पावभाजी... फ्लॉवरची. (pavbhaji recipe in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#pcr # पावभाजी... आज मी कुकरमध्ये, फ्लॉवरची भाजी बनविली आहे.. पावसोबत खाण्यासाठी... घरी जे उपलब्ध होते, त्यातून..

पावभाजी... फ्लॉवरची. (pavbhaji recipe in marathi)

#pcr # पावभाजी... आज मी कुकरमध्ये, फ्लॉवरची भाजी बनविली आहे.. पावसोबत खाण्यासाठी... घरी जे उपलब्ध होते, त्यातून..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40-45 मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 किलोफ्लॉवर
  2. 3-4गाजर
  3. 1सिमला मिरची
  4. 1बटाटा
  5. 4 टेबलस्पूनकांदा, टोमॅटो आणि बिटची पेस्ट
  6. 3 टेबलस्पूनतेल
  7. 1 टेबलस्पूनबटर
  8. 1 टीस्पून जीरे मोहरी
  9. 1 टीस्पूनहळद
  10. 1-1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  11. 1-1/2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  12. 2 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  13. 1 टीस्पूनधणे पूड
  14. चवीनुसारमीठ
  15. कोथिंबीर
  16. पाव
  17. बटर

कुकिंग सूचना

40-45 मिनिट
  1. 1

    कोबी धुवून निवडून घ्यावी. त्यानंतर कोबी, गाजर, बटाटा आणि सिमला मिरचीचे मोठे तुकडे करून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर कुकर मध्ये टाकून त्यात एक ग्लास पाणी टाकून तीन शिट्या काढून घ्याव्यात.

  3. 3

    कांदा टोमॅटो आणि बीट ची पेस्ट करून घ्यावी.

  4. 4

    कुकर थंड झाल्यावर ते मॅश करून घ्यावे. आणि दुसऱ्या भांड्यात काढून घ्यावे.

  5. 5

    आता त्याच कुकरमध्ये भाजी फोडणी देण्यासाठी तेल आणि बटर टाकावे. जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर त्यात कांदा टोमॅटो पेस्ट टाकावी. आले लसूण पेस्ट टाकून चांगले परतून घ्यावे.

  6. 6

    आता हळद, तिखट आणि धणे पूड, पावभाजी मसाला, घालून चांगले मिक्स करून घ्यावे. त्यानंतर त्यात मॅश केलेले कोबी गाजर टाकावे.

  7. 7

    चांगले परतून त्यात चवीनुसार मीठ टाकावे. आणि झाकण लावून दोन मिनिट वाफ आणावी. त्यानंतर कोथिंबीर टाकली की भाजी तयार.

  8. 8

    आता पावभाजीचे पाव, बटर टाकून, तव्यावर भाजून घ्यावे. आवडत असल्यास थोडा पावभाजी मसाला टाकावा. आता चटपटीत फुलकोबिची पावभाजी, गरम पावासोबत खाण्यास तयार आहे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Similar Recipes