खमंग बाजरी वडे (khamang bajari vade recipe in marathi)

Reshma Sachin Durgude @Reshma_009
#FD खमंग असे नाश्त्यासाठी पौष्टिक बाजरी वडे
खमंग बाजरी वडे (khamang bajari vade recipe in marathi)
#FD खमंग असे नाश्त्यासाठी पौष्टिक बाजरी वडे
कुकिंग सूचना
- 1
एका भांड्यात बाजरीचे पीठ घेवून त्यामध्ये आलेेेलसुुुन पेस्ट,ओवा,सफेद तीळ,हळद,लाल तिखट,धना पावडर,चवीनुसार मीठ आणि 1 वाटी दही मिक्स करून घेणे.
- 2
मिश्रण थोडे थोडे पाणी घालून पीठ तयार करून घेणे. नंतर एका प्लास्टिक कागदावर वडे थापून घ्यावेत.कढईत तेल गरम करुन वडे तळून घेणे.
- 3
गरम गरम खमंग वडे तयार झाल्यावर कोथिंबीर चटणीबरोबर सर्व्ह करावे.
Similar Recipes
-
बाजरी मेथीचा ढेबरा (bajaricha methicha dhebra recipe in marathi)
बाजरी ही उष्ण आल्यामुळे आपण बहुतेक वेळा हिवाळ्यात खातो.तेव्हा .:-) Anjita Mahajan -
श्रावण मंगळागौर स्पेशल भाजणीचे वडे (bhajni vade recipe in marathi)
#shr#श्रावण शेफ चॅलेंज#week3श्रावण महिन्यात अनेक सण येतातधरती हिरव्या पाना फुलांनी बहरते 🌿🌺🌸☘️ श्रावण महिन्यात तर अनेक विविध पूजा आणि सण साजरे केले जातात. नव्या नवरीचा असाच एक साजरा करण्यात येणारा सण म्हणजे मंगळागौर. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रीने पहिली पाच वर्षे पूजण्याचा सण आहे. लग्नाला पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत प्रत्येक श्रावणातील मंगळावारी मंगळागौरीची पूजा करण्यात येते. नवविवाहित आणि सौभाग्यवती महिलांना बोलावून हा सण साजरा करण्यात येतो यासाठी अशाच इतर नवविवाहितांनाही बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. ... नऊवारी लुगडे नेसून व नाकात नथ, पारंपरिक दागिने घालून हे व्रत करण्यात येतेतसेच पारंपरिक खेळ खेळण्यात येतात हळदी कुंकू करण्यात येतेमंगळागौरीला पूरणा वरणा चा स्वयंपाक तर असतो पण त्याबरोबर तिखट चमचमीत भाजणी चे वडे करतात हे वडे अत्यंत चवदार व रुचकर असे लागतात 😋👌विशेष म्हणजे हि भाजणी कडधान्ये भाजून त्याचे पिठ तयार करतात म्हणून हे वडे अत्यंत पौष्टिक होतातचला तर बघुया कसे करायचे भाजणीचे वडे. Sapna Sawaji -
बाजरी चमचमीया (Bajara chamchamiya recipe in marathi)
#GA4 #week24 #cooksnap# आज मी माधुरी वाटेकर यांची बाजरी चमचमीया ही रेसीपी कूकस्नॅप केली आहे . झटपट होणारी आणि पौष्टिक व चविष्ट अशी ही रेसिपी एकदम मस्त आहे.. यात फक्त एक फरक आहे ..माधुरी ताईंनी बाजरीचे पीठ वापरलेले आहे.. मी बाजरीच्या पिठाच्या ऐवजी , बाजरी भिजत घालून त्याची केलेली पेस्ट वापरली आहे ...पण एकंदरीत रिझल्ट खूप छान.. Varsha Ingole Bele -
खमंग काकडीचे वडे/ तवसाचे वडे (khamang kakdiche vade recipe in marathi)
#KS1आज मी काकडीचे वडे आणि तिखट वडे हे दोन्ही बनवले आहेत सोप्या पद्धतीने बनवले जाणारे काकडीचे वडे सणावाराच्या दिवशी , गौरी गणपतीच्या वेळेस, पित्रू पक्षा मध्ये हे वडे कोकणामध्ये बनवले जातात . कोकणामध्ये पावसाळ्यात काकडी ही खूप प्रमाणात मिळते त्यावेळेस हे वडे घरो घरी बनवले जातात. खायला पण एकदम चविष्ट आणि झटपट होणारे हे काकडीचे वडे तयार आहेत. चला तर मग आपण रेसिपी बघूया Gital Haria -
मिक्स पिठाचे वडे (Mix Pitache Vade Recipe In Marathi)
#GR2झटपट होणारे मिक्स पिठाचे वडे अतिशय खुसखुशीत खमंग होतात Charusheela Prabhu -
-
खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)
सणासुदीला नैवेद्याच्या पानात हमखास वाढली असणारी खमंग कोथिंबीर वडी..😊😋 Deepti Padiyar -
पावसाळी मजा दुधीचे वडे (dudhiche vade recipe in marathi)
पावसाळ्यात गरमागरम भजे ,चाहा, वडे भेटले की अजून कशाची गरजच वाटत नाही त्यासाठी आज बाहेर मस्त पाऊस आणि आत गरम दुधी चे वडे Abhishek Ashok Shingewar -
कोंबडी वडे (kombdi vade recipe in marathi)
#wdr सर्वांच्याच आवडी अतिशय चविष्ट असे हे कोंबडी वडे आम्ही रविवारी करतोच त्यामुळे नॉनव्हेज ला एक वेगळीच बहार येते... Nilesh Hire -
खमंग बाजरी वड्या (Bajri Vadya Recipe In Marathi)
#HVबाजरी हे धान्य हिवाळ्यातील उत्तम टॉनिक आहे . त्यांत मॅग्नेशियम ,फॉस्फरस , प्रोटीन व विपुल प्रमाणात कॅल्शियम असते .मधुमेह , चरबी आम्लपित्त , अशा अनेक आजारात उपयुक्त आहे. बाजरीच्या , झटपट पण खमंग वड्या बनविल्या आहेत .तुम्हालाही त्या आवडतील . चला कृती पाहू .. Madhuri Shah -
तीळ लावलेली बाजरी भाकरी (Til Lavleli Bajrichi Bhakri Recipe In Marathi)
#cooksnap- थंठीमध्ये हमखास केली जाणारी बाजरी भाकरी अतिशय पौष्टिक आहे, तेव्हा मी स्मिता ताई पाटील यांची रेसिपी कुकस्नॅप केली आहे. केली आहे. Shital Patil -
पपईचे वडे (papai vade recipe in marathi)
#GA4 #week7 अनेक प्रकारचे वडे आपण करत असतो पण पपईचे वडे हा माझा आवडता पदार्थ आहे. (ब्रेकफास्ट रेसिपी) Archana bangare -
डाळ वडे (daal vade recipe in marathi)
#cooksnapमी मंगल शहा यांची "म्हैसूरी पंचरत्न डाळवडा " ही रेसिपी थोडा बदल करून "डाळवडे" बनविले आहेत.खमंग व रुचकर असे 'डाळ वडे' सर्व लहान-थोर मंडळीना आवडणारा पदार्थ. कुडकुडीत असे हे डाळ वडे खूप छान झाले . Manisha Satish Dubal -
ज्वारीच्या पिठाचा खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या (jowarichya pithacha puri recipe in marathi)
#GA4 #Week16 #Jowar म्हणजेच ज्वारी ... ज्वारीची भाकरी आपण नेहमीच खातो पण आज खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या केल्यात... Ashwinii Raut -
कोंबडी वडे (भोकाचे वडे) (kombdi vade recipe in marathi)
#crपाचकळशी पद्धतीचे पारंपारीक वडे... सणावाराला मुख्यत: गौरी पूजन व दिवाळी ला (नॉन-व्हेज खायच्या दिवशी) माझ्या माहेरी हेच वडे बनतात.... Yadnya Desai -
खमंग कोथिंबीर वडी (khamang kothimbir wadi recipe in marathi)
महाराष्ट्र मधील खमंग कोथिंबीर वडी Sanikakokane -
बाजरीचे वडे (bajriche vade recipe in marathi)
#Heart#बाजरीचेवडेआज परत माझ्या आवडीने खंमग रेसीपी हार्ट शेप मध्ये बनवली आहे. मुळची गुजराथी रेसिपी आहे.अगदी कुरकुरीत व खमंग झालेत वडे . Jyoti Chandratre -
मेथी बाजरी पुरी / Millet (methi najari puri recipe in marathi)
#Milletबाजरी हिवाळ्यात खायला खूप पौष्टिक असते.तसेच हिवाळ्यामध्ये बाजारात भरपूर पालेभाज्या मिळतात त्यातील मेथी घेऊन मेथी बाजरी पुरी बनवली आहे त्यामुळे ती अजूनच पौष्टिक आणि चविष्ट तयार होते. Vandana Shelar -
