मुगडाळीचा हलवा (moong dalicha halwa recipe in marathi))

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#cpm2 week - 2
#मुगडाळीचा हलवा हा पौष्टिक पदार्थ आहे. फक्त तूप जास्त लागते.

मुगडाळीचा हलवा (moong dalicha halwa recipe in marathi))

#cpm2 week - 2
#मुगडाळीचा हलवा हा पौष्टिक पदार्थ आहे. फक्त तूप जास्त लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मिनिटे
2जणांसाठी
  1. 1/2मूग डाळ
  2. 1/2 कपतूप
  3. 1/2 कपदूध. लागल्यास आणखी घालू शकता
  4. 1/2 कपसाखर
  5. 1/4 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1 टेबलस्पूनकाजू, बदाम, पिस्ता यांचे तुकडे
  7. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर किंवा खवा

कुकिंग सूचना

30-40 मिनिटे
  1. 1

    मुगडाळ 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणे व पाणी घालून 3-4 तास भिजत ठेवावी. नंतर पाणी निथळून घ्यावे. मिक्सरमधुन किंचित जाड ठेवून बारीक वाटून घेणे.

  2. 2

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात तूप घालून वाटलेली डाळ घालून चमच्याने सतत हलवत राहावे. म्हणजे खाली लागणार नाही. चांगली लालसर रंगावर भाजून घेणे. बाजूंनी छान तूप सुटते.भाजायला वेळ फार लागतो.

  3. 3

    डाळीचे पीठ चांगले भाजून झाले की, दूध गरम करून घालावे. लगेच साखर घालून विरघळून घेणे. नंतर मिल्क पावडर किंवा खवा घालून मिक्स करून घेणे.वेलची पावडर घालून मिक्स करावे व गॅस मंद आचेवरच ठेवावा.

  4. 4

    सुकामेवा घालून मिक्स करून घेणे.5 मिनिटे झाकून ठेवावे.गॅस बंद करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes