कैरीचा कायरस (kairicha kayras recipe in marathi)

Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320

#कैरीचा कायरस, हा पदार्थ खूप चटपटीत लागतो

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 3कैऱ्या
  2. 1 वाटीगुळ
  3. 1 टेबलस्पूनमोहरी
  4. 4-5कढीपत्त्याची पाने
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1/4 चमचाहळद
  7. 3-4 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनमीठ
  9. आवश्‍यकतेप्रमाणे पाणी
  10. 1 वाटीओलं खोबरं
  11. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  12. 1 टेबलस्पूनउडीद डाळ

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम कैऱ्या स्वच्छ धुऊन साल काढून तिचे मध्यम तुकडे करावेत

  2. 2

    आता पातेले गॅसवर ठेवून त्यात 1 टेबलस्पून तेल घालून तेल गरम झाले की त्यात मोहरी घालावी व ती व तडतडली की त्यात एक टेबलस्पून उडदाची डाळ व पाव चमचा मेथी आणि कढीपत्ता घालावा त्यात कैरीचे तुकडे घालून चांगले परतून घ्या आता त्यात हळद तिखट व मीठ घालून कैरी नीट परतून घ्यावी.

  3. 3

    आता वरील मिश्रणात पाणी घालून कैरी चांगली शिजू द्यावी. आता या मिश्रणात एक वाटी ओले खोबरे व 2चमचे तांदळाचे पीठ घालून मिक्सरला लावून त्याची पेस्ट बनवून ती घालून मिश्रण सतत ढवळत राहावे पाच मिनिटांनी गॅस बंद करावा

  4. 4

    शेवटी वरील मिश्रणात एक वाटी गूळ घालावा व चांगली उकळी काढावी,तयार झाला आपला,चटपटीत गरमागरम कैरीचा कायरस

प्रतिक्रिया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

Cook Today
Nanda Shelke Bodekar
Nanda Shelke Bodekar @cook_26498320
रोजी

Similar Recipes