हेल्दी बाजरी सलाद रोल (bajri salad roll recipe in marathi)
बाजरी रेसिपी कूक स्नॅप चॅलेंज Madhuri Shah -
बाजरी थालीपीठ (bajari thalipeeth recipe in marathi)
#GA4 #week12 foxtail millet हा किवर्ड वापरून मी बाजरीचे थालीपीठ बनवलं आहे. बाजरी ही हिवाळ्यात खाण्यासाठी खूप चांगली असते. बऱ्याच जणांना बाजरीची भाकरी आवडत नाही.अशा प्रकारे जर थालीपीठ बनवून खाल्लं तर बाजरी मधील पोषक गुण त्यांना मिळू शकतात. मी लहान असताना मला बाजरीची भाकरी अजिबात आवडत नव्हती. मग आई असे प्रयोग करून बाजरी खायला लावायची.माझी आई अशी थालीपीठ बनवायची मीही तशीच बनवली आहेत. Shama Mangale -
बाजारी च्या गोड कापण्या (Bajrichya God Kapnya Recipe In Marathi)
#LCM1बाजरी ही अतिशय पौष्टीक असते. पण थोडी कडू असल्या मुळे लहान मुले खायला मागत नाही. अशा वेळेस तिच्या गोड कापण्या बनवल्या तर सगळ्या ना फार आवडतात. SHAILAJA BANERJEE -
पालक वडे (palak vade recipe in marathi)
#GA4 #Week2 #पालक - विदर्भातील फेमस असे पालक वडे आज गोल्डन अप्रोन च्या निमित्ताने पहिल्यांदा करून बघितले... खूपच कुरकुरीत आणि पटकन झाले...Asha Ronghe
-
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
खमंग कोथिंबीर वडी (khamang kothmbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स# सोमवार - कोथिंबीर वडीहिरवी गार कोथींबीर सध्या भरपुर प्रमाणात उपलब्ध आहे.मुले खाण्यास कंटाळा करतात.असे काहीतरी खमंग खुसखुशीत असले की आवडीने खातात.त्यासाठी पारंपरिक पद्धतीने केलेली कोथिंबीर वडी. Shweta Khode Thengadi -
-
मिक्स पिठाचे भोकाचे वडे (mix pithache bhokache vade recipe in marathi)
#mfr#वर्ल्ड फूड डे चॅलेंज#माझी आवडती रेसिपी#मिक्स पिठ#भोकाचे वडे Sampada Shrungarpure -
बाजरी ची भाकरी (bajrichi bhaji recipe in marathi)
#मकर .भोगीला आपण बाजरी ची भाकरी बनवतो व वरून तीळ लावतो बाजरी व तीळ गरम असले मुळे थंडीत खाण्याचे खूप चांगले फायदे आहेत. Rajashree Yele -
भाजणी वडे (bhajni vade recipe in marathi)
#ngnrनो ओनीयन नो गार्लिक रेसिपी साठी आज मी केलेत भाजणी चे वडे,पण हि भाजणी मी सगळे साहित्य न भाजता घेतले आहे,तांदूळ, उडीद डाळ,चणाडाळ,धने,गहू, आणि हरभरा घेऊन भरडा काढून आणला थोडा सरसरीत दळून घेतलाय Pallavi Musale -
खमंग खुसखुशीत चकली (chakali recipe in marathi)
#रेसिपीबुक #week15 #Themeचकली रेसिपी आपल्याला चकल्या खायच्या वाटल्या आणि भाजणीचे पीठ बनवायचा कंटाळा आला तर, आपण झटपट गव्हाच्या पिठाच्या चकल्या बनवू शकतो. खास दिवाळीला चकली ही खूप पॉप्युलर डिश आहे. आणि सगळ्यांना चकली खायला पण खूप आवडते. चकली बनवताना पीठ मळून घेतल्या बरोबर लगेच चकली बनवून तळून घ्यावी. पीठ तसेच थोडावेळ ठेवले तर चकल्या तुटून जातात. Najnin Khan -
मालवणी कोंबडी वडे,चिकन मसाला (kombdi vade chicken masala recipe in marathi)
#cr#काॅम्बोरेसिपीजमालवण किंवा कोकणात सूप्रसिद्ध म्हणून ओळखले जाणारे हे खमंग 'कोंबडी वडे'चिकनच्या रश्श्यासोबत खाल्ल्याने जेवणाची शान वाढवतात...😊पाहूयात ,मालवणी कोंबडी वडे आणिमालवणी चिकन मसाला . Deepti Padiyar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14755698
टिप्पण्या (8)