पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)

Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
गोवा

#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात

पावभाजी बर्गर (pawbhaji burger recipe in marathi)

#रेसिपीबुक #week9 फ्युजन मध्ये आज बर्गर आणि पावभाजी ह्याचे फ्युजन बनवले. बर्गर हा पश्चिम देशात प्रामुख्याने बनणार पदार्थ आहे तर पावभाजी आपल्या इथे बनवतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
2 सर्व्हिंग्ज
  1. 2बटाटा
  2. 1गाजर
  3. 4टोमॅटो
  4. 2कांदे
  5. 1 कपफ्लॉवर चिरून
  6. 1/2 कपकोबी चिरून
  7. 1/2 कपसिमला मिरची चिरून
  8. 1 कपहिरवा मटार
  9. 2पाव
  10. 1 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  11. 1 टीस्पूनतिखट
  12. 1 टीस्पूनतेल
  13. 1 टेबलस्पूनबटर
  14. 2 टीस्पूनमीठ
  15. 2 टीस्पूनआले लसुण पेस्ट
  16. 1 कपकांदा, टोमॅटो,गाजर व काकडीचे चकत्या
  17. 4-5कोबीची पाने

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    कोबी, सिमला मिरची व फ्लॉवर घ्यावा व बारीक कट करून घ्यावे. कुकरमध्ये गाजराचे तुकडे, बटाटा चे तुकडे टोमॅटोचे तुकडे घालावे. एक टिस्पून मीठ व एक टीस्पून पावभाजी मसाला आणि पाणी घालून कुकरला दोन शिट्या काढाव्यात.

  2. 2

    एका पातेल्यात 1 टीस्पून बटर व तेल घालून गरम करावे. जिरे घालावे नंतर त्यामध्ये कांदा घालून चांगले परतून घ्यावे. दोन टोमॅटोच्या बारीक तुकडे करून घालावे व चांगले परतून घ्यावे. त्यामध्ये सगळ्या कापलेल्या भाज्या व मटार घालून चांगले शिजवून घ्यावे. आले लसणाची पेस्ट घालावी. कुकर मधले मिश्रण त्यामध्ये घालावे व स्मॅशरने चांगले स्मॅश करावे.

  3. 3

    आले लसणाची पेस्ट घालावी. कुकर मधले मिश्रण त्यामध्ये घालावे व स्मॅशरने चांगले स्मॅश करावे. त्यामध्ये पाव भाजी मसाला, तिखट व मीठ घालावे. कसुरी मेथी कोथिंबीर घालून शिजवून घ्यावे. वरून बटर घालावे.

  4. 4

    पाव घेऊन मधुन कापावा. दोन्ही बाजूला बटर लावावे. परत दोन्ही बाजूला पावभाजी लावावे. एका पावावर कांद्याच्या चकत्या, टोमॅटोच्या चकत्या गाजर व काकडीचे चकत्या लावावे.

  5. 5

    नतंर शेवटी कोबीचे पान ठेवावे. दुसरा पाव त्यावर ठेवावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kirti Killedar
Kirti Killedar @cook_23097233
रोजी
गोवा

टिप्पण्या

Similar Recipes