    सर्व साहित्य व मीठ घालून आता एकत्र करुन त्यावर लिंबाचा रस घालावा.सर्व वांग्यांमध्ये हा मसाला भरुन घ्यावा.

  3. 3

    ही भाजी प्रेशरकुकरमध्ये केली आहे.थोडेसे जास्त तेल घालून मोहरी,हळद घालून फोडणी करावी.कढीपत्ता घालावा.त्यावर मसाला भरलेली वांगी घालावी.भाजी थोडी परतावी.उरलेला मसाला वांग्यांवर घालून परतावे.अगदी भाजी खाली लागणार नाही इतपतच पाणी घालून कुकरचे झाकण बंद करावे.गँस बारीकच ठेवावा.15मिनिटे प्रेशर पकडायला लागतात.बारीक गँसवर एकच शिट्टी करावी.व गँस बंद करावा.जास्त शिट्ट्या करु नयेत.भाजी खूप शिजली तर छान लागत नाही.

  4. 4

    कुकरचे प्रेशर पडले की डावाने हलकेच भाजी हलवावी.व दुसऱ्या बाऊलमध्ये सर्व्हिंगसाठी काढून ठेवावी. गरम भाकरीबरोबर सर्व्ह करावी भरल्या वांग्याची भाजी😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes