खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
Andheri

खानदेशी मसाला खिचडी (masala khichdi recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/2 कपतुरडाळ
  3. 1चिरलेला कांदा
  4. 1 टीस्पूनमोहरी
  5. 1 टीस्पूनजीरे
  6. 1 टेबलस्पूनकढीपत्ता
  7. 1मोठे बटाटे चिरलेले
  8. 1 टेबलस्पूनआले-लसुण पेस्ट
  9. 1/4 कपशेंगदाणे
  10. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  11. 1/2 टेबलस्पूनहळद
  12. 1/2 टेबलस्पूनधणेपुड
  13. 1 टेबलस्पूनकांदा लसुण मसाला / काळा मसाला
  14. 1/4 कपकोथिंबीर
  15. 1 1/2 मोठा चमचातेल
  16. मीठ आवश्यकतेनुसार
  17. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    प्रथम आपण एका भांड्यामध्ये तांदूळ व तूर डाळ घ्यावी. ते मिश्रण तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावे व त्याच्या मध्ये थोडे पाणी घालुन दहा ते पंधरा मिनिटं ते थोडे भिजवून घ्यावे.

  2. 2

    जोपर्यंत तांदूळ आणि डाळ भिजत आहे. तीथपर्यंत आपण कुकर मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जीरे व कढीपत्ता यांची फोडणी करावी. मग त्यामध्ये त्या फोडणीमध्ये कांदा घालून तो थोडा गुलाबी करून घ्यावा मग त्यामध्ये आले लसून पेस्ट, बटाटे व शेंगदाणा घालून थोडावेळ परतून घ्यावे.

  3. 3

    मग त्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पूड व कांदा लसूण मसाला घालावा. हे मिश्रण चांगले तेल सुटे पर्यंत एकत्र करावे. मग त्यामध्ये आपण डाळ व तांदूळ भिजत घातलेले होते त्यातील पाणी काढून ते या मिश्रणामध्ये घालावे. मग आपण कोथिंबीर घालावी. मी कोथिंबीर आता घातली आहे पण कोथिंबीर आपण जेव्हा बटाटा, शेंगदाणा व आले लसूण पेस्ट भाजतो तेव्हाच कोथिंबीर घालावी.

  4. 4

    मग एका टोपा मध्ये पाणी गरम करून तो पाणी आपण या मसाला भातमध्ये घालावे व कुकरला झाकण लावून घ्यावे.मग मोठ्या आचेवर एक शिट्टी व मध्यम आचेवर एक शिट्टी काढून गॅस बंद करावा व कुकर थंड झाल्यावर तो ओपन करून आपला मसाला भात सुटा करुन घ्यावा. अशाप्रकारे मसाला भात तयार आहे. हा भात आपण कोशिंबिरी, पापड व कुरडया यांसोबत खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samiksha shah
Samiksha shah @cook_22732766
रोजी
Andheri

टिप्पण्या

Similar Recipes