चपाती सॅन्डविच (chapati sandwich recipe in marathi)

Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
UAE

#FD चपात्या जर जास्त उरल्या तर त्यांचे काय करायचे हा प्रत्येक गृहिणीला पडणारा गहन प्रश्न....त्यासाठीचा हा अचूक तोडगा ज्यामुळे होईल बच्चेकंपनी पण खुश....
पोटभर होईल असा हेल्दी नाश्ता पण पाव, ब्रेडचा वापर न करता बनवायचे होते सॅन्डविच...मग सुचली ही भन्नाट कल्पना....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनीटे
दोन जणांना
  1. 3चपाती
  2. उकडलेल्या बटाट्याचे काप, काकडी, टमाटर आणि कांदा.
  3. 1 टेबलस्पूनअमूल बटर आणि चीज
  4. पुदिन्याची हिरवी चटणी आणि सॅन्डविच मसाला

कुकिंग सूचना

३० मिनीटे
  1. 1

    तयार चपातीस पुदिन्याची चटणी आणि बटर लावून घेणे..

  2. 2

    चपातीस चटणी लावून झाल्यावर त्यावर सॅलडचे काप टाकून सॅन्डविच मसाला स्प्रेड करून वरून चीज टाकून असे ३ चपात्यांचे लेयर्स करणे.

  3. 3

    लेयर्स लावून झाले की चपातीचे सॅन्डविच दोन्ही बाजूंनी तव्यावर बटर टाकून खरपूस भाजून घेणे....नंतर चार भाग करून पुदिन्याच्या
    चटणीसोबत आणि टोमॅटो केचप सोबत सर्व्ह करा....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shilpa Pankaj Desai
Shilpa Pankaj Desai @cook_29394142
रोजी
UAE
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !सहज हवन होते नाम घेता फुकाचे !!जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म !उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म !!
पुढे वाचा

Similar Recipes