मूंग डाळ हलवा (moong daal halwa recipe in marathi)

GayatRee Sathe Wadibhasme
GayatRee Sathe Wadibhasme @cook_19448200

गुढीपाडवा म्हणजे गोड हे नक्की. आपण
नेहमी मूंग डाळ हलवा लग्न समारंभामध्ये खातो पण तो कधी कधी जास्त गोड असतो नाहीतर जास्त तुपकट असतो पण जर हे प्रमाण वापरून हलवा केला तर ना जास्त गोड ना तुपकट असा हलवा बनवतो. तुम्हाला आवडत असल्यास गूळ वापरून सुद्धा बनवून शकता फक्त गूळ बारीक करून घ्यावा. चला तर मग गुढीपाडवा साजरा करूया मूंग डाळ हलवा बनवून व सणाचा आनंद द्विगुणित करूया.
मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
#gp
#गुढीपाडवा२०२१

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३०-४० मिन
५-६ व्यक्ती
  1. 1-1/2 कपमूंग डाळ(बिन सालीची)
  2. 3 कपदूध
  3. 2 टेबलस्पूनरवा
  4. १-१/२ कप साखर
  5. 1 टीस्पून वेलची पावडर
  6. 1/2 कपसुका मेवा
  7. 4 कपपाणी (डाळ भिजवन्यासाठी)
  8. 1 कपतूप
  9. 1/2 ग्रॅमकेशर

कुकिंग सूचना

३०-४० मिन
  1. 1

    प्रथम २ तास मूंग डाळ भिजवत घालावं नंतर ती दरदरीत वाटून घ्यावी

  2. 2

    सुका मेवा चे बारीक कप करुन घ्यावेत

  3. 3

    आता एका कढई मधे तूप गरम करावं व त्यात २चमचे रवा घालून छान भाजून घ्यावा. सोबत काजू व बदाम पण छान तळून घ्यावे.

  4. 4

    नंतर त्यात वाटलेली मूंग डाळ घालावी व खमंग खरपूस होई पर्यंत परतून घ्यावी

  5. 5

    अंदाजे २५-३० मिन नंतर डाळ चांगली मोकळी होते व तिचा रंग सुधा बदलून छान खरपूस वास येतो

  6. 6

    एकीकडे ३कप दूध गरम करत ठेवावे. डाळ चांगली भाजून झाली की त्यात १-१/२ कप साखर व दूध घालून छान एकत्र करावं. व जेव्हा दूध घालणार त्या वेळेलाच सोबत केशर च्य कड्या घालाव्या

  7. 7

    आता पुन्हा हलवा छान मोकळा होई पर्यंत परतून घ्यावा व वेलची पावडर घालून छान एकत्र करावा.

  8. 8

    सुक्या मेव्याच कप व काजू घालून छान साजवावा छान गरम गरम किंवा थंड जस आवडेल तसा सर्व्ह करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
GayatRee Sathe Wadibhasme
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes